वंचित युवा आघाडी ने घेराव घालण्याच्या इशारा देताच महाज्योती कडून तातडीने १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्ती मंजूर – राजेंद्र पातोडे.
नागपूर, दि. २८ – महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) कडून १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची सहा महिने पासून अधिछात्रवृत्तीसाठी अडवणूक करण्यात येत असून ३० एप्रिल पर्यंत अधिछात्रवृत्ती न दिल्यास वंचित युवा आघाडी महाज्योती कार्यालयास
घेराव घालणार असल्याचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीने दिला होता त्यावर आज मंत्री अतुल सावे आणि संचालक मंडळाने तातडीने बैठक घेऊन १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्ती मंजूर केली असून पंधरा दिवसांत विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचा निरोप बार्टी प्रकल्प व्यवस्थापक ह्यांनी दिला असून घेराव घालू नका असा आर्जव करण्यात आल्याची माहिती प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी दिली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) १२२६ ओबीसी संशोधक विद्यार्थीना अधिछात्रवृत्ती मंजूर होऊन
सहा महिने उलटले असले तरी एकाही विद्यार्थ्यांस त्याचा लाभ मिळालेला नव्हता.
शासना कडून व संचालक मंडळा कडून ओबीसी विद्यार्थ्यांच्या संशोधनामध्ये आडकाठी आणली जात असल्याने
महाज्योती कडून १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची सहा महिने पासून अडवणूक होत असून ३० एप्रिल पर्यंत
अधिछात्रवृत्ती न दिल्यास वंचित युवा आघाडी कडून घेराव घालुन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.
इशारा देताच आज संचालक मंडळ खडबडून जागे झाले आणि आजच्या बैठकीत अधिछात्रवृत्ती मंजूर करण्यात आली.
ह्या बैठकीत इतर मागासवर्गीय बहूजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे,
इतर मागासवर्गीय बहूजन कल्याण विभागाचे संचालक दिनेश ढोके आणि महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले
व अधिकारी आणि संभाजी नगर मधून आलेले काही विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
त्यांनी तातडीने अधिछात्रवृत्ती मंजूर करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे गेली सहा महिने अधिछात्रवृत्ती मंजूरीची प्रतीक्षा करणारे १२२६ ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे.
संचालक मंडळाने हा निर्णय घेतला असून १५ दिवसात विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती दिली जाणार असल्याने ३० एप्रिल २०२३ वंचित बहूजन युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष डॉ निलेश विश्वकर्मा आणि महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांचे नेतृत्वाखाली १२२६ ओबीसी संशोधक विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाज्योती कार्यालयास घेराव घालण्याचे आंदोलन करू नये अशी विनंती महाज्योती चे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल सिरसाठे ह्यांनी ह्या 9767599934 मोबाईल क्रमांकावरून केली.
‘महाज्योती’च्या वतीने इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांचा अधिछात्रवृत्ती प्रश्न मार्गी लागल्याने वंचित युवा आघाडी ने
३० तारखेचे प्रस्तावित ‘घेराव आंदोलन’ स्थगित केले आहे.

राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
9422160101
कॅलिफोर्निया मध्ये जातीय भेदभाव विरोधी कायदा संमत
UK मध्ये आंबेडकर जयंती जल्लोष, हर्षोल्हासात साजरी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 28,2023 18:45 PM
WebTitle – Vanchit Yuva Aghadi success, Mahajyoti has approved the scholarship of 1226 OBC students