प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्यानंतर,एका दिवसानंतर, राष्ट्रवादी चे नेते माजीद मेमन यांनी मंगळवारी यू-टर्न घेतला ,त्यांनी आता म्हटलंय की ते भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या विचारसरणी आणि धोरणांना समर्थन देत नाहीत.माजीद मेमन यांच्या ट्विटमुळे मात्र महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात संशयास्पद पातळीवर चर्चा सुरु झालीय.
यु-टर्न घेताना राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते माजिद मेमन म्हणाले,ते म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील माझ्या ट्विटचा अर्थ मी भाजप/आरएसएसच्या धोरणांना, विचारसरणीला किंवा कार्याला पाठिंबा देतोय असा चुकीचा अर्थ काढू नये. कोणत्याही किंमतीत मी संविधानाचे उल्लंघन करण्याची तडजोड करणार नाही तसेच लोकशाही मूल्यांचा अवमान करणार नाही.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल आणि जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून मानांकन मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते माजीद मेमन यांनी रविवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.
माजिद मेमन नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलंय “जर जनतेने नरेंद्र मोदी याना निवडून दिलेय आणि ते जगातील सर्वात प्रसिद्ध नेते असल्याचे सध्या समोर आले आहे.यावरून त्यांच्यात नक्कीच काहीतरी चांगले गुण असतील. विरोधी पक्षातील नेते त्यांच्या काळात करू शकले नाहीत अशी काही कामे त्यांनी केली असतील.”
मेमनच्या या ट्विटनंतर त्यांच्या पक्षाचे लोक देखील आश्चर्यचकित झाले.
मेमन म्हणाले, माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे.ते म्हणाले, मी भाजपमध्ये जाणार नाही.
live hindustan च्या वृत्तानुसार काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, महाविकास आघाडीचे इतर नेते विशेषत: जे काँग्रेसमध्ये आहेत ते आता विचार करू लागले आहेत. पंजाबमधील दारूण पराभवानंतर त्याला आपल्या भविष्याची चिंता सतावत आहे.
आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशात एकदा आपल्या हातून सत्ता गेली, आता पंजाबही या मालिकेत सामील झाला आहे.
राष्ट्रवादीचे दुसरे नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजप आणि महाविकास आघाडी
यांच्यातील राजकीय संबंध सर्वात खालच्या पातळीवर आल्याने या पार्श्वभूमीवर आलेलं हे ट्विट लोकांसाठी चर्चेचा विषय ठरलं आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
दिग्दर्शक अभिनेते नागराज मंजुळे यांना विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी
जगातील सर्वात वृद्ध लोकांची यादी; भारतातील एकही व्यक्ती नाही
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दर्जाचे दिग्गज खेळाडू
काश्मीर फाईल्स:तेव्हा कुणीही अश्रू देखील ढाळले नाहीत-उद्धव ठाकरे
व्यवस्थेचे बळी : उद्या कदाचित तुम्ही सुद्धा…..
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 29, 2022 20:28 PM
WebTitle – U-turn of NCP leaders after praising Prime Minister narendra Modi