डॅलस–फोर्ट वर्थ, टेक्सास | ३१ जानेवारी २०२६ उत्तर टेक्सासमध्ये कार्यरत असलेल्या दोन भारतीय मालकीच्या दागिन्यांच्या दुकानांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करत अमेरिकन तपास यंत्रणांनी ५५ मिलियन डॉलरच्या (सुमारे ४६० कोटी रुपये) कथित सोन्याच्या फसवणूक आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. Irving येथील Tilak Jewelers आणि Frisco येथील Saima Jewelers या दुकानांवर गुरुवारी, ३० जानेवारी २०२६ रोजी, एकाच वेळी छापे टाकण्यात आले. ही कारवाई सुमारे एक वर्ष चाललेल्या तपासाचा निर्णायक टप्पा असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Collin County Sheriff’s Office च्या नेतृत्वाखाली फेडरल, राज्य आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही छापेमारी केली. CBS News Texas ला या कारवाईचे एक्सक्लुझिव्ह दृश्य कव्हरेज देण्यात आले होते. छाप्यांदरम्यान दुकानांमधील प्रदर्शनातील तसेच व्हॉल्टमध्ये ठेवलेले लाखो डॉलर किमतीचे सोने आणि मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मालाची वाहतूक Brinks आर्मर्ड ट्रकद्वारे करण्यात आली.
Tilak Jewelers चे gold bar courier scam जेष्ठ नागरिकांना टार्गेट करून चालली होती फसवणूक
Collin County Sheriff Jim Skinner यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देताना सांगितले, “जर तुम्ही Collin County मध्ये आमच्या नागरिकांची फसवणूक करत असाल, तर आम्ही तुम्हाला पकडणारच. आमच्या ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.”
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा कथित घोटाळा ‘gold bar courier scam’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्धतीवर आधारित होता. या पद्धतीत फसवणूक करणारे व्यक्ती फोन किंवा ईमेलद्वारे ६५ वर्षांवरील वृद्ध नागरिकांना लक्ष्य करतात. ते स्वतःला फेडरल एजंट, सरकारी अधिकारी किंवा कायदा अंमलबजावणी अधिकारी म्हणून ओळख देतात आणि पीडितांच्या नावाचा संबंध मनी लॉन्डरिंग, ड्रग ट्रॅफिकिंग किंवा इतर गंभीर गुन्ह्यांशी जोडला असल्याचा दावा करतात.
वृद्ध पीडितांनी सुमारे ७ मिलियन डॉलर गमावले
अटक टाळण्यासाठी किंवा प्रकरण “सेटल” करण्यासाठी पीडितांना
तात्काळ आपली रिटायरमेंट सेव्हिंग्ज, बँक ठेवी किंवा मालमत्ता विकून सोने खरेदी करण्यास सांगितले जाते.
हे सोने बार नंतर कुरिअरच्या माध्यमातून गोळा केले जातात.
तपास यंत्रणांचा आरोप आहे की हेच सोने Tilak Jewelers आणि Saima Jewelers या दुकानांमध्ये आणले जाई,
जिथे ते वितळवून ब्रेसलेट्स व इतर दागिने तयार केले जात. हे दागिने पुढे सामान्य ग्राहकांना विकले जात किंवा देशाबाहेर तस्करीद्वारे पाठवले जात.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या साखळीत सहभागी प्रत्येक घटकाला फोनवरून फसवणूक करणारे,
सोने उचलणारे कुरिअर आणि दागिन्यांचे दुकान चालवणारे अशांना त्यांचा ठरावीक हिस्सा मिळत असे.
या कथित रॅकेटमुळे Collin County मध्ये २०० हून अधिक वृद्ध पीडितांनी सुमारे ७ मिलियन डॉलर गमावले आहेत,
तर संपूर्ण टेक्सासमध्ये एकूण फसवणुकीची रक्कम ५५ मिलियन डॉलरपर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे.
एका पीडितेला १ मिलियन डॉलरपेक्षा अधिक नुकसान झाल्याची नोंद आहे.
आतापर्यंत तपास यंत्रणांनी सुमारे ४००,००० डॉलर पीडितांना परत मिळवून दिले असून,
पुढील जप्ती आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर आणखी रक्कम परत मिळण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कानांचे मालक आणि इतर आरोपी हे सध्या Collin County jail मध्ये
छाप्यांदरम्यान तीन जणांना अटक करण्यात आली आहे. Irving येथील Tilak Jewelers मधून दोन, तर Frisco येथील Saima Jewelers मधून एक व्यक्ती ताब्यात घेण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांवर ‘engaging in organized criminal activity’ आणि ‘financial abuse of the older people ’ असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. Irving प्रकरणात अटक झालेल्यांमध्ये २४ वर्षीय तिथी पटेल Tithi Patel आणि ३८ वर्षीय नीरव सोनी Nirav Soni यांचा समावेश असून, दोघांसाठी प्रत्येकी ४ मिलियन डॉलरची जामीन रक्कम निश्चित करण्यात आली आहे. दुकानांचे मालक आणि इतर आरोपी सध्या Collin County jail मध्ये आहेत. काही अहवालांमध्ये ऑक्टोबर महिन्यात अटक करण्यात आलेल्या Radhakrishna Yerramneni (४६, Telugu-origin) यांचाही या तपासाशी संबंध असल्याचा उल्लेख आहे.
ही संयुक्त कारवाई Allen Police Department, Irving Police Department, North Richland Hills Police Department,
Texas Department of Public Safety, Department of Homeland Security – Office of Inspector General,
United States Postal Inspection Service, Immigration and Customs Enforcement
आणि Federal Crime Information Center यांच्या सहकार्याने पार पाडण्यात आली.
दरम्यान, Sheriff Jim Skinner हे शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये वृद्ध नागरिकांवरील आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटनांवर भाषण देणार आहेत.
अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही कॉल किंवा ईमेल सरकारी अधिकाऱ्याच्या नावाने आला
आणि तात्काळ पैसे किंवा सोने देण्याची मागणी केली गेली,
तर त्यावर विश्वास न ठेवता त्वरित स्थानिक पोलिस, बँक किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा.
या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, पुढील काळात आणखी अटका आणि जप्त्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 31,2026 | 19:40 PM
WebTitle – us-gold-scam-tilak-saima-jewelers-55-million-elder-fraud-texas























































