उत्तरप्रदेश, दि.27 : आगामी काळात उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींबाबत, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी एक मोठी घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावर च लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच, मागील काही दिवसांपासून या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपा व एमआयएम यांच्यात आघाडी होणार असल्याच्या चर्चा प्रसार माध्यमातून सुरू होत्या, त्यावर देखील मायावतींनी भूमिका स्पष्ट केली आहे. बसपा व एमआयएम यांच्यातील आघाडीबाबतच्या चर्चा संपूर्णपणे चुकीच्या आहेत, यामध्ये काहीच तथ्य नाही. असं मायावतींनी म्हटलं आहे.
बसपा प्रमुख मायावतींनी यासंदर्भात ट्विटद्वारे माहिती दिली आहे, ”माध्यामातील एक वृत्तवाहिनीकडून कालपासून अशी बातमी दाखवली जात आहे की, उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभेची निवडणूक ओवेसींचा पक्ष एमआयएम व बसपा एकत्र मिळून लढणार आहेत. हे वृत्त पूर्णपणे चुकीचे, अफवा पसरवणारे, तथ्यहीन आहे. यामध्ये काडीमात्रही सत्य नाही. बसपा या वृत्ताचे खंडण करते.”
1. मीडिया के एक न्यूज चैनल में कल से यह खबर प्रसारित की जा रही है कि यूपी में आगामी विधानसभा आमचुनाव औवेसी की पार्टी AIMIM व बीएसपी मिलकर लड़ेगी। यह खबर पूर्णतः गलत, भ्रामक व तथ्यहीन है। इसमें रत्तीभर भी सच्चाई नहीं है तथा बीएसपी इसका जोरदार खण्डन करती है। 1/2
— Mayawati (@Mayawati) June 27, 2021
”या संदर्भात पार्टीकडून पुन्हा असं स्पष्ट केलं जातं की, पंजाब सोडून उत्तरप्रदेश व उत्तराखंड मधील पुढील वर्षी सुरू होणाऱ्या विधानसभेची निवडणूक बीएसपी कोणत्याही पक्षाशी आघाडी करून लढणार नाही. म्हणजे,बसपा स्वबळावर च निवडणूक लढवणार.”
2. वैसे इस सम्बन्ध में पार्टी द्वारा फिरसे यह स्पष्ट किया जाता है कि पंजाब को छोड़कर, यूपी व उत्तराखण्ड प्रदेश में अगले वर्ष के प्रारंभ में होने वाला विधानसभा का यह आमचुनाव बीएसपी किसी भी पार्टी के साथ कोई भी गठबन्धन करके नहीं लड़ेगी अर्थात् अकेले ही लड़ेगी। 2/2
— Mayawati (@Mayawati) June 27, 2021
भ्रामक बातम्याच्या पार्श्वभूमीवर बसपाने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभा खासदार सतीशचंद्र मिश्र यांना बीएसपी मिडिया सेलचे राष्ट्रीय समन्वयक बनवले आहे.
3. बीएसपी के बारे में इस किस्म की मनगढ़न्त व भ्रमित करने वाली खबरों को खास ध्यान में रखकर ही अब बीएसपी के राष्ट्रीय महासचिव व राज्यसभा सांसद श्री सतीश चन्द्र मिश्र को बीएसपी मीडिया सेल का राष्ट्रीय कोओर्डिनेटर बना दिया गया है। 3/4
— Mayawati (@Mayawati) June 27, 2021
पंजाबमध्ये २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होत आहे.
Urban Dictionary वेबसाईटवरुन डॉ. बाबासाहेब आणि मायावतींच्याबाबतीत आक्षेपार्ह मजकूर; लोकांचा उद्रेक
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUN 27 , 2021 13: 00 PM
WebTitle – Uttar Pradesh, Uttarakhand Assembly BSP will fight on its own Mayawati did it clearly 2021-06-27