कर्जत येथील आंबिवली बुद्ध लेणी मध्ये अनधिकृत सुरू असलेले फिल्मचे शूटिंग MBCPR team च्या सतर्कतेमुळे थांबले.बौद्ध संस्कृती बदलून हिंदू संस्कृती दाखवून सांस्कृतिक इतिहास बद्दलवण्याचा डायरेक्टचा प्रयत्न…..जेव्हापासून बुद्ध धम्म लयास गेला तेव्हा पासून बुद्ध लेणींवर विविध पंथीयांनी अतिक्रमणे करण्यास सुरुवात केली.
बुद्ध विचारधारा ही कल्याणकारी व अहिंसावादी विचारधारा असल्याने इतर पंथीयांनी त्याचा गैरफायदा घेत बुद्ध लेणींवर अतिक्रमणे करण्यास सुरुवात केली,आणि आज पर्यंत कित्येक बुद्ध लेणींवर देवस्थान तयार झाली आहेत त्याची उदाहरणे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत.
कार्ला (वरुलक)बुद्ध लेणी, लेण्याद्री (कपिचित)बुद्ध लेणी शेलरवाडी बुद्ध लेणी,त्रिरश्मी बुद्ध लेणी अशी अनेक उदाहरणे महाराष्ट्रात आहेत ,आजच कर्जत येथील बुद्ध आंबिवली बुद्ध लेणींवर एका चित्रपटाची शूटिंग सुरू होती ही पूर्ण बुद्ध लेणी असून इथं सिनेमाच्या निर्मात्याने हिंदू लेणी दाखवण्याचा प्रयत्न केला.
आणि हे सिनेमातून दाखवल्यावर इथं मग मोठ्या प्रमाणावर अंध भक्त येण्यासाठी सुरवात करतात.
त्यांना सिनेमातील दृष्य सत्य वाटते मग नवस, पूजा कर्मकांड करण्यास सुरवात होते.
हळूहळू ही लेणी अतिक्रमणाची शिकार होते,असेच अंधभक्त मग तिकडे देवस्थान समजून जातात.
जसे सचिन पिळगावकर च्या अष्टविनायक चित्रपटानंतर कापीचीत बुद्धलेणी ही गणपती देवस्थान म्हणून ओळखली गेलीहे निर्माते लेणींवर शूटिंग करत होते त्यावेळी इथं कार्यरत असलेले कर्मचारी कुठे होती ते असताना इथं शूटिंगला परवानगी नसताना शूटिंग कशी काय करू दिली?? पुरातत्व विभागाने यावर त्वरीत कारवाई करावी व ह्या फिल्मधील तो भाग सिनेमातून वगळण्यात यावा अन्यथा सर्व लेणी संघटना आंदोलने करतील.
आज तेथे घडलेली पूर्ण घटना खाली देत आहोत
आज दिनांक १९/१०/२०२१ रोजी कर्जत तालुक्यातील आंबिवली लेणी येथे
MBCPR team चे अडमीन पॅनल मधील लेणी संवर्धक यांनी भेट दिली असता
सकाळी ११:०० च्या सुमारास लेणीच्या रस्त्यावर मोठ्या बसेस,जनरेटर,फोर व्हिलर,जेवणाचे साहित्य
आणि जवळपास २५ ते ३० माणसे, युवक युवती लेणी पूर्ण पणे मंदिराप्रमाणे सजविलेली दिसत होते.
प्रवेशद्वारावर राधा कृष्ण मंदिराचा बोर्ड,समोर थर्माकोलचा बनविलेला गणपती.नट,नटी , स्पॉट बाॉय आणि शुटींग चालु होती .त्यावेळी लेणी संवर्धक यांनी केअर टेकर ला विचारणा केली असता तो बोलला पिक्चर ची शुटिंग.लेणी संवर्धक यांनी विचारले की तुम्ही पुरातत्व विभागाची परवानगी घेतली आहे का? तर तो नाही बोलला.मग मी हि बुद्ध लेणी आहे.आणि अशी शुटींग करणे चुकीचे आहे.
असे बोलताच त्या गावातील एक व्यक्ती लेणी संवर्धक यांच्याशी वाद घालायला लागला.
तो बोलला हि पांडव लेणी आहे आणि आम्ही तीला पांडव लेणीच बोलणार.
त्याच्याशी वाद न करता लेणी संवर्धक हे थेट डायरेक्टरला भेटले
आणि त्यांना समजावून सांगितले की कोणताही बदल न करता तुम्ही शुटींग करा नाहीतर तुम्हीच गोत्यात येणार.
आणि त्यांनी मान्य केले.तो बोर्ड आणि गणपतीचा फोटो काढला.परंतु पुढे पिक्चर मध्ये काही बदल होतो काय बघूया!
पिक्चर चे नाव: …..डायरेक्टर:बाबू भोईर
सर्व लेणी अभ्यासकांनी, लेणी संवर्धकांनी पुरातत्व विभागास पत्रव्यवहार करून ह्यावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करावे दबावगट तयार करावा ही नम्र विनंती
BY Maharashtra Buddhist Caves Preservation & Research
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
विज्ञान आणि भगवान बुद्ध: बुद्ध कालबाह्य आहे ?
भगवान बुद्धांचा मृत्यू कोणता पदार्थ सेवन केल्याने झाला? जाणून घ्या..
हे ही वाचा.. बुद्ध पौर्णिमा हिंदू तिथी पंचांगाप्रमाणे येते का?
काय पिंपळ दिवस रात्र हवेत प्राणवायू सोडतो ?
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 20, 2021 22 :08 PM
WebTitle – Unauthorized film shooting at Ambivali Buddha Caves stopped due to vigilance of MBCPR team