मुंबई : Mumbai Cruise Drugs Case : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानची आर्थर रोड जेलमधून सुटका करण्यात आली आहे. तुरुंगात जामिनाची कागदपत्रे वेळेवर न आल्याने आर्यन खानची शुक्रवारी सुटका होऊ शकली नाही. मात्र,आज आर्यन खान जामीन होऊन तुरुंगातून बाहेर आला आहे. मात्र, आर्यनसह तीन आरोपींना जामीन देताना न्यायालयाने 14 अटी घातल्या होत्या. या अटींचे पालन करणे तिघांनाही बंधनकारक आहे.या 14 अटींपैकी कोणत्याही एका अटीचे उल्लंघन केल्यास आर्यनसह तीन आरोपींना पुन्हा एकदा तुरुंगात जावे लागू शकते.
या आहेत 14 अटी
1. जामीन आदेशानुसार, त्याला एक लाख रुपयांचा वैयक्तिक बॉन्ड जमा करावा लागेल.
2. अशा कोणत्याही प्रकरणात पुन्हा गुंतू नका ज्याच्या आधारावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्ह्यांसाठी त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली गेली आहे.
3. या प्रकरणातील आरोपीशी बातचीत करणार नाही.
4. आरोपी असे कोणतेही कृत्य करणार नाही ज्याचा या प्रकरणावर कोणताही परिणाम होईल.
5. साक्षीदार किंवा पुराव्यांशी छेडछाड करणार नाही.
6. आरोपींना त्यांचे पासपोर्टही सरेंडर करावे लागतील.
7. प्रसार माध्यमांशी बोलणार नाही.
8. विशेष न्यायाधीशांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुंबई सोडता येणार नाही.
9. मुंबईबाहेर जाण्याबाबत तपास अधिकाऱ्याला कळवावे लागेल आणि स्वत:चे वेळापत्रक सांगावे लागेल
10. शुक्रवारी सकाळी 11 ते 2 या वेळेत NCB कार्यालयात हजर राहावे लागेल.
11. न्यायालयाच्या सुनावणीस उपस्थित राहावे लागेल आणि आवश्यकतेनुसार तपासात सहकार्य करावे लागेल.
12. एकदा ट्रायल सुरू झाल्यानंतर, ट्रायलला कोणत्याही प्रकारे विलंब करणार नाही.
13. अर्जदार/आरोपी सर्व तारखांना न्यायालयात उपस्थित राहतील, जोपर्यंत कोणत्याही उचित कारणासाठी रोखले जात नाही.
14. आरोपीने यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन केल्यास एनसीबी आरोपीचा जामीन रद्द करण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज करू शकते.
या 14 अटींपैकी कोणत्याही एका अटीचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द होऊन आर्यन खान सह इतर तीन आरोपींना पुन्हा एकदा तुरुंगात जावे लागू शकते.
JNU वेबिनारसाठी ‘Indian occupation in Kashmir’ लिहिल्याने विवाद
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
किरण गोसावी चा अटक होण्यापूर्वी आला नवा व्हिडिओ
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; जामिनावर नवाब मलिकांची प्रतिक्रिया
आर्यन खान प्रकरण; वानखेडेंवर आरोप;पंच चा धक्कादायक गौप्यस्फोट!
फॅक्ट चेक : शाहरुख खानचे वडील स्वातंत्र्यसैनिक नव्हते का?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 30, 2021 12:54 PM
WebTitle – These 14 conditions in front of Aryan Khan, re-imprisonment if violated