व्लादिमीर मर्केल हाफकिन…
जन्माने ज्युईश…..
युक्रेन…….
बॅक्टरॉलॉजिस्ट……
ज्याने भारताला एक नव्हे तर दोन महामारीतून जीवदान दिले..
६०° सेल्सिअस तापमानामध्येही जिवंत राहणारे मानवतेचे शत्रू विषाणूंना संपवणारा जगातला पहिला यंग अँड डेडिकेटेड डॉक्टर
लुई पाश्चर या महान दादा बॅक्टरॉलॉजिस्टचा महान शिष्य
ज्या काळात साथीचे रोग भारतात मृत्यूचे थैमान घालत होते. कॉलरा (हगवण) प्लेग सारख्या साथीच्या रोगाने गावंच्या गावं बेचिराख होत होती. या रोगाने दैवी कोप मानून लोक जरिमरीला कमरेला लिंब लावून साकडं घालत होते. एक माणूस शिवंला पोचवून आला तोवर दुसरा काखेत गाठ येऊन तापाने फणफणत होता. चार लोक खांदा द्यायला मिळणे कठीण झाले होते.त्या काळात हाफकिनने आपले निष्ठेने सुरू ठेवले.
हाफकिन ला कॉलराची टेस्ट घेण्यासाठी कुणीही सॅम्पल तयार नव्हते,
म्हणून त्यांनी हिम्मत दाखवून १८ जुलै १८९२ रोजी स्वतःवरच प्रयोग करत लस टोचून घेतली.
३० जुलैला लगेच त्यांनी त्या टेस्टचे परिणाम रशियन बॅक्टरॉलॉजिकल सोसायटीला कळवले यावर खुद्द त्यांचा गुरू लुई पाश्चर व मॅकॅनिकोव्ह हे असहमत होते. हे संशोधन कुणीही अधिकृतपणे स्विकारू नये म्हणून फ्रान्स, रशिया व जर्मनीला शिफारस केली.दरम्यान आपल्या संशोधनाला परिणाम मिळण्यासाठी भारत हे सर्वात योग्य डेस्टिनेशन आहे असे त्यांना वाटले. १८९० पासूनच भारत व आजचा बांगलादेश दुष्काळ, उपासमार व साथीचे रोग अशा प्रचंड जीवघेण्या समस्येने ग्रासला होता. ज्यावर जागतिक अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी विस्तृतपणे संशोधनपण मांडले आहे.
याच काळात जरी त्यांचे संशोधन नाकारले असले तरी त्यांची चर्चा संपूर्ण फ्रान्समध्ये होती. दरम्यान पॅरिसमध्ये एका पार्टीत त्यांची भेट लॉर्ड फ्रेडरिक हॅमिल्टन डफरिन बरोबर झाली. (लॉर्ड डफरिन) त्यावेळी लॉर्ड डफरिन भारतातील ब्रिटिश सरकारचे फॉरेन अॅम्बेसिडर म्हणून काम करत होते व त्यापूर्वी त्यांनी १८८४ ते १८८८ दरम्यान भारताचे व्हाईसरॉय पदही भूषविले होते. त्यांना भारतातील विविध प्रांतातील प्रश्नांची चांगली माहिती होती म्हणून त्यांनी तरुण हाफकीन डॉक्टरांना त्यांनी बंगालमध्ये आपले काम पूर्ण करण्याचा सल्ला दिला.
मार्च १८९३ मध्ये डॉ. हाफकिन कोलकात्यात पोचले. भारतात येताच जर्नल अॉफ मेडिकल सोसायटी या संस्थेने त्यांना विरोध केला.
त्यांचे मते हाफकिन यांचे संशोधन जरी कॉलरावर उपयोगी पडले असेलही,
पण त्यांनी शोधलेला युरोपियन विषाणूंचा व्हेरिएंट वेगळा आहे व भारतातील वेगळा आहे.
दुसरी अडचण जी वर सांगितली आहे ती म्हणजे भारतीयांचा अत्यंत टोकाचा जातीधर्म व दैववाद….
या दोन्ही विरोधांना शांतपणे स्विकारत डॉ. हाफकिन यांनी काम सुरू केले.
तेव्हाच जगातील सर्वात मोठे लसीकरण भारतात झाले.
सर्वात आधी सैन्यांकडून त्यांना तातडीचे बोलावणे आले. हाफकीन आग्रा येथील छावणीत गेले व वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी तब्बल दहा हजार सैन्यांना कॉलराची लस दिली.
त्यानंतर आसाममधल्या ४२००० चहा मजूरांना त्यांनी लसी दिल्या.
जेव्हा त्याचे यथायोग्य सुपरिणाम येऊ लागले तेव्हा डॉक्टर हाफकिनचा बोलबाला वाढला.
१८९६ ला त्यांनी भायखळा मुंबई येथे आपली लॅब स्थापन केली. दरम्यान त्यांनी प्लेगवर ही महत्वपूर्ण संशोधन करून हि लस आधी स्वतःवर टोचून घेतली व त्याचेही योग्य परिणाम त्यांना मिळू लागले होते. सुरुवातीला भायखळा जेल मधील १५४ कैद्यांना हि लस टोचली त्यातील केवळ ०३ दगावले तरीही हे मोठेच यश मानून त्या परिसरातील १००० लोकांना हि लस दिली गेली.
१९०० ते १९०२ या काळात त्यांनी पुणे व मुंबई परिसरातील पन्नास हजार लोकांना लस दिल्याचे रेकॉर्ड आहे.
हा तोच काळ आहे जेव्हा पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. मांगवाड्यातील प्लेगबाधित लेकराला कमरेवर दवाखान्यात आणत आणत सावित्रीबाई फुले स्वतः प्लेगबाधित झाल्या व त्यातच त्या दगावल्या. रँड या महापालिका आयुक्ताने अशा लसी सक्तीने देण्याचा प्रयत्न केला तर त्याला धर्माचे शत्रू ठरवत त्याचा खून चाफेकर बंधूंनी केला.
डॉ.हाफकिन यांनी आपल्या कारकीर्दीवरच्या कलंकाला पुसले..
दरम्यान त्याने पंजाबातील मुल्कोवाल या गावी १५७ जणांना लस दिली होती. त्यातील १९ जणांमध्ये टिटॅनस (धनुर्वात) ची लक्षणं आढळली व ते १९ जण एकेक करत मृत्यूमुखी पडले. या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. हाफकिन यांनी एवढ्या लोकांना लसी देत वाचवले पण त्याला बाद ठरवत कोंडीत धरण्याचे प्रयत्न सुरू झाले. हि बाब ब्रिटिश कौन्सिलच्या दरबारी गेली म्हणून हाफकिनने निराश मनाने भारत सोडत पॅरिस गाठले.
आपल्या बाजूने तो या घटनेचं स्पष्टीकरण देत राहिला. या संशोधनातून लवकरच स्पष्ट झाले की चूक त्याची नसून लसीच्या बाटली व सिरींजचे निर्जंतुकीकरण नीट न केल्याने ते लोक धनुर्वातीला बळी पडले होते. चूक दुसर्याची जरी असली तरी तिला हाफकीनने आपल्या डोक्यावर घेत संपूर्ण निर्जंतुकीकरण (sterilisation) चीच पद्धत बदलली.
नंतर भारतात त्यांचे स्वागत झाले. सतत तीन महिन्यांच्या प्रचंड श्रमाने त्याच्या एका सहकाऱ्याचा नर्व्हस डाऊन मृत्यू झाल्यावर त्याचा दुसरा सहकारी काम सोडून गेला तरीही तो त्या कामाला चिवटपणे चिकटून राहिला.त्यांनी भारतात तब्बल चार लाख लसी दिल्याची नोंद त्याचे नावे आहे.
१९१५ पर्यंत ते भारतात होते. तब्बल २२ वर्षे त्यांनी भारतात काढली.
भारतातील विविध भागातील भाषा त्यांना कामापुरत्या तरी येत होत्या.
रिटायरमेंटच्या काळात ते जैनवादातील अहिंसा तत्त्वाने प्रभावित झाले होते.
यानंतर प्राण्यांवरती अशा लसीच्या चाचण्या करणे बंद केले होते.
“प्ली फॉर अॉर्थोडॉक्सी” ( कट्टरतेचे तर्क) नावाचे पुस्तकही त्यांचे जमा आहे.१९२५ साली त्यांचे सन्मानार्थ ग्रँट मेडिकल कॉलेजमधील लॅबोरेटरीचे नाव बदलून “हाफकिन इन्स्टिट्यूट” करण्यात आले तर काही आरोग्यसंस्थांनी त्यांचा उल्लेख “महात्मा हाफकिन” असाही केला आहे.
हिजाब वाद:धर्मनिरपेक्ष देशात सरकारी संस्थेत धार्मिक कपडे घालता येतात का? – कोर्ट
अंबानी ची कमाई तासाला 90 कोटी;दुसरीकडे मजुरांनी केलेल्या आत्महत्या
टाटा ग्रुप चे सायरस मिस्त्री यांचा अपघात कसा झाला? गाडीचे फोटो आले समोर
आज प्रधानमंत्री मोदींवर टीका केल्याने तुरुंगात जाण्याचा धोका आहे – माजी न्यायाधीश
मोफत धान्य घोषणा राजकीय आणि कायदेशीर वादाच्या भोवऱ्यात,जाणून घ्या
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 08,2022, 12:45 PM
WebTitle – Vladimir Merkel Hafkin