अमेठी (युपी) : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा मतदारसंघ असलेल्या युपी मधील अमेठी येथील बंदुहीया गावात दलित सरपंच महिलेच्या पतीला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे.गावातल्या एका तथाकथित उच्च जातीय माणसाच्या घरात, पीडित व्यक्ती च्या मुलाला त्याचे वडील 90 टक्के जळाळलेल्या अवस्थेत आढळून आले, दवाखान्यात जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.महिला सरपंचांनी गावातील पाच जणांवर पतीला जिवंत जाळल्याचा आरोप केला आहे. कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून युपी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण ?
मिडिया रिपोर्ट्स अनुसार युपी मधील अमेठी येथील बंदुहीया गावात दलित सरपंच महीलेचे पती अर्जुन गुरुवारी संध्याकाळी साडे सहा वाजता गावातील चौकात चहा प्यायला गेले होते.तिथून त्यांचे अपहरण करण्यात आले.सरपंच महिलेचा आरोप आहे की गावातील कृष्ण कुमार तिवारी आणि त्याच्या चार साथीदारांनी आपल्या पतीचे अपहरण केले.आणि आपल्या घरातील अंगणात त्यांना जीवंत जाळले.
यामागचे कारण – कृष्ण कुमार तिवारी हे सरपंच महिलेकडे वारंवार पैशांची मागणी करत होते.गावातील सरपंचाकडे सरकारकडून आलेला भरपूर पैसा असतो.आणि त्यात आपल्याला वाटा मिळाला पाहिजे.असा त्याने तगादा लावला होता.त्यास नकार दिल्याचा राग आल्याने आरोपी कृष्ण कुमार तिवारी आणि केके तिवारी, आशुतोष, राजेश, रवि आणि संतोष या सर्वानी मिळून आपल्या पतीला जीवंत जाळले.
अर्जुनाच्या कुटुंबीयांनी मोबाईल फोनवर जळलेल्या अवस्थेत त्यांची मृत्यूपूर्व जबानी रेकॉर्ड केली.
त्यात त्यांनी गावातील या पाच जणांची नावे सांगितली.
या सर्वांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत तीन जणांना पोलिसानी अटक केली आहे.
गावात प्रचंड तनाव असल्याने पोलिसांचा मोठ्याप्रमानवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक पोलिस प्रशासनाला दिले आहेत.
डीएम अरुण कुमार यांनी मृतकाच्या परिवारास किसान विमा योजनेंतर्गत 5 लाखांची आर्थिक मदत व इतर योजनांचे लाभ देण्याचे आश्वासन दिले आहे.
शहीद भगत सिंह : मी नास्तिक का आहे?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 29, 2021 19:05 PM
WebTitle – Obstacles to soybean self-sufficiency in pulses