मुंबई : अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात मानहानीचा दावा दाखल केला असून 1.25 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन एकामागून एक गौप्यस्फोट करण्याचा धडाका सुरुच ठेवला आहे.
समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर त्यांनी संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.अर्शद शेख या वकिलांच्या तर्फे नवाब मलिक यांच्याविरोधात हा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची सुनावणी सोमवारी कोर्टात होणार आहे.
मी महार ,दलित जातीचा आहे, ज्ञानदेव वानखेडे
ज्ञानदेव वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण महार,दलित जातीतून असल्याचा दावा केला होता.त्यांनी त्यावेळी 150 वर्षापूर्वीचे पुरावे सोबत आणून ते पत्रकार परिषदेत दाखवले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले त्यांच्यासोबत या पत्रकार परिषदेत सहभागी होते.यावेळी त्यांनी नवाब मलिक यांना वैयक्तिक हल्ले करू नका असे विनंती वजा आवाहन केले होते.मी मुस्लिम महिलेशी लग्न केलं. पण मुस्लिम धर्माशी आमचा काहीच संबंध नाही, आम्ही मुस्लिम धर्मात धर्मांतर केलेलं नाही.असं ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्ट केलं होतं. दुसरीकडे, समीर वानखेडे मुस्लिम असल्यानेच त्यांच्याशी माझ्या मुलीने लग्न केल्याचा दावा समीर वानखेडे यांच्या पहिल्या बायकोच्या वडिलांनी केला आहे.
समीर वानखेडेंची आयोगाकडे धाव
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जातीच्या प्रमाणपत्रावर संशय व्यक्त केल्यानंतर
समीर वानखेडे यांनी दिल्लीत जाऊन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली होती.
आयोगाच्या अध्यक्षांना त्यांनी सर्व कागदपत्रे सादरही केली होती.
आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे.
या 22 राज्यांची पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात,इतर राज्यांत कपात नाही
धार्मिक स्वातंत्र्य:भारताला रेड लिस्ट मध्ये टाका,अमेरिकन संस्थेची शिफारश
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 07, 2021 14:16 PM
WebTitle – Wankhede’s father files defamation suit against Nawab Malik