जळगाव : जळगांव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी वंचित बाजून आघाडी च्या अंजली (जान ) पाटील या वॉर्ड क्रमांक चारमधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून दणदणीत मतांनी विजयी झाल्या आहेत.अंजली पाटील तृतीयपंथी असल्याने अर्ज बाद केलेला.
अंजली पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेंव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी
त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन तो बाद केला होता,
त्यावेळी तृतीयपंथी असल्याने तिला महिला प्रवर्गातून उमेदवारी करता येणार नाही असे कारण देण्यात आले होते.
मतदार यादीतही त्यांच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख ‘इतर’ असा असल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती.
मात्र, अंजली यांनी हार मानली नाही.
त्यांनी आपली सहकारी तृतीयपंथी शमिभा पाटील यांच्या मदतीने न्यायासाठी थेट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावले होते.
या ठिकाणी कायदेशीर बाजू मांडल्याने त्यांना न्याय मिळाला. न्यायालयाने त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला. निकाल देताना कोर्टाने याचिकाकर्ती स्त्री प्रवर्गातून निवडणूक लढू शकतात असा निकाल दिला.त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तिची उमेदवारी मान्य करावी लागली आणि आज त्यांनी या निवडणूकीत दणदणीत विजयही मिळवला आहे. ही बदलाची सुरुवात आहे.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जातीयवाद हा भारतीय समाजाचा एक अतिशय लज्जास्पद आणि घृणास्पद अवगुण राहिला आहे.याच महिन्यात दहा दिवसांनी 15 ऑगस्ट या दिवशी आपण भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत.आपण एका स्वतंत्र देशातील नागरिक म्हणून किती जबाबदार आणि आदर्शवत आहोत? याचं उत्तर काल ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर कपडे काढून जो हैदोस घालण्यात आला त्यातून मिळू शकेल.
खरंच आपण या स्वातंत्र्यासाठी लायक आहोत का? हा प्रश्न आपण प्रत्येकाने निदान ७५ वर्षे साजरी करत असताना विचारला पाहिजे.आजही आपल्या मनातून आणि मेंदूतून जातियवादी कीड नष्ट होत नाही.याचा अनुभव नुकताच भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधार ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया यांच्या कुटुंबीयांना आला आहे.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
Comments 1