आसाम – देशातील 5 राज्यात सुरु असलेल्या निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झाली असून गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदानही पार पडले. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, मारहाणीच्याही घटना समोर येत आहेत. मात्र, आसामच्या पाथरकंडी विधानसभा क्षेत्रातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आली आहे. विशेष म्हणजे ही कार भाजपा उमेदवारा ची असल्याचं सांगण्यात येतंय.
यासंदर्भात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट केलंय.प्रत्येकवेळी ईव्हिएम ची वाहतूक खाजगी वाहनातून होतानाचा व्हिडिओ पाहायला मिळतो.आणि ही वाहने नेहमी भाजपच्या उमेदवारा ची किंवा त्यांच्या सहकाऱ्यांची असतात,व्हिडिओमध्ये छेडछाड करण्यात येते. ज्यांनी हे व्हिडिओ जनतेसमोर आणले आहेत, त्यांना बदनाम करण्यासाठी भाजपा मीडियाचा वापर करते. असे त्यांनी म्हटले आहे.
आसाममध्ये गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील 39 जागांसाठी मतदान घेण्यात आले. या दिवसभरातील मतदान प्रकियेनंतर भाजपा उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. कारचा नंबर AS 10 B 0022 असून या कारमधील ईव्हीएम मशिनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाथकरकंडीचे विद्यमान आमदार आणि सध्याच्या निवडणुकीतील भाजपा उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची ही कार असल्याचा दावा विरोधी गटाकडून करण्यात येत आहे. काँग्रेस आणि एआययुडीएफने हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं सांगत, निवडणूक आयोगाने तपास करण्याची मागणी केली आहे.गाडीत ईव्हिएम आढळून आल्याने स्थानिक नागरिक प्रक्षुब्ध झाले आणि त्यांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह
बोलेरो कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळल्याचा व्हिडिओ ्व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाथरकंडी मतदारसंघात लोकं रात्री उशिरापर्यंत एकत्र जमले होते. तसेच, सोशल मीडियातूनही आयोगाला प्रश्न विचारत होते.
घटनेत नविन ट्विस्ट
नविन कहानी अशी समोर आणली आहे की निवडणूक आयोगाची गाडी खराब झाल्यामुळे निवडणूक आयोगाच्या गाडीतील ईव्हिएम मशीन बाजूने जाणाऱ्या एका गाडीत शिफ्ट करून मतदान केंद्रावर नेण्यात येत होते. आणि ही गाडी योगायोगानेच भाजपच्या उमेदवाराची होती.असं स्पष्टीकरण समोर येत आहे.काही अज्ञात लोकांनी या गाडीवर हल्ला करत तोडफोड केली.
गाडीवर हल्ला करणाऱ्या अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास केला जात आहे.
संपादन –
तीन अधिकारी निलंबित
ताज्या माहिती नुसार निवडणूक आयोगाने 3 दोषी निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती मिळत आहे.
मातंग समाज अन तरुणांच्या अधोगतीला जबाबदार कोण?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on APRIL 02, 2021 12 :08 AM
WebTitle – violence in assam as locals find evm in bjp mlas car 2021-04-02