Agnipath Scheme: अग्निपथ योजना : सैन्यात भरती होणं हे अनेकांचं स्वप्नं असतं,देशासाठी सर्वोच्च त्याग करण्याची तयारी देशातील प्रत्येक तरूणांत असतेच त्यातील काही सैन्यात भरती होतात.सैन्यात भरती होणं ही आणखी एक नोकरीची सुरक्षा देणारी हमी देणारी गोष्ट असल्याने ग्रामीण भागातील तरुण सैन्यात भरती होण्याचे प्रमाण जास्त आहे.भाजप सरकारने नुकताच या संदर्भात एक निर्णय घेऊन देशभरात खळबळ उडवून दिली आहे.या निर्णयाचे,योजनेचे नाव,अग्निपथ असे देण्यात आलंय.
अग्निपथ योजनेला विरोध वाढत आहे. लष्करातील भरतीच्या या नव्या नियमावर अनेक गोष्टींवर आक्षेप घेतला जात आहे.अग्निपथ योजनेबाबत देशातील अनेक राज्यांमध्ये आंदोलने होत आहेत. यामध्ये बिहारमधील तरुण सर्वाधिक आक्रमक आणि संतप्त दिसत आहेत. सैन्यात भरतीच्या नव्या योजनेबाबत बिहारमध्ये रस्त्यावर उतरलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या अनेक चिंता आहेत. यातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ते सैन्यात भरती होण्यासाठी खूप मेहनत करतात. मग एवढी मेहनत करून फक्त चार वर्षे नोकरी मिळाली तर काय उपयोग?
अग्निपथ योजना ,विद्यार्थी तरुण का आहेत संतप्त?
विविध मंत्रालये, निमलष्करी दलात अग्निवीरांना प्राधान्य मिळेल, असे केंद्र सरकार, राज्य सरकार सांगत असले तरी तरुणांचे यावर समाधान झालेलं दिसत नाही. कारण नंतरच्या चार वर्षांनी ते काय करतील हीच त्यांची मोठी चिंता त्यांना सतावत आहे. सैन्यात शारीरिक भरतीची प्रक्रिया सुरू असतानाही फिजिकल होऊनही अद्याप त्यांना सैन्यात नोकऱ्या मिळाल्या नसल्याचाही या विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे.
बिहारसह अनेक राज्यांतील विद्यार्थी अग्निपथ योजनेच्या नियमांवर नाराज आहेत. अग्निपथ योजनेंतर्गत सैन्यात चार वर्षांच्या करारावर भरती होणार असल्याचे ते सांगतात. मग सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाईल आणि ग्रॅच्युइटी किंवा पेन्शनसारखे फायदेही मिळणार नाहीत जे त्यांच्या दृष्टीने योग्य नाही.
दोन वर्षांपासून सैन्य भरती रखडलीय
गुरुवारी बिहारमधील मुझफ्फरपूर (Muzaffarpur) जिल्ह्यातही प्रचंड मोठे आंदोलन करण्यात आले. ज्या भागातून मोठ्या संख्येने तरुण सैन्यात भरती होण्यासाठी जातात त्या भागांमध्ये याचा समावेश आहे. मुझफ्फरपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, गेल्या दोन वर्षांपासून सैन्य भरती रखडली आहे. त्याने भरतीसाठी आवश्यक शारीरिक चाचणी देखील उत्तीर्ण केली आहे, तरीही त्याला नोकरी मिळत नाही. दरम्यान, सैन्यात नोकरीचे नवे नियम आणणे म्हणजे निराशा करण्यासारखे आहे.
याशिवाय असे अनेक तरुण आहेत जे गेल्या तीन वर्षांपासून सैन्यात भरती होण्याच्या आशेवर आहेत. कोरोनामुळे सैन्य भरती बंद राहिली, आता मोठ्या संख्येने तरुण ओव्हरएज झाले आहेत. दरम्यान, आता अग्निपथ योजना देखील वयाच्या २१ वर्षापर्यंत लागू करता येणार आहे.
अशा स्थितीत अग्निपथ धोरण लागू झाल्यानंतर लष्कर भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि ज्यांनी लेखी परीक्षा,
लष्कर भरतीसाठी शारीरिक चाचणी दिली आहे, त्यांच्याही आशांवर स्वप्नांवर पाणी फेरले गेलेय, असे तरुणांचे म्हणणे आहे.
‘चार वर्षांनी आम्ही कुठे जाणार?’
आंदोलन करणारे विद्यार्थी प्रचंड संतप्त दिसत होते. एका विद्यार्थ्याने सांगितले की, आम्ही सैन्यात भरती होण्यासाठी खूप मेहनत करतो.
ते चार वर्षांपर्यंत कसे मर्यादित ठेवता येईल? प्रशिक्षण दिवस आणि सुट्ट्यांसह? किती दिवस उरतात?
केवळ तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर आपण देशाचे रक्षण कसे करू शकतो? सरकारने ही योजना मागे घ्यावी.
जहानाबादमध्ये आंदोलन करणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, चार वर्षांनी आम्ही कुठे कामावर जाणार?
चार वर्षांच्या सेवेनंतर आम्ही बेघर होऊ. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.
देशातील नेत्यांना जनता जागरूक आहे हे समजून घ्यावे लागेल, असे आंदोलक म्हणाले.
अग्निपथ योजना काय आहे?
शॉर्ट-टर्म यूथ रिक्रूटमेंट स्कीम अंतर्गत भारतीय लष्करात प्रथमच अशी योजना सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये अल्प मुदतीसाठी सैनिकांची भरती केली जाणार आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी सुमारे 40-45 हजार तरुणांना सैन्यात भरती केले जाईल. या तरुणांचे वय 17 ते 21 वर्षे वयोगटातील असेल.
– ही भरती गुणवत्ता आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल.
– या चार वर्षांत सैनिकांना ६ महिन्यांचे मूलभूत लष्करी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
– 30-40 हजार मासिक पगारासह इतर फायदेही दिले जातील.
– पहिल्या वर्षी 30 हजार, दुसऱ्या वर्षी 33 हजार, तिसऱ्या वर्षी 36500 आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये वेतन दिले जाईल.
– चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर या सर्व अग्निवीरांची सेवा संपुष्टात येईल आणि त्यानंतर नव्याने भरती करण्यात येणार आहे.
– सेवा पूर्ण करणाऱ्या २५ टक्के अग्निवीरांची कायमस्वरूपी केडरमध्ये भरती केली जाईल.
अशा स्थितीत 25 टक्के अग्निवीरांचा करार संपल्यानंतर कायमस्वरूपी केडरमध्ये समावेश होईल,
मात्र चार वर्षानंतर उर्वरित 75 टक्के अग्निवीरांचे काय होणार, असा सवाल तरुण करत आहेत.
सरकार त्यांना भत्ता देईल, पण नोकरी कुठून येणार?
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
200 किलो आंब्याचा रस खाल्ल्यानंतर देव आजारी पडला,वैद्यांचा उपचार सुरू
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
Samrat Prithviraj Review : प्रेक्षकांनी टॅक्स फ्री सम्राट पृथ्वीराज का नाकारला?
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 16 2022, 17: 50 PM
WebTitle – What exactly is Agneepath Yojana? Young people across the country are angry, in many places arson