मणिपूर: मणिपूर गेल्या एक महिन्यापासून जळत आहे,इथली हिंसा कमी होण्याचं नाव घेत नाहीये.मणिपूर मध्ये पुन्हा हिंसाचार घडून आल्याने, खामेनलोक मध्ये गोळीबारात 9 जण ठार झाल्याचे वृत्त आहे.मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची आग भडकली आहे. Manipur Violence खामेनलोकमध्ये हिंसाचाराच्या नवीन घटनांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. जातीय हिंसाचार मुळे मणिपूर एक महिन्याहून अधिक काळ जळत आहे.मणिपूरमध्ये गेल्या २४ तासांत हिंसाचारात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. लष्कराच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खामेनलोक परिसरात रात्री उशिरा गोळीबार झाला. जखमींना इंफाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक मृतदेह आढळून आले आहेत ज्यांच्या शरीरावर अनेक गोळ्यांच्या जखमा तसेच धारदार शस्त्रांनी कापल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत.एवढं सगळं असूनही मेनस्ट्रीम मिडियात मात्र या बातम्यांना जास्त स्थान दिले जात नाहीये.
मैतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक संघर्षामुळे मणिपूरमध्ये एका महिन्यापासून तणावपूर्ण हिंसक वातावरण
हिंसाचाराच्या नवीन घटनांनंतर कर्फ्यूमधील शिथिलता कमी करण्यात आली आहे.
बुधवारी सकाळी 5 ते 9 या वेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली.लष्कर आणि सुरक्षा दलांनी शोधमोहीम तीव्र केली आहे.
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला
हिंसाचाराच्या या घटनांमुळे मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक संघर्षामुळे मणिपूरमध्ये एका महिन्यापासून तणावपूर्ण हिंसक वातावरण असल्याचे दिसत आहे.
खामेनलोक हे कांगपोकपी आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यांच्या सीमेजवळ वसलेले आहे.
मणिपूर हिंसाचार विविध घटनेत आतापर्यंत जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाला आहे.
शेकडो लोक जखमी झाले असून हजारो लोक बेघर झाले आहेत.
बहुसंख्य एमईटीला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या विरोधात आदिवासींनी काढलेल्या निषेध मोर्चानंतर मणिपूर मध्ये हिंसाचार सुरू झाला.
गृहमंत्री अमित शाह यांचा शांतता दौरा निष्फळ
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर होते,त्यांनी मे महिन्यात म्हणजेच २९ मे रोजी इंफाळ येथे भेट दिली होती,मात्र स्थानिक लोकांनी त्यांना जास्त महत्व दिलं नाही.कुकी इंपी मणिपूर (KIM) आणि सदर हिल्स आदिवासी एकता समितीने शांतता समितीच्या स्थापनेवर तीव्र आक्षेप घेतलाय, या समितीला विरोध करण्यासाठी आम्हाला भाग पडलं आहे, असे किमच्या वतीने सांगण्यात आले आहे.त्यामागचे कारण सांगताना त्यांनी निवेदन देताना स्पष्ट केलं की त्यांच्याशी सल्लामसलत न करता शिवाय कोणतीही माहिती न देता अध्यक्ष निवडण्यात आला होता.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, न्यायाच्या उद्देशाने केलेल्या कोणत्याही शांतता प्रयत्नांना केआयएमने आक्षेप घेतलेला नाही. मात्र, गृहमंत्रालयाच्या ईशान्य विभागाच्या आदेशाला त्यांची सहमती नाही.या आदेशात शांतता समितीसाठी अशा लोकांची निवड करण्यात आली आहे ज्यांनी आमच्या लोकांवर जातीय हिंसाचार केला. अशा लोकांशी शांततेत बोलण्यात काही अर्थ दिसत नाही.असं स्पष्ट करण्यात आलं.
मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील मणिपूर सरकारने आपली विश्वासार्हता गमावली आहे, याची नोंद घ्यावी,
असेही निवेदनात म्हटले आहे. या सरकारने आरामबाई टेंगोल आणि मीतेई लेपुन यांसारख्या कट्टरवादी
आणि अतिरेकी गटांशी संगनमत करून कुकी समाजातील लोकांवर जातीय हल्ले करण्याचा कट रचला असा गंभीर आरोपही करण्यात आलाय.
कुकी समाजाच्यावतीने जाहीर सभा बोलावली
12 जून रोजी कांगपोकपी जिल्ह्यात कुकी समाजाच्यावतीने जाहीर सभा बोलावण्यात आली होती.
सदर हिल्स आदिवासी एकता समितीने ही हाक दिली होती.या सभेला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
यामध्ये गावचे सरपंच, नागरी समाज व अनेक प्रमुख कुकी नेते सहभागी झाले होते.
मेईतेई लेपूनचे प्रमुख प्रमोत सिंग यांच्या वक्तव्याचा बैठकीत निषेध करण्यात आला.
यामध्ये त्यांनी कुकी समाज हे राज्याबाहेरचे असल्याचे सांगितले होते.
सिंह यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, कुकी समुदाय मणिपूरचा नाही.
इंग्रजांनी त्यांना येथे आणून स्थायिक केले होते.मेईतेई आणि नागा लोकांनी त्यांना येथे राहण्यासाठी जमिनी दिल्या. त्यांनी आमचे आभार मानले पाहिजेत.
भाजप आरएसएस वर आरोप निवडणुका जिंकण्यासाठी घेतली होती मदत
मणिपूरमधील मेतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक संघर्ष हा गेल्या एक महिन्याहून अधिक काळापासून सुरूच आहे. या संघर्षात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले असून अजूनही हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. मणिपूरमधील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने हिंसाचारासाठी कुकी दहशतवादी संघटनांना वारंवार जबाबदार धरले आहे. त्याचबरोबर कुकी समाज राज्य सरकारवर प्रचंड नाराज आहे. मणिपूरमधील परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शांतता समितीला विरोध केला आहे.
कुकी संघटनांनी मुख्यमंत्री एन.बिरेन सिंग यांचा समितीत समावेश करण्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. दरम्यान, कुकी बंडखोर संघटनेच्या एका नेत्याने एका पत्रात दावा केला आहे की भाजपने 2017 मध्ये मणिपूर विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कुकी संघटनांची मदत घेतली होती.इंडिया टुडे NE च्या वृत्तानुसार, कुकी बंडखोर संघटनेच्या नेत्याने 2019 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले होते. 2017 मध्ये मणिपूर विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचे दोन नेते हिमंता बिस्वा सरमा आणि आरएसएस चे राम माधव यांनी कुकी संघटनांची मदत घेतल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. आसामचे विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि राम माधव हे तेव्हा ईशान्येकडील राज्यांमध्ये सक्रिय होते. 2017 मध्ये, भाजप पहिल्यांदा मणिपूरमध्ये सत्तेवर आला आणि मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले.
अहवालानुसार, 8 जून 2023 रोजी हे पत्र एनआयए न्यायालयात युनायटेड कुकी लिबरेशन फ्रंट (UKLF) चे अध्यक्ष एसएस हाओकिप यांच्या वतीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रासोबत जोडले होते. एसएस हाओकीप यांच्यावर काँग्रेसचे माजी आमदार युमथोंग हाओकीप यांच्याकडून अवैध शस्त्रे खरेदी केल्याचा आरोप आहे. एसएस हाओकीपने विकत घेतलेल्या 10 पिस्तुले राज्य पोलिसांच्या शस्त्रागारातून चोरीला गेल्याचा आरोप आहे. युमथोंग हाओकिपला 24 ऑगस्ट 2018 रोजी दहशतवादी संघटनांना चोरीची शस्त्रे पुरवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.
अहवालानुसार, UKLF नेत्याने पत्रात आरोप केला आहे की हिमंता बिस्वा सरमा आणि राम माधव यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन त्यांची संघटना आणि अन्य कुकी संघटना युनायटेड पीपल्स फ्रंट (UPF) सोबत करार केला होता. या अंतर्गत त्यांना भाजपच्या उमेदवारांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत करायची होती.पत्रात UKLF नेत्याने म्हटले आहे,””राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्यात मी महत्त्वाची भूमिका बजावली होती. खरे सांगायचे तर, जर त्यांना आमचा पाठिंबा नसता तर राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करणे जवळपास अशक्य झाले असते. आमच्या अभियानक्षेत्रात भाजपच्या उमेदवाराने 80-90 टक्के मते मिळवली.”
आता एसएस हाओकीप यांनी आरोप केला आहे की,
अवैधरित्या खरेदी केलेले पिस्तूल परत करूनही त्यांना शस्त्र खरेदी प्रकरणात खोटे गोवण्यात आले आहे.
या प्रकरणात दिलासा मागताना त्यांनी अमित शहांनी भाजपवर केलेल्या “उपकारांचा” उल्लेख केला.
दरम्यान, राम माधव यांनी एसएस हाओकिप यांचे दावे फेटाळून लावले आहेत.राम माधव म्हणाले “निवडणूक प्रचारादरम्यान विविध क्षेत्रातील अनेक लोक आम्हाला भेटायला येतात. तथापि, मला या व्यक्तीला किंवा कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या नेत्यांना भेटल्याचे आठवत नाही. अशा परिस्थितीत त्यांची मदत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या बळावर आणि जनतेच्या पाठिंब्यावर निवडणूक जिंकतो.”
एसएस हाओकीप यांच्या या दाव्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हे वृत्त लिहेपर्यंत सीएम सरमा यांनी इंडिया टुडे एनईच्या कॉल आणि मेसेजला प्रतिसाद दिला नाही.
मणिपूर मध्ये हिंसाचार होण्याचं नेमकं काय कारण आहे जाणून घ्या
शत्रुत्वाची आग अनेक दशकांपासून धगधगत आहे.मणिपूरमध्ये 16 जिल्हे आहेत.
राज्याची जमीन इम्फाळ खोरे आणि डोंगराळ (पर्वतीय) जिल्ह्यांमध्ये विभागली गेली आहे.
इम्फाळ खोऱ्यात (मैतेई) मेईतेईचे वर्चस्व आहे.मैतेई किंवा मीताई जातीचे लोक हिंदू धर्मीय असल्याचे म्हटले जात आहे.
डोंगरी जिल्ह्यांमध्ये नागा आणि कुकी जमातींचे प्राबल्य आहे.अलीकडचा हिंसाचार चुरचंदपूर पर्वतीय जिल्ह्यांमध्ये अधिक दिसला.
येथे राहणारे लोक कुकी आणि नागा ख्रिश्चन आहेत. चार पर्वतीय जिल्ह्यांमध्ये कुकी जातीचे प्राबल्य आहे.
मणिपूरचे आदिवासी गट मेईतींना एसटी प्रवर्गाचा दर्जा देण्याच्या विरोधात का आहेत?
मणिपूरच्या आदिवासी गटांचे म्हणणे आहे की ( मैतेई ) मेईतेईची लोकसंख्या आणि राजकीय वर्चस्व आहे.याशिवाय वाचन-लेखनासोबतच इतर बाबतीतही ते पुढे आहेत.येथील आदिवासी समूहांना वाटते की, ( मैतेई ) मेईतींनाही अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाल्यास त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी कमी होतील आणि ( मैतेई ) मेईतीं डोंगरावरही जमीन खरेदी करू लागतील.अशा परिस्थितीत ते आणखी दुर्लक्षित होतील.
मणिपूरच्या ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनचे म्हणणे आहे की,मेईतेई समुदायाची भाषा संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे आणि त्यातील अनेकांना अनुसूचित जाती,मागास जाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग म्हणजेच EWS चे लाभ मिळत आहेत.जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील व्याख्याते थोंगखोलाल हाओकीप यांनी ‘मणिपूरमधील अनुसूचित जमातीच्या स्थितीचे राजकारण’ मध्ये लिहिले आहे, “राज्यातील मेईतेई समुदायाला जमातीचा दर्जा देण्याची मागणी हा राजकीय खेळ आहे.”
2017 मध्ये मणिपूरच्या ऑल मणिपूर ट्रायबल युनियनचे सदस्य राहिलेले केल्विन नेहसियाल यांनी इंडिया टुडेला सांगितले की एन बीरेन सिंग मुख्यमंत्री झाल्यानंतर ही समस्या सुरू झाली. केल्विनचा दावा आहे की भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाला कुकी जिल्ह्यांमध्ये पेट्रोलियमचे समृद्ध साठे आणि इतर खनिजांचे साठे सापडले आहेत. ते आरोप करतात की ( मैतेई ) मेईतेई समाजातील लोक राज्य यंत्रणा चालवतात आणि आता त्यांना त्यांच्याकडून सर्व काही लुटायचे आहे.
Biparjoy:’बिपरजॉय’ म्हणजे काय? वादळाना नाव कोण देतं? जाणून घ्या
जात चोरी : उपसंचालक डॉ जसवंत दहिया ला अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 14, JUN 2023, 20:20 PM
WebTitle – Violence again in Manipur, 9 killed in firing in Khamen Lok