नागरिकांनी सोशल मीडियावर तक्रार मांडली मदत मागितली तर तिला चुकीची माहिती ठरवण्यात येऊ नये, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
ऑक्सिजनचा पुरवठा,औषध उपलब्धता आणि कोरोना च्या जागतिक साथीबद्दलच्या इतर काही धोरणात्मक बाबींची सुप्रीम कोर्टाने स्वतःहून दखल घेतली होती (Suo Moto) त्यावर आज सुनावणी झाली.ऑक्सीजन साठी मदत मागणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही.
नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑक्सीजन साठी मदत मागितली तक्रार केली वा व्यथा मांडली तर ती चुकीची माहिती ठरवता येऊ शकणार नसल्याचं तसेच मदत मागणाऱ्यांवर कारवाई करता येणार नसल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय. कोणत्याही प्रकारे माहितीची मुस्कटदाबी करू नये,अशा तक्रारींवर कारवाई केल्यास तो कोर्टाचा अवमान समजला जाईल,असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.शशांक यादव या तरुणाने आपल्या आजोबांना ऑक्सीजन मिळावे यासाठी अभिनेता सोनू सुद यास मेन्शन करून ट्विट केले होते.
कोणत्याही प्रकारे माहिती दाबण्यात येऊ नये असं सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची दखल घेत वरील प्रकारे खडसावले आहे.
मात्र शशांक यादव याच्या आजोबांचा मृत्यू झाला.या तरुणाच्या आजोबांना कोव्हिड नाही,त्यांना ऑक्सिजनची गरज नाही असा दावा करत अमेठी पोलिसांनी या तरुणावर पँडेमिक अॅक्टखाली अफवा पसरवण्याचा गुन्हा नोंदवला.मात्र नंतर कलम 44 अन्वये नोटिस देत ताकीद देऊन त्यास सोडून देण्यात आले. शशांक यादवचे ट्विट स्मृती इराणी यांनीही शेअर केले होते.
मात्र याविषयी ट्वीट करणाऱ्या पत्रकार आरफा खानम यांनाही अमेठी पोलिसांनी ट्वीटरवरूनच अशी ट्वीट्स न करण्याची सूचना केली होती. पोलिसांनी अशा प्रकारे कारवाई करण्यावर मोठी टीका झाली होती.कोणत्याही प्रकारे माहिती दाबण्यात येऊ नये असं सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची दखल घेत वरील प्रकारे खडसावले आहे.ऑक्सीजन साठी मदत मागणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही.
तसेच ऑक्सिजन टँकर्स आणि सिलेंडर्सच्या पुरवठ्यासाठी कोणती पावलं उचलण्यात येत आहेत.
केंद्र आणि राज्य सरकार निरक्षर नागरिकांपर्यंत लसीकरण मोहीम नेण्यासाठी काय करत आहे?
असे सवालही सुप्रीम कोर्टाने उपस्थित केले आहेत.
दरम्यान,केंद्र सरकार १०० टक्के कोरोना लसींची खरेदी का करत नाही,यामुळे देशवासीयांना एक समान किमतीत लस उपलब्ध होऊ शकेल.
राज्य आणि केंद्राच्या किमतीत फरक राहणार नाही.लसीकरण मोहिमेत राज्यांना प्राधान्य देता येणार नाही का?
अशी विचारणाही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR30, 2021 11:33 AM
WebTitle – those-seeking-help-for-oxygen-and-beds-on-social-media-cannot-be-prosecuted-the-court-said-2021-04-30