मुंबई: सोशल मिडिया प्लॅटफॉर्म व्हाटसेप वर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई क्राइम ब्रांचच्या सायबर सेलनं अटक केली आहे. जयसिंह राजपूत असं या आरोपीचं नाव आहे. व्हॉट्सअॅपवर मेसेज करून आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा चाहता असल्याचा दावा त्याने स्वतः केला आहे.आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेल्या धमकीवर आज विधानसभेत जोरदार चर्चा झाली. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली.कलबुर्गी, गौरी लंकेश,दाभोळकरांच्या हत्येमागे सनातन सारख्या संस्था आहेत. बऱ्याच मंत्र्यांना धमक्या येत आहेत याची चौकशी झाली पाहिजे. यासाठी आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून एसआयटी गठीत करावी.
आदित्य ठाकरेंना देण्यात आलेली धमकी ही कर्नाटकमधून आल्याचे समोर आले आहे.
मलिक यांनी गौरी लंकेश, दाभोळकर आणि पानसरे यांच्याही हत्येचं कनेक्शन कर्नाटक असल्याचे
मलिक यांनी विधानसभेत सांगितले तसेच त्यांनी ट्विटरवरूनही माहिती दिली आहे.
कलबुर्गी, गौरी लंकेश,दाभोळकरांच्या हत्येमागे सनातन सारख्या संस्था
नवाब मलिक म्हणाले , राज्यातील एका मंत्र्यांना व्हॉट्सअॅपवर धमकी येते. राजपूत नावाच्या व्यक्तीला अटक होते.
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्यानंतर या महाराष्ट्रात ही आत्महत्या नाही हत्या आहे असे सांगण्यात आले
सुशांतसिंग राजपूतच्या आडून बऱ्याचशा मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला.
सुशांत सिंग राजपूतच्या हत्येमागे अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर दडपण आणून गुन्हा दाखल करण्यात आला.
आत्महत्या मुंबईत घडली बिहारमध्ये तक्रार नोंद होते आणि तो तपास बिहारचे पोलीस
मुंबईमध्ये करण्यासाठी येत असताना बीएमडब्लू आणि मर्सिडीज गाडीमध्ये फिरत होते. ती गाडी कोणाची होती?
ती गाडी भाजपच्या एका नेत्याची होती. त्याचे नाव आहे निलोपत उत्पल.
त्या दिवसापासून आजपर्यंत सुशांत सिंह राजपूत ट्रेंड होत आहे.
म्हणजे ट्विटरवर ट्रेंड करण्यासाठी महिन्याला ३० लाख रुपये पुरवण्याचे काम होते.
सुशांत सिंह राजपूतची केस रजिस्टर झाल्यानंतर कायद्याने मुंबईमध्ये ट्रान्सफर करणे बंधनकारक होते.
पण तिकडच्या सरकारने निर्णय घेतला की हे प्रकरण सीबीआयला द्यायचे
पण सीबीआयला केस दिल्यानंतर ही आत्महत्या की हत्या हे सिद्ध झालेले नाही.
ट्विटरच्या माध्यमातून मला धमक्या येत आहेत. मला बरेचशे पत्र आलेले आहेत मी गृहमंत्र्यांना पाठवले आहेत.
कलबुर्गी, दाभोळकर, गौरी लंकेश यांच्या हत्येमागे सनातनसारख्या संस्था आहेत.
बऱ्याच मंत्र्यांना धमक्या येत आहेत याची चौकशी झाली पाहिजे.
यासाठी आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून एसआयटी गठीत करावी.
‘निवडणूक कायदा दुरुस्ती’ विधेयक २७ मिनिटांत लोकसभेत मंजूर
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 23, 2021 22: 13 PM
WebTitle – There are organizations like Sanatan sanstha behind the murder of Kalburgi, Gauri Lankesh, Dabholkar.