ट्विटरचे नवीन नियम: लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर काल काहीकाळ ठप्प झाल्याने ट्विटराईट लोकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.अनेकांनी ट्विटर अनइन्स्टॉल इन्स्टॉल करून पाहिलं,परंतु चालू होईना,त्यांनंतर काही वेळाने ट्विटर नियमित सुरू झाल्यावर अनेकांना हायसं वाटलं,ट्विटरचे दैनंदिन कामकाज विस्कळीत होण्यामागचे कारण आता समोर आले आहे.Twitter Update marathi मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचे मालक एलोन मस्क यांनी शनिवारी (1 जुलै) एका दिवसात वापरकर्ते वाचू शकणार्या ट्विट्सच्या संख्येबाबत मोठी घोषणा केली. एलोन मस्क यांनी ट्विट केले, “डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिपुलेशनचा सामना करण्यासाठी आम्ही या तात्पुरत्या मर्यादा लागू केल्या आहेत.” सत्यापित खाती (ब्लु बॅज असणारे ) एका दिवसात 6000 पोस्ट्स/ट्विट (वाचनासाठी) वाचण्याची मर्यादा आहे.तर असत्यापित खाती (ब्लु बॅज नसणारे)600 पोस्ट वाचण्यास सक्षम असतील आणि नवीन (अलिकडे बनलेली) असत्यापित खाती दररोज 300 पोस्ट वाचण्यास सक्षम असतील.
लोकांनी नाराजी व्यक्त केल्याने देण्याघेण्याची चर्चा सुरू झाली,(अन कमीजास्त म्हणत शेवटी बोहनीचा टाईम आहे असं म्हणत) एलोन मस्क ने दुसर्या ट्विटमध्ये,मर्यादा काही प्रमाणात वाढवली,त्यानुसार व्हेरिफाईड (खाते) साठी दर मर्यादा लवकरच 8000, असत्यापित (असत्यापित) 800 आणि नवीन असत्यापितांसाठी 400 पर्यंत वाढवली जाईल.असं जाहीर केलंय.
यानंतर आणखी बदल करत ही मर्यादा 10k, 1k & 0.5k म्हणजे 10 हजार .1 हजार अन 500 अशी करण्यात आलीय.
एलोन मस्क सोशल मिडिया कमी वापरण्याची सूचना करतोय?
एलोन मस्क यांनी यामागची डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिपुलेशन अशी कारणे सांगितली असली तरी आणखी एक गोष्ट आहे.
त्यांनी एक स्वत:च्या नावाने अकाऊंट असणाऱ्या खात्याचे ट्विट रीट्विट केलंय जे की पॅरोडी अकाऊंट आहे.
या ट्विट मध्ये असं म्हटलं आहे की,मी “वाचण्याची मर्यादा” सेट करण्याचे कारण म्हणजे,
आपण सर्व ट्विटर व्यसनी आहोत आणि आपल्याला बाहेर जाण्याची गरज आहे.
मी इथं जगासाठी चांगले काम करत आहे.हे दुसरं ट्विट आहे,जे नुकतेच तुम्ही पाहिलंय,(रेट लिमिट नुसार)
Twitter Update marathi ट्विटर वापरकर्त्यांना कोटा पुर्ण झाल्यावर नोटिफिकेशन मिळते
याआधी शनिवारी, जगभरातील अनेक वापरकर्त्यांनी ट्विट करणे किंवा अशेअर करणे यासारख्या समस्यांबद्दल तक्रार केली.
बर्याच वापरकर्त्यांनी सांगितले की ते रेट लिमिट पार होण्याचे नोटिफिकेशन पाहत आहेत.
याचा अर्थ त्यांनी ट्विट्स किंवा नवीन खात्यांच्या संख्येवर साइटची मर्यादा ओलांडली आहे जे ते ठराविक कालावधीत फॉलो करू शकतात.
ट्विट पाहण्यासाठी लॉग इन करणे आवश्यक आहे
शुक्रवारी (३० जून) ट्विटर वापरकर्त्यांसाठी तात्पुरता उपायही जारी करण्यात आला.
ट्विट पाहण्यासाठी आधी ट्विटरवर लॉग इन करावे लागेल, असे युजर्सना सांगण्यात आले.
यासोबतच एलोन मस्क यांनी ट्विटरवरून डेटा चोरीला गेल्याचा दावा केला
आणि सामान्य वापरकर्त्यांसाठी ही अपमानास्पद सेवा असल्याचे सांगितले.
सामाजिक चळवळ करणाऱ्या वंचित वर्गांना मोठा फटका
तुम्हाला सांगायचं तर, ब्लू टिक नावाने ओळखला जाणारा व्हेरिफिकेशन बॅज आधी मोफत दिला जात होता पण एलोन मस्क ट्विटरचे मालक बनल्यानंतर त्यासाठी फी निश्चित करण्यात आली होती. खूप प्रयत्नांनंतर मस्कने गेल्या वर्षी ही कंपनी US $ 44 अब्जांना विकत घेतली.आता एलोन दररोज त्यात काड्या करत असतो.नवे नवे नियम आणतो.यासगळ्यात जर नीट विचार केला तर असं लक्षात येतंय की ट्विटर हळूहळू सामान्य युजरकर्त्यांसाठी अधिकाधिक अडचणीचे होत चालले आहे.आणि इथे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागत आहेत.
आताचा लॉग इनचा नियम पाहिला तर लक्षात येईल आता ट्विट पाहण्यासाठी/वाचण्यासाठी तुम्हाला ट्विटरवर खातं खोलावंच लागणार आहे.अन त्यानंतर पुढे कदाचित ट्विट वाचण्यासाठी देखील पैसे मोजावे लागतील.आता 44 अब्ज तर वसूल करायचे आहेत,तर त्यासाठी असे कारनामे तर साहजिकच होणार आहेत,पण यात सामाजिक चळवळ करणाऱ्या वंचित वर्गांना मोठा फटका बसणार आहे.
मित्रांनो,माहिती कशी वाटली? कमेंट करून जरूर कळवा,आवडली तर फेसबुक/व्हाटसेप ग्रुपवर शेअर करा,कारण सध्यातरी शेअरिंग मोफतच आहे.तुम्हाला मिळालेली माहिती तुमच्या मित्र नातेवाईक, इतरांनाही कळवा.
Milind Dhumale
Editor
फ्रान्स का जळत आहे? 17 वर्षीय Nahel M नाहेल ला पोलिसांनी का मारलं?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 02 JULY 2023, 13:04 PM
WebTitle – Twitter Update in Marathi Limitation on reading tweets, Elon Musk explained the reason