पुणे : देशात अनुषंगाने कोणत्याही राज्यात स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यातही तरुण मुलींचा प्रश्न आणखी गंभीर आहे. प्रेमप्रकरण,एकतर्फी प्रेमप्रकरण,एकतर्फी प्रेमातून हल्ला यातून हत्या करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.दिल्लीत अशीच एक घटना घडली होती,ज्यात पीडित तरुणीचा बळी गेला,लोक आपण त्या गावचेच नाही असं वागत बाजूने जात होते.पुण्यात मात्र ही घटना अपवाद ठरली.भरदिवसा तरुणीचा कोयता घेऊन पाठलाग करत वार करणाऱ्या नराधम तरुणाला लोकांच्या धाडस व समयसुचकतेने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
एकतर्फी प्रेमातून हल्ला;पुणे करांनी पकडला हल्लेखोर
ही घटना सदाशिव पेठ भागातील असून कोयता घेऊन वार करत पाठलाग करणाऱ्या नराधम व्यक्तीचे
नाव शंतनू लक्ष्मण जाधव असं असल्याचे समजते.तर प्रिती रामचंद्र असे २० वर्षीय पीडितेचे नाव आहे.
सलवार आणि सूट घातलेली महिला, तिच्या पाठीवर सॅक असून, शर्ट आणि पॅन्ट आणि चप्पल घालून असलेला नराधम शंतनू लक्ष्मण जाधव हा तिच्या मागे रस्त्यावर धावताना दिसतो.शंतनू लक्ष्मण जाधव तिचा पाठलाग करत असल्याचेसिसिटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. शंतनू लक्ष्मण जाधव ने तिच्या पाठीवर वार केला,तेव्हा ती तोंडावर पडली. त्यानंतर त्याने डोक्यावर वार केला असे व्हिडिओमध्ये दिसून आले आहे.दरम्यान लोक आरडाओरडा करायला लागले.काहींनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता,लोकांच्या अंगावर देखील तो धावत वार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसते आहे.
घरी कळवल्यामुळे हा विकृत नराधम पिसाळला
हा विकृत नराधम गेल्या अनेक दिवसांपासून पीडित तरुणीला त्रास देत होता,पाठलाग करत होता,तसेच बोलण्यास दबाव टाकत होता,त्यामुळे वैतागलेल्या तरुणीने ही बाब आईला सांगितली,तरुणीच्या घरच्यांनी ही बाब विकृत नराधम तरुणाच्या घरी कळवली तेव्हा त्याच्या बापाने मी त्याला बघतो म्हणून वेळ मारून नेली,घरी कळवल्यामुळे हा विकृत नराधम पिसाळला आणि त्याने या तरुणीला संपविण्याचा निर्णय घेत कोयता घेत तीचा पाठलाग करू लागला.यावेळी त्याने या मुलीसोबत असणाऱ्या तरुणावर देखील वार केल्याची माहिती कळते.या तरुणाच्या हातावर वार झाल्यानंतर हा तरुण मुलीला सोडून पळून गेल्याचे व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे.
देशात अनेक घटना घडल्या,त्यात अनेक निष्पाप तरुणींना जीव गमवावा लागला आहे.
एकतर्फी प्रेमाची फार मोठी किंमत त्यांना कोणतीही चूक नसताना चुकवावी लागली.
अर्थातच अशा घटना घडत असताना,”बघ्या समाज” हा सर्वात मोठा गुन्हेगार असतो.कारण त्याचे काहीही न करणं,
विरोध,अटकाव न करणं,किंवा केवळ मोबाईल मध्ये शूट करत राहणं हे अशा नराधम विकृतांना बळ देणारंच ठरत आलं आहे.
हे अनेक घटनांच्यामाध्यमातून समोर आलंय.मात्र यावेळी ही चेन तुटली आहे.अन त्यामुळे तरुणीचा जीव वाचला आहे.
यशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी धाडस दाखवत समाज म्हणजे काय असतो याची प्रचिती आणून दिली.त्यामुळे खाडकन थोबाडीत मारत त्यांनी समाजाला झोपेतून उठवले आहे.आता समाज त्यांचे कौतुक करत आहे,सत्कार करत आहे,ही चांगली गोष्ट आहे.पण आपल्या प्रत्येकात यशपाल जवळगे आणि हर्षद पाटील आहेत,फक्त मला काय करायचं? मी का? असले प्रश्न न पडता ही माझीच जबाबदारी आहे असं म्हणून जेव्हा समाजातील सुशिक्षित तरुण अशा घटनांच्यावेळी भूमिका घेत पुढे येतील तेव्हा खऱ्या अर्थाने देशातील स्त्रिया सुरक्षित होण्यास मदत होईल असं आम्हाला वाटतं.सरकार आश्वासने अन गाजर दाखवत राहिलच आपण समाज म्हणून आपली जबाबदारी अगोदर पार पाडू.
पुण्याचे पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी सांगितले की, हल्लेखोराला अटक करण्यात आली असून
त्याच्यावर खुनाचा प्रयत्न (भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमेरिकेतील रस्त्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव
भगवान बुद्ध अस्थि दर्शन ,सुट्टी न दिल्याने उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी दिला राजीनामा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 27 JUN 2023, 17:14 PM
WebTitle – Video : Attack due to one-sided love; Punekar yashpal jawalge harshad patil caught the attacker