मणिपूर : हिंसाचारग्रस्त ईशान्य राज्य मणिपूरमधून हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. शेकडो लोकांचा जमाव दोन कुकी महिलांना रस्त्यावर नग्न नग्नावस्थेत फिरायला लावताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून लोक संतप्त झाले असून प्रशासनाकडून कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.या दोन्ही महिलांवर जवळच्या शेतात सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप एका आदिवासी संघटनेने केला आहे. इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) च्या निवेदनानुसार, राज्याची राजधानी इंफाळपासून सुमारे 35 किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात ही घटना 4 मे रोजी घडली
मणिपूर हिंसाचाराच्या आगीत जळत आहे
कॅमेरात कैद झालेल्या या भीषण घटनेच्या एक दिवस आधी मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाला होता. अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा देण्याच्या मेईतेई समाजाच्या मागणीवरून खोरे-बहुल मेईतेई आणि डोंगरी-बहुल कुकी जमाती यांच्यात संघर्ष झाला. तेव्हापासून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेघर झाले आहेत.
आता या भितीदायक व्हिडिओने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. दिवसाढवळ्या शेकडो लोकांचा जमाव दोन कुकी महिलांना रस्त्यावर नग्न नग्नावस्थेत फिरायला लावताना दिसत आहे.महिलांची खुलेआम विवस्त्र परेड केली जात आहे. महिलांसोबत पुरुषांची झुंबड चालताना दिसत आहे.गर्दीत फिरणारे गुंड मुलीला चापट मारत आहेत, तिच्या प्रायव्हेट पार्टला जबरदस्ती स्पर्श करत आहेत. कुकी संघटना आयएलटीएफचे म्हणणे आहे की हे दोन्ही पीडित कुकी समुदायातील होत्या. मेईतेई समुदायाच्या जमावाने महिलांना रस्त्यावर विवस्त्र केले आणि नंतर भाताच्या शेतीत नेऊन सामूहिक बलात्कार केल्याचा दावाही संघटनेने केला आहे.
आता या घटनेबाबत पोलिसांचे म्हणणे समोर आले आहे
मणिपूरमधील या भीषण घटनेवर पोलिसांचे वक्तव्य आले आहे. मणिपूर पोलिसांनी सांगितले की, 4 मे 2023 रोजी अज्ञात सशस्त्र बदमाशांकडून 2 कुकी महिलांना नग्न करून परेड केल्याचा व्हायरल व्हिडिओ आमच्या निदर्शनास आला आहे. या संदर्भात,अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांविरुद्ध नॉन्गपोक सेकमाई पीएस (थौबल जिल्हा) येथे अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खून इत्यादींचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी राज्य पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राज्य पोलिस आणि केंद्रीय दलांनी खोरे आणि डोंगरी जिल्ह्यांतील विविध संवेदनशील आणि सीमावर्ती भागात शोध मोहीम सुरू केली.
अक्षय कुमार ने केले ट्विट
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आम कैसे खाते है, चुस के, की काट के असं विचारणारा,अन कॅनडा चं नागरिकत्व घेणाऱ्या बॉलीवूड मध्ये खिलाडी कुमार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अक्षय कुमार ने अचानक ट्विट करत म्हटलं की,”मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा व्हिडिओ पाहून हादरलो, मला आशा आहे की दोषींना एवढी कठोर शिक्षा मिळावी की पुन्हा असा भयानक कृत्य करण्याचा कोणी विचारही करणार नाही.”
लोकांना आश्चर्य वाटत आहे की याने असं ट्विट का केलं असावं? कारण मणिपूरमध्ये भाजपची सत्ता आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मौन
विरोधकांना धारेवर धरणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अलिकडे विदेश दौऱ्यावर भारताची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न करत असताना
इकडे घरात लागलेल्या आगीबद्दल मात्र मौन धारण करून असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे लोकांमध्ये संतापाची भावना असून आज ट्विटरवर #नरेंद्रमोदीइस्तीफा_दो हा हॅशटॅग टॉप ट्रेंड मध्ये आहे.
प्रधानमंत्र्यांचे मौन जबाबदार – राहुल गांधी
प्रधानमंत्र्यांचे मौन आणि निष्क्रियता मणिपूर ला अराजकतेकडे नेत आहे.
मणिपूरमध्ये भारताच्या कल्पनेवर हल्ला होत असताना भारत गप्प बसणार नाही.
आम्ही मणिपूरच्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत. शांतता हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे.
असं ट्विट करत राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर थेट हल्ला केला.
आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू जी तुम्हाला आवाहन
सोशल मिडियावर व्यंगात्मक शैलीत व्हिडिओ बनविणाऱ्या डॉ. मेदूसा यांनी हा भयानक व्हिडिओ समोर आल्यानंतर मणिपूर मधिल हिंसाचारासाठी आता थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आवाहन केलं आहे.
“या देशाचा इतिहास कायम इथल्या मुलनिवासी महिलांवर अन्याय अत्याचार करणारा राहिला आहे,हे पाहत आलोय.तुम्हीही जाणता,एक स्त्री म्हणून एक आदिवासी महिला म्हणून तरी काहीतरी बोला,तुमच्याकडे ताकद आहे,पावर आहे.अधिकार आहेत जे आमच्यासारख्या महिलांकडे,सामान्य नागरिकांकडे नाही,तुम्ही देशाच्या सर्वोच्चपदी आहात हा देशातील महिलांसाठी गर्व आणि आश्वासनाचा विषय होता मग तुम्ही गप्प का? तुम्ही शांतीची अपील का करत नाही? “
“तुम्ही जर शांतीची अपील केली तर कदाचित देशातील विविध समुदायात हिंसा निर्माण करणाऱ्या सरकारच्या डिनर टेबलवरून पडणाऱ्या नागरिकांच्या मांसाच्या तुकड्यावर उपजीविका करणाऱ्या देशातील मिडियाला मणिपूर चं गांभीर्य कळेल.कदाचित तुमच्या बोलण्याने,जगात वाजत असलेल्या भारताच्या डंक्याच्या गोंगाटात कुठेतरी त्या दोन मुलींच्या डोळ्यातील किंकाळ्या ऐकू येतील.आपल्या देशात महिलांच्या शरीराची किंमत खूपच स्वस्त आहे. कदाचित तुमच्या बोलण्याने त्यांना काहीतरी किंमत मिळेल,म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतेय त्या दोन कुकी महिलांसाठी ज्या शेकडो पुरुषांच्या नग्न विजयाच्या एका फासीवादी भेकड खूनी सरकारच्या आणि पितृसत्तेच्या बळी ठरल्या.मणिपूर ला वाचवा,तिथल्या स्त्रियांना वाचवा,आता तुम्हीच काहीतरी करू शकता.“
तुम्हाला काय वाटतं? आपलं मत कमेंट करून कळवा. जागल्याभारत यावर जून पासून बातम्या करत आहे.मात्र प्रस्थापित मिडियाने मणिपूर विषयच ऑप्शनला टाकला आहे.
Read also ..मणिपूर ची परिस्थिती काश्मीर,पंजाबपेक्षा वाईट – राज्यपाल
A मणिपूर हिंसा का झाली जाणून घ्या,शूट एट साईट चे आदेश
मणिपूर मध्ये पुन्हा हिंसाचार,खामेनलोकमध्ये गोळीबारात 9 ठार
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 20,2023 | 11:18 AM
WebTitle – Two Kuki women paraded naked on streets in Manipur