कुशीनगर : यूपीच्या कुशीनगरमधून बनावट कागदपत्रे बनवल्याची घटना समोर आली आहे. उत्कर्ष पांडे नावाच्या तरुणाने वायूदलात फ्लाइट लेफ्टनंट असल्याचे भासवून गावात कौतुक सत्कार सोहळे करवून घेतले, त्यानंतर एअरफोर्स ऑफिसर बनून बेरोजगार तरुणांना नोकरीत लावण्याच्या नावाखाली आरोपी होतकरू तरुणांची लाखोंची फसवणूक करायचा. लखनऊ एसटीएफ टीमने मिलिटरी इंटेलिजन्स टीमसह या बनावट फ्लाइंग लेफ्टनंट उत्कर्ष पांडे Utkarsh Pandey Kushinagar ला अटक करत त्याचं नीटपणे लॅंडींग केलेलं आहे.
प्रथमदर्शनी हे प्रकरण साधी फसवणूक असल्याचे एसटीएफला वाटले. मात्र आरोपीची चौकशी होताच एसटीएफही चक्रावून गेले. उत्कर्ष या तरुण मुलाने हा गुन्हा कसा केला त्यामागील कथा जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.त्याच्या जाळ्यात केवळ बेरोजगारच अडकले नाहीत, तर काही राजकीय नेतेही अडकले. काही दिवसांपूर्वी एक आमदार आणि खासदार त्यांच्या मुलीसाठी सुयोग्य स्थळ म्हणून उत्कर्ष पांडे च्या घरी पोहोचले होते. तीन वर्षांपासून फसवणूक करणाऱ्या उत्कर्ष पांडे ला यूपी एसटीएफने मिलिटरी इंटेलिजन्सच्या माहितीवरून चिनहट येथून अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया
कुशीनगर येथील रहिवासी असलेल्या उत्कर्ष पांडे ला Utkarsh Pandey Kushinagar सैन्यात भरती व्हायचे होते. त्यासाठी तो एनडीएची तयारीही करत होता. त्याच्या गावात राहणारा त्याचा मित्रही एनडीएची तयारी करत होता. उत्कर्ष पांडेने 2020 मध्ये एनडीएची परीक्षा दिली होती. त्यासोबत त्याच्या मित्रानेही एनडीएची परीक्षा दिली. पण त्याचा मित्र प्रवीण तिवारी परीक्षेत पास झाला, पण उत्कर्ष पास होऊ शकला नाही. उत्कर्ष पांडे चा प्रवीण तिवारी मित्र पास झाला मात्र स्वतःच्या अपयशामुळे उत्कर्ष पांडेUtkarsh Pandey Kushinagar Fake Flying Lieutenant खूप दुखावला गेला. परीक्षेत नापास झाल्यामुळे कुटुंबात आणि गावात अपमान सहन करावा लागेल, असे त्यांना वाटत होते. हे टाळण्यासाठी त्याने स्वत:ला फ्लाइंग लेफ्टनंट म्हणून सांगायला सुरुवात केली.
स्वत:ला फ्लाइंग लेफ्टनंट बनवले
मिळालेल्या माहितीनुसार, उत्कर्ष पांडे ने Utkarsh Pandey Kushinagar स्वत:ला फ्लाइंग लेफ्टनंट घोषित केले.
आपली निवड झाली असून तो वायुसेनेचा अधिकारी झाला असल्याचे त्याने कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना सांगितले.
त्यानंतर तो प्रशिक्षणाच्या नावाखाली कुटुंबीयांची दिशाभूल करत राहिला.त्याने एक खोलीही भाड्याने घेतली आणि त्यात वेगळा राहू लागला.
वर्तमान पत्रातून कौतुकाचा वर्षाव
उत्कर्ष पांडे ने Utkarsh Pandey Kushinagar स्वत:ला फ्लाइंग लेफ्टनंट घोषित केल्यानंतर
हिंदी भाषिक वृत्तपत्रांनी त्याचे कौतुक केले,सत्कार सोहळे कव्हर केले.
त्याने शिक्षण घेतलेल्या कुशीनगर येथील हनुमान विद्यालयाने त्याचा सत्कार आयोजित केला होता.
यावेळी मुख्याध्यापक शैलेन्द्र शुक्ल,शिक्षक राकेश त्रिपाठी ,विवेक शर्मा,उमेश पांडे,जितेंद्र उपाध्याय आदी उपस्थित होते.यावेळी विद्यालयाचे प्रबंधक मनोज सारस्वत म्हणाले मेधावी ला त्याचे ध्येय प्राप्त झाले.(मेधावी म्हणजे काय? मेधावी हा संस्कृत शब्द असून त्याचा मराठी अर्थ परमबुद्धिमान ज्ञानी असा आहे)
लोकांना संशय येऊ नये म्हणून वर्दी घालू लागला
चौकशीदरम्यान उत्कर्ष पांडे ला Utkarsh Pandey Kushinagarआपलं गुपित उघड होण्याची भीती नेहमीच वाटत होती, असे समोर आले आहे.त्यामुळेच त्यांनी गोरखपूरमध्ये हवाई दलाच्या अधिकाऱ्याचा गणवेश शिवून घेतला. मग लखनऊ मधूनच त्याने गणवेशावर परिधान करण्यासाठी सैन्याची रिबन-पदके विकत घेतली. गणवेश परिधान करून आणि गणवेशावर रिबन-मेडल लावून उत्कर्षने इतरांसमोर स्वतःला फ्लाइंग लेफ्टनंट म्हणून सादर करण्यास सुरुवात केली.
गणवेश परिधान करून तो प्रशासकीय अधिकारी, राजकारणी आणि मीडियाच्या लोकांना भेटू लागला.
त्याच्यासोबत छायाचित्रे काढल्यानंतर, तो एक प्रभावशाली व्यक्ती आहे यावर सर्वांचा विश्वास बसावा म्हणून
त्याने ते सोशल मीडियावर अपलोड करण्यास सुरुवात केली.
हे पाहून लोक त्यांना त्यांच्या कार्यक्रमात फोन करू लागले आणि मुलांच्या नोकऱ्यांसाठी त्यांच्याशी संपर्क करू लागले.
या सर्वांचा फायदा घेत तो बेरोजगार तरुणांकडून हवाई दलात भरतीच्या बहाण्याने लाखो रुपये उकळायचा.
इतकच नाही तर काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या मुलीसाठी सुयोग्य वर म्हणून
उत्कर्ष पांडे ची निवड करत त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव देखील ठेवला होता.
दिल्लीला पळून जाण्याचा बेत होता
पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार,आरोपी उत्कर्ष पांडे Utkarsh Pandey Kushinagar लखनऊ हून दिल्लीला पळून जाण्याचा विचार करत होता, कारण दिल्लीत त्याला फारसे लोक ओळखत नव्हते. पण एसटीएफ आणि मिलिटरी इंटेलिजन्सच्या टीमने त्याला लखनौमधूनच पकडले. कलम १४०, १७०, १७१, ४१९, ४२०, ४६७, ४६८ आणि ४७१ नुसार लखनौमधील चिन्हाट पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्कर्ष पांडे ला दिल्लीत मोठं रॅकेट चालवायचं होतं
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याने ज्यांच्याकडून पैसे उकळले त्यापैकी बहुतेक बेरोजगार युवक त्याच्या मूळ जिल्ह्यातील कुशीनगरचे रहिवासी आहेत. जे पैसे त्याच्या PNB खात्यात ट्रान्सफर झाले, ते त्याने आपल्या फूड शॉप आणि मौजमजेमध्ये उडवले. तो बेरोजगार तरुणांना जॉईनिंग लेटर, कॉल लेटर आदी फॉरमॅट डाऊनलोड करून स्वत: एडिट करून पाठवायचा.त्याला लखनौहून दिल्लीला जाऊन मोठं रॅकेट चालवायचं होतं.मात्र, एसटीएफने त्याचा हा डाव हाणून पाडला आणि त्याला अटक करण्यात आली.
एसटीएफला त्याच्याकडून दोन बनावट प्रमोशन लेटर, बनावट अपॉइंटमेंट लेटर,ई-पे स्लिप्स, ट्रेन तिकीट, चार बनावट ओळखपत्र, तीन एटीएम, दिल्ली मेट्रो कार्ड, आर्मी युनिफॉर्म, अनेक शिक्के मिळाले आहेत.
कधी कधी लेख/पोस्ट वाचताना जाहिराती ओव्हरलॅप होतात.त्यावेळी पेज पुन्हा रिफ्रेश /रिलोड करून वाचा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 24,2023 | 20:08 PM
WebTitle – Utkarsh Pandey Kushinagar Fake Flying Lieutenant