शहरात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसात शनिवारी सायंकाळी गोवंडीतील शिवाजी नगर येथे ओसंडून वाहणाऱ्या नाल्याच्या मॅनहोल मध्ये बुडून दोन सफाई कामगारांचा मृत्यू झाला.two sanitation workers died in sewer manhole mumbai govandi अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, हे दोघे सफाई कामगार नियमित पाण्याच्या प्रवाहाच्या चाचण्या करत होते. अधिक माहिती देताना अधिकारी म्हणाले,शनिवारी शहराच्या मोठ्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे गटार वाहिनी ओव्हरफ्लो झाली होती.मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना ‘मृत’ घोषित करण्यात आले. रामकृष्ण (25) आणि सुधीर दास (30) अशी सफाई कामगार मृतांची नावे आहेत.
मॅनहोल सफाई कामगारांचा मृत्यू
मुंबई अग्निशमन दलाने सांगितले की, शिवाजी नगरच्या 90 फूट रोडवर दुपारी 4.22 वाजता ही घटना घडली.
बीएमसीच्या प्राथमिक अहवालात असे म्हटले आहे की मजूर एका खाजगी कंत्राटदाराने कामावर ठेवले होते
आणि जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा ते साफसफाईचे काम करत होते.
two sanitation workers died in sewer manhole mumbai govandi
“हा एक सांडपाण्यासाठीचा हा सीवरेज बोगदा (sewerage tunnel) नुकताच बांधण्यात आला होता. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पाण्याच्या प्रवाहाची चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू होती. दोन कामगार आत उतरले होते. तथापि, मुसळधार पावसामुळे वाहिनी ओव्हरफ्लो झाली आणि कामगार दुर्दैवाने बुडाले, ”असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या विनंतीवर माहिती दिली.
मात्र, मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी
एका ट्विटमध्ये मजुरांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
आज माझ्या मतदारसंघातील मानखुर्द शिवाजी नगर गोवंडी येथील
90 फूट रोडवरील रोड क्रमांक 10 वर सांडपाणी तपासण्यासाठी गेलेल्या दोन मजुरांना विजेचा धक्का लागल्याने
आपला जीव गमवावा लागला,” असे ट्विट वाचले.
अबू आझमी यांनी ट्विट मध्ये म्हटलंय की “आज मुंबईसारख्या शहरात तांत्रिकदृष्ट्या प्रगत असूनही महापालिका गरीब मजुरांना अमानुष पद्धतीने सांडपाण्याच्या लाईनमध्ये काम करण्यास भाग पाडते, हे अत्यंत खेदजनक आहे. सुरक्षा साधने नसतानाही हे मजूर जीव धोक्यात घालून काम करतात आणि शिवीगाळही झेलतात.
माझ्या मतदार संघातील मानखुर्द शिवाजी नगर गोवंडी मधिल रोड क्र.10, 90 फूट रोडवर
सांडपाणी वाहिका तपासणीसाठी उतरलेल्या दोन मजुरांना विजेचा शॉक लागून जीव गमवावा लागला,याला जबाबदार कोण? याची चौकशी झाली पाहिजे.
आरोपींवर गुन्हा दाखल
रुग्णालयाने या प्रकरणी पोलिसात कळवले त्यांनंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, रविवारी सकाळी रामकृष्णाचे वडील निरंजन (४०) यांनी पोलिसांकडे तक्रार केली की पीडितेला सुरक्षा उपकरणे पुरवली गेली नाहीत आणि निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. पोलिसांनी शोध तपास करत घटनेला जबाबदार ठेकेदार असजद अहमद अर्शद सिद्दीकीसह कृष्णा रुदाजी पुरोहित, प्रमोद मिश्रा आणि अश्विन दलाराम चौधरी या तिघांना अटक केलीय.
भारतीय दंड संहितेच्या कलम 34 (सामान्य हेतू) आणि
304 (2) (मृत्यू होण्याची शक्यता असलेल्या ज्ञानाने केलेले कृत्य,परंतु मृत्यू घडविण्याच्या हेतूशिवाय केलेले कृत्य)
अंतर्गत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुन्हा रेल्वे अपघात,प.बंगाल मध्ये एकाच रुळावर दोन गाड्या येऊन आदळल्या, रेल्वेचे कामकाज ठप्प
भगवान बुद्ध अस्थि दर्शन ,सुट्टी न दिल्याने उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी दिला राजीनामा
मोदी सरकार आल्यापासून महिलांची उंची वाढली: भाजप नेता
Sanatani Bulldozer सनातनी बुलडोजर आता धार्मिक प्रतिक?
आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 26 JUN 2023, 09:51 AM
WebTitle – two sanitation workers died in sewer manhole mumbai govandi