सोलापूर,दि 4 :सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलने सुरू झाली आहेत. मराठा आक्रोश मोर्चा चं आयोजन आज सोलापुरात करण्यात आलं होतं. संचारबंदीचे आदेश झुगारून हजारो मराठा तरुणांनी या मोर्चात भाग घेतला.
यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ आणि ‘कोण म्हणतं देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय’, अशा गगनभेदी घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या मोर्चात हजारो तरुण सहभागी झाल्याने पोलीस यंत्रणांचेही धाबे दणाणले. त्यामुळे पोलिसांनी अनेकांची धरपकड केल्याने आंदोलक प्रचंड संतप्त झाले होते.
मराठा आक्रोश मोर्चा चे आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी या आक्रोश मोर्चाची हाक दिली होती.मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती.संचारबंदी आणि कोरोनाचं कारणही त्यासाठी देण्यात आलं होतं. मात्र, संचारबंदीचे आदेश झुगारून नरेंद्र पाटील यांनी हा आक्रोश मोर्चा काढला. संभाजी चौकात सकाळीच आंदोलक जमले होते.
दुपारी ही गर्दी प्रचंड वाढल्याने आंदोलकांच्या घोषणाही दणाणू लागल्या. यावेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना सोलापूरच्या वेशीवर अडवले. काहींची धरपकड केली.(narendra patil organized Maratha Akrosh Morcha For Maratha Reservation in Solapur)
हेही वाचा.. Maratha Reservation : घटना दुरुस्ती शिवाय पर्याय नाही ; खासदार संभाजीराजे भोसले
सोलापुरातून आज पहिला आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यासाठी आम्ही आठ दिवसांपासून तयारी केली होती. पण महाविकास आघाडीने पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून मोर्चा निघू नये यासाठी प्रयत्न केले. राज्यात अनेक मोर्चे निघाले. अनेक आंदोलने झाली. त्यांना परवानगी दिली गेली. ते मोर्चे मोडीत काढले नाहीत. फक्त मराठा मोर्चेच अडवले जात आहेत, असा गंभीर आरोप करतानाच ब्रिटीशांनीही कधी आंदोलने दडपली नाहीत. पण हे सरकार आंदोलन दडपत आहे. हे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे, अशी टीका पाटील यांनी केली. या मोर्चात सविता देवी राजेभोसले आणि भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनीही सहभाग घेतला होता.
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 04 , 2021 15 : 15 PM
WebTitle – Thousands of Maratha Akrosh morcha in Solapur; Many arrested 2021-07-04