नवी दिल्ली: सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका हेड कॉन्स्टेबलने गेल्या अनेक दिवसांपासून संघर्षग्रस्त असणाऱ्या मणिपूर मध्येच एका किराणा दुकानात एका स्त्री ची छेडखानी करताना हे दृश्य दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं असून सीमा सुरक्षा दलाने या बीएसएफ जवान ला निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे.या बीएसएफ जवान वर सदर कृत्याबद्दल गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.मणिपूर येथील दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची परेड करत रस्त्यावर अत्याचार करतानाचे व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाल्यानंतर देशात खळबळ माजली ते प्रकरण अजून शांत झालेलं नाही,या पार्श्वभूमीवर मणिपूर मध्येच एका स्त्री संदर्भात अशाप्रकारे ही घटना समोर आल्याने पायाखालची जमीनच सरकून गेलीय.आता दाद मागायची कुठे? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
स्टोअरमधील सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहे,
त्यात एक पुरुष बीएसएफ च्या गणवेशात INSAS रायफल घेऊन दिसला – नंतर झालेल्या तपासात
त्याची ओळख हेड कॉन्स्टेबल सतीश प्रसाद म्हणून ओळख झालीय – व्हिडिओ मध्ये तो स्त्री ला पकडत असल्याचे दिसतआहे.
हिंदुस्तान टाइम्स च्या वृत्तानुसार “इम्फाळमध्ये २० जुलै रोजी पेट्रोल पंपाजवळील एका दुकानात ही घटना घडली,अशी माहिती समोर आलीय.आरोपीचं नाव हेड कॉन्स्टेबल सतीश प्रसाद असं आहे. तसेच त्याला निलंबित करण्यात आले आहे आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे,” असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. म्हणजे दोन महिलांचे व्हिडिओ व्हायरल होऊन त्यावर देशभरात गदारोळ होऊन दोन दिवसांनी ही घटना घडलीय.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तक्रार आल्यानंतर बीएसएफने आरोपीविरुद्ध अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. “त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर विभागीय कार्यवाही सुरू करण्यात आली आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
इंटरनेट बंदी अंशतः उठवली
मैतेई समुदायाकडून अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या निषेधार्थ ‘आदिवासी एकता मार्च’ नंतर
मणिपूर मध्ये 3 मे रोजी मैतेई आणि कुकी यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत
160 हून अधिक लोक मारले गेले असून अनेक जखमी झाल्याची माहिती समोर आलीय.
मंगळवारी, मणिपूर सरकारने मोबाइल इंटरनेटवरील बंदी कायम ठेवत
ब्रॉडबँड सेवेला सशर्त परवानगी देऊन इंटरनेट बंदी अंशतः उठवली असल्याचे कळते.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 25,2023 | 21:51 PM
WebTitle – Video: Shockingly, BSF jawan suspended for molesting Manipur woman in shopping mall