उत्तर प्रदेश: राज्यमंत्र्यांसह भाजप चे 2 बडे नेते आणि वकील सेक्स स्कँडल मध्ये गुंतल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.मेरठचे वरिष्ठ वकील आणि मेरठ बार असोसिएशनचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष रमेशचंद्र गुप्ता यांच्याविरुद्ध पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो कायद्याची कलमे वाढवली आहेत. हे प्रकरण रमेश चंद्र गुप्ता यांच्या अल्पवयीन कर्मचाऱ्याशी संबंधित आहे ,या अल्पवयीन मुलीने त्याच्यावर ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. कोर्टात दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी रमेशचंद्र गुप्ता याच्याशिवाय भाजप च्या दोन बड्या नेत्यांनाही या प्रकरणात (सेक्स स्कँडल मध्ये आरोपी) लैंगिक शोषणाचे आरोपी केले आहे. आता वकील आणि नेत्यांवर अटकेची टांगती तलवार आहे.
वकिलाच्या एका चुकीमुळे भाजप चे हे सेक्स स्कँडल झालं जगजाहीर
भारत समाचार ने दिलेल्या वृत्तानुसार, 9 जून रोजी मेरठचे ज्येष्ठ वकील रमेशचंद्र गुप्ता याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यातील एका व्हिडिओमध्ये रमेशचंद्र गुप्ता आरशासमोर बसून स्वत:सोबत अश्लील कृत्य करत असल्याचा व्हिडीओ बनवताना चित्रित झालं होतं.हा व्हिडिओ त्याने त्याच्या अल्पवयीन कर्मचारी मुलीला पाठवला होता.दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत आणखी एक महिला कर्मचारी आहे. तो खुर्चीवर बसला आहे आणि कर्मचारी जमिनीवर आहे. हा व्हिडीओ टेबलच्या वरून शूट केलेला आहे. याशिवाय आणखी दोन व्हिडिओ मध्ये रमेशचंद्र गुप्ता आपल्या जोडीदारासोबत संभोग करताना दिसत आहे.
हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रमेशचंद्र गुप्ता याने या सगळ्याचं खापर त्याच्या अल्पवयीन कर्मचारी मुलीवरच फोडलं.
त्याने खुलासा केला की अल्पवयीन कर्मचारी 26 मे 2023 रोजी त्याचा एक मोबाईल फोन घेऊन बेपत्ता झाली आहे.
या फोनमध्ये वकिलांसह अनेक अधिकारी आणि भाजप नेत्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ आहेत,
ज्यांची संख्या शंभरहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारत समाचारच्या कॅमेऱ्यात आरोपीचे वकील रमेशचंद्र गुप्ता यांनी हा मोबाइल केवळ शूटिंगसाठी वापरला होता,
त्यामुळे या फोनमध्ये सिम नाही, असे मान्य केले आहे.
अल्पवयीन कर्मचारी बेपत्ता झाल्याप्रकरणी 27 मे 2023 रोजी गुन्हा क्रमांक 170 नोंदवण्यात आला होता.
या प्रकरणात अपहरणाच्या कलमाचाही समावेश करण्यात आला होता.
असे असतानाही गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस शांत बसले.अशी धक्कादायक माहिती समोर आलीय.
तक्रार करताच मैत्रीचे रूपांतर ब्लॅकमेलिंगमध्ये झाले-
वरिष्ठ अधिवक्ता रमेशचंद्र गुप्ता यांनी भारत न्यूजला कॅमेरासमोर कबूल केले होते की तो अल्पवयीन पीडित तसेच व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत जमिनीवर दिसणाऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. अल्पवयीन पीडितेला ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे होते, असा दावा त्याने केला.दरम्यान, अल्पवयीन पीडितेने दिलेले तक्रार पत्र माध्यमांमध्ये आले. हे तक्रार पत्र मेरठ बार असोसिएशनचे अध्यक्ष कुंवरपाल शर्मा यांना ३१ मे रोजी देण्यात आले होते. कुंवरपाल शर्मा यांनी पुष्टी केली की 31 मे व्यतिरिक्त पीडिता तीनदा त्याला भेटायला आली होती.
पोलिस झोप घेत राहिले, आरोपी सेक्स रॅकेट ची ‘सेंटिग’ करण्याचा प्रयत्न करत राहिले.
दौराला पोलिसांनी अल्पवयीन पीडितेच्या अपहरणाच्या प्रकरणात कोणतेही फोटो प्रसारित केले नाहीत.
किंवा तिच्या कॉल रेकॉर्डचा सीडीआर काढून तिचे स्थान शोधण्याचा प्रयत्न केला नाही.
11 जून रोजी, ही बातमी भारत समाचारने ठळकपणे दर्शविली,
त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि बेपत्ता होण्याशी संबंधित लोकांची चौकशी केली.
त्यानंतर मध्यरात्री आरोपी वकील रमेशचंद्र गुप्ता यांच्या जुन्या स्टाफ ची पोलिसांनी कसून चौकशी केली.
चार दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी अल्पवयीन पीडितेला दौराला परिसरातूनच ताब्यात घेतलं.
दुसऱ्या दिवशी न्यायदंडाधिकार्यांसमोर हजर करत तीचा जबाब नोंदवण्यात आला.
पीडितेच्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या जबानीत उघड झाले यातले सेक्स रॅकेट नराधम
CrPC च्या कलम 164 अंतर्गत नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी अल्पवयीन पीडितेच्या अपहरण प्रकरणात आरोपी वकील रमेशचंद्र गुप्ताविरुद्ध लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि बलात्काराच्या कलमांमध्ये वाढ केली आहे. या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे महानगर सरचिटणीस अरविंद गुप्ता मारवाडी यांनाही आरोपी करण्यात आले आहे.अरविंद गुप्ता मारवाडी हा मुख्य आरोपी वकील रमेश चंद्र गुप्ता याचा मामा आहे. अल्पवयीन पीडित मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या अपहरणाचा गुन्हा दौराला पोलिसांनी अरविंद गुप्ता मारवाडी यांच्या प्रभावाखाली दाखल केला होता. पीडितेच्या चुलत भावाने गुन्हा दाखल केला होता आणि तो आरोपी रमेशचंद्र गुप्ताच्या सतत संपर्कात होता.
रमेशचंद्र गुप्ता याने तिला अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध केले आणि नंतर तिचे नग्न छायाचित्र काढले,
असे पीडितेने आपल्या जबानीत म्हटले आहे. या छायाचित्रांच्या आधारे पीडितेवर अनेक महिने लैंगिक अत्याचार करण्यात आले.
आरोपी वकील तिला त्याच्या कोर्ट ऑफिसशिवाय सदर बाजार ऑफिसमध्ये
आणि त्याच्या घरातील तळमजल्यावरच्या ऑफिसमध्ये घेऊन जात असे.
जेव्हा आरोपीची पत्नी घरी राहत नसे तेव्हाही अनेकदा पीडितेवर बलात्कार करण्यात आला.
पीडितेने अन्य आरोपी अरविंद गुप्ता मारवाडीसोबतही हीच गोष्ट पुन्हा सांगितली आहे.
तिच्यावर अनेकवेळा बलात्कार झाल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.
आगामी काळात होणाऱ्या महानगराध्यक्षपदासाठी अरविंद गुप्ता मारवाडी निवडणुकीच्या शर्यतीत असल्याचीही चर्चा आहे.
मामाची सेक्सटेप समोर आल्यानंतर,ते या प्रकरणात सक्रिय दिसले आणि त्यांच्या विरोधकांनी या प्रकरणाला खतपाणी घालण्याचे काम केले.
संघापासून संघटनेपर्यंत मजबूत पकड असलेलं सिक्का याचंही रॅकेट मध्ये नाव
भाजप चे दिग्गज नेते आणि उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री संजीव गोयल सिक्का याचेही नाव या सेक्स स्कँडल प्रकरणात पुढे आले आहे. संजीव गोयल सिक्का हे आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 354 (3/4) अंतर्गत आरोपी आहेत. संजीव गोयल सिक्का हे आरोपी रमेश चंद्र गुप्ता यांचे जवळचे मित्र आहेत. याशिवाय ते एकमेकांचे नातेवाईक असल्याचेही बोलले जातेय.संजीव गोयल सिक्का यांच्यावरही पीडितेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, संजीवगोयल सिक्का यांनी पीडितेला सोबत भाजपच्या अनेक कार्यक्रमांमध्ये नेले आणि रात्री तिला हॉटेलमध्ये ठेवले होते.
आरोपी शहरात मोकाट फिरत असून, त्याला पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.
या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, या प्रकरणात भाजप नेत्यांच्या विरोधात तक्रार जबाब आणि काही पुरावे आहेत. इलेक्ट्रॉनिक सर्विलांसच्या मदतीने उर्वरित पुरावे गोळा केले जात असून सर्व पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
या प्रकरणात नाव आल्यानंतर भाजपचा एक नेता भूमिगत असून त्याचा फोन बंद आहे. मुख्य आरोपी रमेशचंद्र गुप्ता याला शनिवारी शहरात तसेच न्यायालयात फिरताना पाहण्यात आले. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो फरार असून त्याच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत.
वयाच्या ६८ व्या वर्षी वकिलाने बनवले होते सेक्स सिंडिकेट
रमेशचंद्र गुप्ता हे वेश्याव्यवसायाशी संबंधित सिंडिकेटचे मोठे पात्र असल्याचे सांगितले जात आहे. रमेशचंद्र गुप्ता यांच्याकडे अशा सुमारे डझनभर मुली अशा कर्मचारी आहेत ज्या कायद्याच्या वकिलही नाहीत. असे असले तरी रमेशचंद्र गुप्तांना आपले कनिष्ठ म्हणवून लोकांना प्रभावित करायचे. मेरठ न्यायालयाच्या वकिलांच्या अनेक व्हॉट्सॲप ग्रुपमध्येही या मुलींचा सहभाग होता.
त्यांचे अनेक कज्युनिअर वकिलांशी संबंध असल्याचेही सांगितले जाते. याशिवाय अशीही चर्चा आहे की आरोपी वकिलाचा व्हिडिओ व्हायरल करण्यामागे वकिली व्यवसायाशी संबंधित अनेकांना आरोपी वकिलाकडून पैसे वसूल करायचे होते. हा वकील अल्पवयीन पीडित तसेच रमेश चंद्र गुप्ता यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अनेक मुलींच्या थेट संपर्कात होता, असेही समोर आले आहे.
त्यांच्यापैकी अनेकांच्या सोशल मीडिया ॲपवर त्यांच्याशी व्हॉट्सॲपप चॅट्सही आहेत. विधी व्यवसायाशी संबंधित अनेक अधिकारीही या सिंडिकेटचा भाग असल्याचे बोलले जात आहे. सध्या पोलिस पुराव्याच्या आधारे संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.एकूणच हे सेक्स कांड हिम नगाचे टोक असून यात आणखी बडे बडे मासे अडकण्याची शक्यता आहे.
बाकी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ हा भाजपा च नारा आहेच.
आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?
अपने @jaaglyabharat के टेलिग्राम चॅनेल में एड हो जाए,ताजा अपडेट्स पाए ..
First Published by Team Jaaglya Bharat on 18, JUN 2023, 15:10 PM
WebTitle – Uttar Pradesh state minister along with 2 big BJP leaders and lawyers accused in sex scandal