भोपाळ : महाराष्ट्रात काही वर्षापूर्वी मोबाईलवर जयभीम रिंगटोन वाजल्याने एका युवकाची हत्या करण्यात आली होती,त्यानंतर जयभीम चे स्टीकर अशोक चक्र इत्यादिवरून गाडी फोडणे मारहाण करणे अशा घटना घडल्या आहेत.आता बिरसा मुंडा यांच्या स्टीकरवरूनही अशा सामाजिक शांतता भंग करणाऱ्या घटना घडू लागल्या आहेत.अशीच एक घटना मध्यप्रदेशात घडली आहे.रीवा जिल्ह्यातील एका आदिवासी तरुणाने एका आठवड्यापूर्वी त्याच्या मोटरसायकलवर बिरसा मुंडा स्टिकर लावल्यामुळे चार अनोळखी लोकांनी त्याला मारहाण केल्याची आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुसऱ्या आदिवासीला वारंवार धमकावत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे.
फिर्यादी दीपक कुमार कोल म्हणतात की, त्यांना मारहाण करण्यात आली,
16 नोव्हेंबर रोजी रीवा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 70 किमी अंतरावर, पनवार गावात ही घटना घडली,
“मी किराणा सामान खरेदी करण्यासाठी बाहेर पडलो होतो तेव्हा चार जणांनी माझ्यावर मागून हल्ला केला. त्यांनी मला काळे-निळे होईपर्यंत मारहाण केली आणि मी त्यांना ओळखतही नाही. फक्त एक गोष्ट – माझ्या मोटरसायकलवर बिरसा मुंडा यांचे स्टिकर होते. दुसऱ्या एका आदिवासीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्यालाही मारहाण केली. आता ते त्याला धमकावत आहेत,” असं दीपक कोल यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं.
पनवार पोलिस स्टेशनचे प्रभारी महेंद्र सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी आयपीसी आणि एससी/एसटी (अॅट्रॉसिटी) कायद्यांतर्गत हल्ल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. “आम्हाला नवीन तक्रार मिळाली आहे की त्यांनी एका पीडितला धमकावले आहे. आम्ही तक्रारीची चौकशी करत आहोत आणि योग्य ती कारवाई करू,” असे ते म्हणाले.
सिनेमा: ‘जयभीम’, ‘जयंती’, सोशल मिडिया आणि समीक्षक
Jai bhim film Review – इरुलर जमातीचे भेदक चित्रण करणारा सिनेमा ‘ जयभीम ‘
अभिनेता गगन मलिक यांना डॉ.आंबेडकर यांची प्रतिमा भेट
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 24, 2021 17:45 PM
WebTitle – Tribal youth beaten for putting Birsa Munda sticker on bike