09 जानेवारी 2025| आंध्रप्रदेश : आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात बुधवार रात्री झालेल्या चेंगराचेंगरी मुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 40 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. तिरुमला येथील भगवान वेंकटेश्वर मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शनासाठी टोकन वितरणादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.
तिरुपती मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
मिळालेल्या माहितीनुसार, तिरुपती मंदिरात वैकुंठ द्वार दर्शनासाठी टोकन घेण्यासाठी 4000 हून अधिक लोक रांगेत होते, पण केवळ 91 काउंटर टोकन देण्यासाठी उपलब्ध होते. यामुळे गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरी ची परिस्थिती निर्माण झाली. विशेषतः महिलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच लोक यात अडकले. पट्टीडा पार्क येथे जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि तिथेच गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. या घटनेत तीन महिला आणि एका पुरुषासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
प्रशासनाचा जबाब
टीटीडी (तिरुमला तिरुपती देवस्थान) चेअरमन बी. आर. नायडू यांनी सांगितले की, ही चेंगराचेंगरी गर्दीमुळे झाली. त्यांनी स्पष्ट केले की, या घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि याबाबतचा अहवाल लवकरच सादर केला जाईल. मृतांमध्ये काही जण तमिळनाडूमधील आहेत, तर काही आंध्र प्रदेशातील आहेत. सध्या एका मृत व्यक्तीची ओळख पटली आहे, तर पाच जणांची ओळख अद्याप पटलेली नाही.
तिरुपतीचे नगर आयुक्त मौर्य यांनीही सांगितले की, इतर सर्व काउंटरवर शांततेने टोकन दिले जात होते, पण एमजीएम शाळेत लागलेल्या काउंटरवर 4000-5000 लोकांची एकत्र गर्दी झाली होती.
Tirupati stampede | Andhra Pradesh | TTD (Tirumala Tirupati Devasthanams) Chairman BR Naidu says, " It is an unfortunate event, 6 pilgrims lost their lives. So far, only one pilgrim has been identified, while the others are yet to be identified. N Chief Minister Chandrababu… pic.twitter.com/VtvzVpWHUs
— ANI (@ANI) January 8, 2025
मृत्यू आणि जखमींवर उपचार
या घटनेत मृत्यू पावलेल्या चार जणांमध्ये तीन महिला आहेत, तर जखमींवर श्री वेंकटेश्वर रामनारायण रुइया सरकारी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सरकार आणि प्रशासनाकडून प्रतिक्रिया
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या घटनेनंतर तिरुपती येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याची घोषणा केली आहे.त्यानुसार गुरुवारी सकाळी 10.30 वाजता तिरुपतीतील रुग्णालयाला भेट देणार आहेत तसेच प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. सीएम यांनी टीटीडीला आदेश दिले आहेत की, भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी उपाययोजना आखाव्यात.
निर्माण झालेले प्रश्न
या दुर्दैवी घटनेनंतर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत, ज्यांची उत्तरे प्रशासनाला द्यावी लागतील:
तिरुपती मंदिरातील भगदडीस जबाबदार कोण?
दर्शनासाठी फक्त 91 काउंटर का ठेवण्यात आले?
टोकन वितरणात अशा प्रकारची गोंधळ की का निर्माण झाला?
पट्टीडा पार्कमध्ये गर्दी हलवण्याचा निर्णय कोणी घेतला?
4000 लोकांना सुरक्षितपणे कसे हलवता आले नाही?
या घटनेतील मृतांची जबाबदारी कोण घेणार?
व्हायरल झालेले व्हिडिओ
घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यात लोकांना पळताना आणि काही लोकांना सीपीआर देताना दिसत आहे.
तसेच, एकाच वेळी मोठ्या संख्येने लोकांना पट्टीडा पार्कमध्ये पाठवले गेल्यामुळे ही घटना घडल्याचे उघड झाले आहे.
पुढील कारवाई
सीएम नायडू यांनी पोलिसांना अधिक सुरक्षा तैनात करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असून यासंदर्भातील अहवाल लवकरच जाहीर होईल.तिरुपती मंदिरातील ही दुर्दैवी घटना धार्मिक स्थळांवर गर्दी व्यवस्थापनाची आवश्यकता अधोरेखित करते. प्रशासनाने यापुढे अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी तत्काळ आणि कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 09,2024 | 10:23 AM
WebTitle – tirupati-temple-stampede-six-dead-questions-raised