UP Election चंद्रशेखर आझाद यांनी मुख्यमंत्री अजयकुमार बिष्ट उर्फ योगी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून ते मुलाखतींमध्ये मोठे दावे करत होते. मतदानादरम्यान चंद्रशेखर म्हणाले होते की आमची आघाडी यूपीमध्ये 403 जागा लढवत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आझाद समाज पार्टी यूपीमध्ये मोठी ताकद बनेल आणि आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही.
डिपॉजिट जप्त
UP Election आझाद समाज पार्टीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे अनेक बातम्या मध्ये झळकले होते.
मात्र सीएम अजयकुमार बिष्ट यांनी त्यांची पारंपरिक जागा जिंकली.
दुसरीकडे, चंद्रशेखर येथून केवळ निवडणूक हरले नाहीत, तर त्यांची डिपॉजिटही जप्त करण्यात आलं.
मुख्यमंत्री अजयकुमार बिष्ट उर्फ योगी आदित्यनाथ 1,43,597 हजार मते घेऊन विजयी झाले.
या जागेवरून भाजपचा केवळ एकदाच झाला पराभव
सीएम अजयकुमार बिष्ट उर्फ योगींच्या विरोधात, समाजवादी पक्षाने हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या उपेंद्र दत्त शुक्ला यांच्या पत्नी सुभावती शुक्ला यांना उमेदवारी दिली. १९८९ पासून या जागेवर भाजपचे वर्चस्व आहे. 2002 मध्ये त्यांना एकदाच येथून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी राधामोहन दास अग्रवाल यांना यूपी निवडणुकीत पाठिंबा दिला होता. अग्रवाल यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या योगी आदित्यनाथ यांना 1,38,399 मते मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी सपा उमेदवार सुभावती उपेंद्र दत्त शुक्ला यांना 53,039 मते मिळाली. चंद्रशेखर आझाद यांना केवळ 6611 मते मिळाली. 2017 पर्यंत आदित्यनाथ यांनी गोरखपूर लोकसभा जागेचे प्रतिनिधित्व केले, जेव्हा ते भारतीय जनता पक्षाच्या राज्य निवडणुकीत प्रचंड विजयानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. गोरखपूर सदर जागाही भाजपचा बालेकिल्ला आहे.
सपाशी झाली नव्हती युती
निवडणुकीपूर्वी त्यांनी सपा प्रमुख अखिलेश यादव यांची युतीसाठी भेट घेतली होती, मात्र ते होऊ शकले नाही. फोनवर बोलल्यानंतर चंद्रशेखर यांनी सपासोबत युती करण्यास नकार दिल्याचे अखिलेश म्हणाले होते. दोन जागा देण्याबाबत बोलल्याचं माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. यूपीमध्ये पुन्हा एकदा भाजप दणदणीत विजय मिळवून सत्तेत येण्यासाठी सज्ज झाला आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
झुंड मुव्ही: रितेश देशमुख यांची पोस्ट व्हायरल; दोन भारताचा विचार..
झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”
B झुंड सिनेमा : तीनचार परिप्रेक्ष्यांतून पाहायचा चित्रपट
C झुंड सिनेमा : सुपरस्टार धनुष म्हणाला “निःशब्द झालोय”
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिवजयंती च्या मिरवणुकीत सामील होतात
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत..
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 10, 2022 19: 40 PM
WebTitle – UP Election Chandrasekhar Azad’s deposit confiscated, see total votes