औरंगाबाद : चोरीच्या संशयावरून सात ते आठ जणांच्या टोळक्याने वॉचमन असणाऱ्या एका तरुणाचा अमानुष मारहाण करत खून केल्याची घटना औरंगाबाद येथील शताब्दी नगर येथे घडल्याने खळबळ उडाली आहे.मेघवाले सभागृहातील लाइट फोकस चोरल्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी सात जणांना तत्काळ अटक करण्यात आली असून आरोपींना 26 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार ,मनोज आव्हाड हा त्याची पत्नी आणि मुलांसह शताब्दी नगर,मेघवाले सभागृहातील एका खोलीत राहायला होता.याच सभागृहात तो वॉचमन म्हणून नोकरी करत होता, सदर सभागृहाचे काम शिवसेना माजी नगरसेवक गणपत खरात यांचा मुलगा सागर खरात हा पाहतो.या सभागृहात लाइट मंडप डेकोरेटर चे काम सतीश खरे नावाचा व्यक्ती पाहतो.दिव्य मराठीच्या वृत्तानुसार मनोज आव्हाडला नोकरीवरून काढण्यात आले.त्यानंतर तो सतीश खरे कडे डेकोरेटरचं काम करत होता, त्याने या अगोदर लाइट फोकस चोरल्याचा आरोप करण्यात आला होता,दुसऱ्यांदा देखील लाइट फोकस चोरीला गेल्याने सतीश खरे याने मनोज आव्हाड वर संशय व्यक्त केला.
चोरीच्या संशयावरून खून
घटनेच्या दिवशी सतीश खरे ने मनोज आव्हाडला मेघवाले सभागृह येथे बोलवून घेतले.आणि इतर सहा जणांच्या साथीने मनोज आव्हाड ला लोखंडी रॉड आणि दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.या घटनेचा व्हिडिओ आरोपींच्या पैकी एकजण बनवत होता,त्याने हा व्हिडिओ मनोज आव्हाड च्या भावाला पाठवला,भावाला मारहाण होत असल्याचे पाहून ,यावेळी मनोजची आई आणि भाऊ तात्काळ त्याला पाहण्यासाठी त्याच्या कामाच्या ठिकाणी असता तो तेथे आढळून आला नाही. त्याला घाटी रुग्णालयात मारहाण केलेल्या तरुणांनी नेले होते. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी मनोजला तपासून मृत घोषित केले होते. दरम्यान, मारहाण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मनोजच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मनोज च्या कुटुंबीयांनी घेतला.
या प्रकरणी अधिक तपास सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे करीत आहेत.
याप्रकरणी सात जणांना तत्काळ अटक करण्यात आली असून आरोपींना 26 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
नमाजच्या वेळी मशिदीत मोठा स्फोट,लहान मुलांसह 33 ठार
१४ एप्रिल:डॉ.आंबेडकर समता दिन,कॅनडा नंतर या देशात होणार साजरा
पुण्यात ब्राह्मण महासंघाचे आंदोलन; अंगावर आलात तर..-रूपाली पाटील
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 23, 2022 14:53 PM
WebTitle – Watchman Manoj Awhad murdered in Aurangabad on suspicion of theft