मुंबई, दि.19 : लसीकरणास सुरुवात ! राज्यात आजपासून ( दि.१९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणास सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे शनिवार १९ जून पासून ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.
शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे.
३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन ॲप मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत.
विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक,
जिल्हा शल्यचिकिस्तक, जिल्हा आरोग्यधिकारी यांना त्याबाबत पत्र पाठविले असून
संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सोबतच काही जिल्ह्यांतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत होणार वाढ आणि लॉकडाउन शिथील होताच बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यामुळे राज्यसरकारकडून पुन्हा कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी ट्विट करून सांगितले की, “कोव्होवॅक्स ची (Covovax )पहिली बॅच तयार झाली असून ती पाहण्यास उत्सुक आहे.18 वर्षापेक्षा कमी वयाच्या भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण करण्यासाठी या लसीमध्ये बरीच क्षमता आहे. चाचण्या चालू आहेत. टीम ने चांगली कामगिरी केली.”
Covovax:अठरा व त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी पहिली बॅच सज्ज
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on JUN 19, 2021 09 : 48 AM
WebTitle – Vaccination of citizens of this age group started in the state from today 2021-06-19