आजच्या दिवशी नथुराम गोडसे या स्वतंत्र भारतातल्या पहिल्या दहशतवाद्याने महात्मा गांधींचा गोळ्या झाडून खून केला. या खुनाचे समर्थन करताना ब्राह्मणवाद्यांकडून अनेक कारणे दिली जातात,त्यातील एक कारण असतं पाकिस्तानला ५५ कोटी दिले म्हणून खून केला.एक आंबेडकरवादी म्हणून पुणे कराराच्या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्यात झालेला वाद, व्हॉट काँग्रेस अँड गांधी डन टू अनटचेबल्स? हे पुस्तक वाचून आणि गांधींबाबत बीबीसीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची घेतलेली मुलाखत यातून गांधींबाबत माझी काही मत तयार झाली होती. मागील ७० वर्षातलं राज्यातील कॉग्रेसी नेत्यांचं राजकीय वर्तन त्या नकारात्मक मतांना दुजोरा देणार होतं.
बहुसंख्य गांधीवादी देखील गांधी हत्येचा विचार केवळ हिंदू- मुस्लिम आणि भारताची फाळणी या संदर्भात करतात
गांधी हत्येचा मी कधीच समर्थक नव्हतो. पण गांधींबाबत मनात एक अढी मात्र नक्कीच होती. गांधींचा जनमाणसावर असलेला प्रभाव पाहता गांधी जातीव्यवस्थेविरोधात खूप काही करू शकले असते. त्यांच्या एका आवाजावर इंग्रजांना निशस्त्र भिडणारी भारतीय जनता त्यांनी आवाज दिला असता जातीव्यवस्थेविरोधात सुद्धा उभी राहिली असती. पण गांधीजीनी ते केलं नाही याच वैष्यम्य वाटतं. पण जेव्हा मी गांधी हत्येसंदर्भात काही नवी आणि वेगळी मतं काही लोकांकडून ऐकली आणि त्या दृष्टीने विचार करू लागलो तेव्हा मात्र गांधी हत्येसंदर्भात ते विचार मनाला पटू लागले. देशाचे आजचे वास्तव आणि ब्रांम्हणवाद्यांकडून गांधीजींचा केला जाणारा द्वेष त्या दृष्टीने विचार करण्यास अधिकाधिक प्रवृत्त करत आहे. पण या मताची हवी तशी चर्चा होत नाही. बहुसंख्य गांधीवादी देखील गांधी हत्येचा विचार केवळ हिंदू- मुस्लिम आणि भारताची फाळणी या संदर्भात करतात हे गांधीजींचं दुर्दैव आहे.
नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे येणे क्रांतिकारक घटना
लोकमान्य टिळकांच्या अस्तानंतर काँग्रेसचे नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे येणे हि भारताच्या सामाजिक, राजकीय इतिहासात घडलेली एक महत्वाची घटना होती. महात्मा फुलेंकडे ब्राह्मणेतरांचे नेतृत्व येणे हि जेवढी क्रांतीकारक घटना होती तेवढीच क्रांतिकारक घटना एका बनियाकडे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व येणे हि होती.
त्यावेळेस भारतीय समाज व्यवस्थेचा विचार करता बिगर ब्राह्मण व्यक्तीकडे जनतेचं नेतृत्व जाणे हि घटना क्रांतिकारकच मानली पाहिजे. देशात लोकमान्य टिळकांची जागा घेऊन शकेल असे अनेक मातब्बर ब्राह्मण असताना गांधी ती जागा पटकावतात हि मोठी घटना होती. केवळ हिंदूच नाही तर मुस्लिम सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागे उभे राहतात. त्यांच्या एका आदेशानुसार ब्रिटिशांचे दंडुके अंगावर घेत होते.विविध आंदोलनात सहभागी होत होते..
दोनही नेते जिंकले
मुस्लिम लीगच्या उदयानंतर गांधी हिंदूंचे सर्वात प्रमुख पुढारी समजले जातात. जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था याबाबत गांधींची भूमिका पारंपरिक होती तरी सर्व जातीचा हिंदुधर्मीय गांधीजींचे नेतृत्व मान्य करून त्यांच्यामागे उभा राहत होता. त्यामुळे त्यांच्यामागे उभ्या राहणाऱ्या हिंदूंचे हितरक्षण करणे आणि आपण हिंदूहितरक्षक आहोत असे दाखवणे गांधीची जबाबदारी होती. राउंड टेबल कॉन्फरन्स, पुणे करारात गांधींनी जी भूमिका घेतली त्याकडे याच संदर्भात पहिले पाहिजे.
दुसरीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांचे नेते असल्यामुळे अस्पृश्यांच्या हक्काचे रक्षण करणे हि त्यांची जबाबदारी होती. पुणे कराराच्या ऐतिहासिक संघर्षात हे दोन्ही नेते त्यांची ऐतिहासिक जबाबदारी पार पाडत होते. अस्पृश्याना स्वतंत्र मतदारसंघ देणे गांधींना हिंदूत फूट पाडणे वाटत होते तर स्वतंत्र मतदार संघ हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांचा अधिकार वाटत होता. हा वैयक्तिक वाद नव्हता तर काळाने या दोन्ही नेत्यांना एकमेकांसमोर उभे केले होते आणि त्यातून हे दोनही नेते जिंकले होते. पण नंतर काँग्रेसने निवडणुकीत जे राजकारण केल ते मात्र किळसवाणं होत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झालेल्या संघर्षांनंतर जातीव्यवस्थेबाबत गांधींच्या विचारात काही बदल होऊ लागले
भारतीय स्वातंत्र्य लढा जसा जसा पुढे सरकत होता तस तसे गांधी हिंदूंच्या दृष्टीने अधिकधिक मोठे होत गेले. फाळणी दरम्यान नौखाली सारख्या भागात हजारो मुसलमानांच्या सशस्त्र जमावाला सामोरे जाऊन गांधी तो जमाव शांत करतात हि बाबा दर्शवते कि गांधी जवळपास प्रॉफेट पदापर्यंत पोहचले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झालेल्या संघर्षांनंतर जातीव्यवस्थेबाबत गांधींच्या विचारात काही बदल होऊ लागले होते.
शेवटी शेवटी तर मी केवळ आंतरजातीय विवाहाचं निमंत्रणच स्वीकारेल अशी अट घालायला त्यांनी सुरवात केली होती.
हि हिंदू धर्मात केलेली ढवळाढवळ होती. लोक कौटुंबिक समस्या घेऊन गांधींकडे येऊ लागले होते.
वर्ध्यातल्या आश्रमात त्यांनी जे नियम केले होते ते मनुस्मृतीला आव्हान देणारे होत.गांधी असेच जर असेच मोठे होत राहिले
आणि धर्मात ढवळाढवळ करू लागले तर ते एकदिवस जातिव्यवस्थेला सुद्धा मोडीत काढतील हि भीती देशातील ब्राह्मणवाद्यांना होती.
ब्राह्मणांना पेशवाई हवी होती
दुसऱ्या महायुद्धानंतर भारताचं स्वातंत्र दृष्टीपथात होत. ब्रिटनची घसरलेली अर्थव्यवस्था ,
आझाद हिंद सेना, मुंबई नाविक दलाच बंड यामुळे स्वातंत्र्य हि औपचारिकता उरली होती.
पण ब्रिटिश जाताना आपल्या पदरात काय टाकून जातात याची चिंता देशातले संस्थानिक,
इस्लामिक आणि ब्राम्हणवादी नेत्यांना लागली होती. ब्राह्मणांना पेशवाई हवी होती. इस्लामवाद्यांना खिलाफतच स्वप्न पडत होतं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समतावादी भारताचं स्वप्न पाहत होते. काँग्रेस मधील नेहरू- पटेल लोकशाहीचे स्वप्न पाहत होते.
भारताची फाळणी झाल्यावर हा देश लोकशाहीवादी होणार याबाबत शंका उरली नव्हती.
काही संस्थानांना हाताशी धरून काही ब्राम्हणवादी नेते वेगळा डाव खेळत होते.
त्यांना हि संस्थांन स्वतंत्र ठेऊन त्या ठिकाणी हिंदुराष्ट्राच्या नावाखाली ब्राम्हण राष्ट्र स्थापन करायचं होत.
पाकिस्तानला ५५ कोटी दिले म्हणून गांधी यांचा खून झाला का?
लोकशाही देशात गांधी जिवंत राहणे ब्राह्मणवाद्यांना मान्य होऊ शकत नव्हते कारण देशात राजकीय व्यवस्था काहीही असली तरीही प्रॉफेट पदाला पोहचलेला गांधी व्यवस्थेपेक्षा मोठे ठरणार होते. स्वतंत्र्य प्राप्तीनंतर राजकारणातून निवृत्ती घेऊन गांधी सर्वसामान्य भारतीय माणसांसाठी काम करणार होते. देशातला हिंदू हा गांधीना प्रॉफेटच मानत होता.हेच गांधी जर स्वतंत्र भारताच्या अवकाशात जातीव्यवस्थेविरोधात उभे राहीले असते तर ते ब्राह्मणवादाच्या मुळावर येणारे होते आणि उत्तरकाळात गांधींनी तसे संकेत द्यायला सुरवात केली होती. गांधीच अस्तित्व ब्राम्हणराष्ट्राच्या उद्दिष्टांचा विरोधात जाणार होत. त्यासाठी गांधींना संपवण्याच काही तरी कारण ब्राह्मणवाद्यांना हवं होत आणि ५५ कोटीच्या निमित्ताने ते ब्राह्मणवाद्यांना मिळालं.
वस्तुतः ५५ कोटी हे मोहनदास गांधी यांनी पाकिस्तानला काही स्वतःच्या मनाने दिले नव्हते तर ती फाळणीची करारातील एक अट होती. अविभाजित भारतात रिजर्व बँक ऑफ इंडियाकडे ४०० कोटी रुपयांची शिल्लक होती. त्यापैकी ५५ कोटी पाकिस्तानला देणे फाळणीच्या करारानुसार बंधनकारक होते. How much money India gave to Pakistan during partition? उरलेली रक्कम भारताकडे राहणार होती. म्हणून गांधी पाकिस्तानला ५५ कोटी देण्यासाठी आग्रही होते.
गांधीहत्येचा विचार ब्राम्हणवादी विरुद्ध गांधी या दृष्टीने झाला पाहिजे
ब्राह्मणवाद्यांना लोकांची दिशाभूल करण्यासाठी तेवढं कारण पुरेस होत. त्यामुळे गांधी हत्या हि फाळणीत झालेले हिंदूंचे हत्याकांड, गांधी पाकिस्तानच्या ५५ कोटींच्या रास्त मागणीच्या समर्थनार्थ उभे होते म्हणून खून केला Did India paid 55 crores to Pakistan? असे नथुराम किंवा ब्राम्हणवादी म्हणत असले तरी त्यांचे मूळ उद्दिष्ट ब्राम्हणराष्ट्र स्थापने आड येणारा गांधी संपवणे हेच होते असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. त्यामुळे नथुरामला फाळणी आणि त्यात झालेल्या हत्याकांडाचा बदला घ्यायचा असता तर त्याने मोहमदअली जिना यांचा खून केला असता पण त्याने तसे करण्याचे धाडस केले नाही. म्हणून गांधीहत्येचा विचार ब्राम्हणवादी विरुद्ध गांधी या दृष्टीने झाला पाहिजे.
आताचे गांधीवादी तसा विचार करणार नाहीत. कारण त्यांना गांधी हत्येसंदर्भात हिंदू -मुस्लिम बायनरी खेळण्यात जास्त रस आहे आहे,
कारण तसे केले तर जातिव्यवस्थेच्या प्रश्नाला टाळणे त्यांना जास्त सोपे होऊन जाते.
आजच्या बदललेल्या वास्तवात गांधी विरुद्ध आंबेडकर संघर्षाकडे आपण आपले पर्सनल अजेंडे बाजूला ठेऊन नव्याने पाहीले पाहिजे.
आज गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर ते ब्राम्हणवादाविरोधात एकत्र येण्याचीच दाट शक्यता होती.
रिपब्लिकन पक्ष स्थापनेसाठी एस. एम जोशींना आमंत्रण देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ब्राम्हणवादाविरोधात
आणि लोकशाही वाचवण्यासाठी गांधीजींसोबत नक्कीच उभे राहिले असते असे मला वाटते.
गांधीबाबतची माझी हि मत अंतिम नाहीत. पण क्रांती – प्रतिक्रांतीच्या दृष्टीने मला गांधींचा एक धागा सापडला आहे.
हा धागा आंबेडकरवादी मतांच्या विरोधी जाणारा आहे असे अनेकांना वाटू शकते.
अनेक जण या या धाग्याला पकडून विचार करतात पण सोशल मीडियात लिहीत मात्र नाहीत.
कोणी तरी मुद्दाम प्रयत्न केला पाहिजे म्हणून हे लिखाण.
अमेरिकेतील सिएटल सिटी येथे जातिभेदावर बंदी करणारा कायदा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 30,2023 19:42 PM
WebTitle – Was Gandhi murdered because he gave 55 crores to Pakistan?