‘माणसाला त्याच्यावर लादलेली जुनी ओळख पुसून टाकायची असेल तर त्याने देशांतर, नामांतर आणि धर्मांतर या पूर्व अटींचे पालन केले पाहिजे’
प्रसिद्ध मॅगझीन आउटलुक ने ambedkar anniversary special म्हणून पन्नास लोकांची यादी काढली त्यास 50 DALITS Remaking india असे शीर्षक दिले आहे..या यादीला “दलित” नाव दिल्याने त्यावर शब्दामाध्यमातून जोरदार चर्चा झाली,अनेक सजग आणि आत्मभान असणाऱ्या डोळस असणाऱ्या आंबेडकरी तरुणांनी यावर आपले परखड मत व्यक्त केले. यातील काही निवडक मते आम्ही जागल्या भारतच्या वाचकांना उपलब्ध करून देत आहोत.
आमच्या माथ्यावर दलितत्वाचा शिक्का इथल्या वैदिक धर्मव्यवस्थेने मारला होता. म्हणजे आम्ही जर दलित असू तर कोणी तरी प्रस्थापित असले पाहिजे. आणि आम्ही जेव्हा प्रस्थापितांना प्रश्न विचारतो तेव्हा त्यांना त्रास होतो. प्रश्न विचारलेले त्यांना चालत नाही.
आमचा बाप म्हणाला होता, ‘माणसाला त्याच्यावर लादलेली जुनी ओळख पुसून टाकायची असेल तर त्याने देशांतर, नामांतर आणि धर्मांतर या पूर्व अटींचे पालन केले पाहिजे’.
देशांतर : गावखेड्यात राहत होतो, तिथे आमच्यावर रोज अत्याचार होत होते. आम्ही जिथे आमच्यावर शोषण होत होतं ती जागा सोडून शहरात आलो. म्हणजे आम्ही देशांतर केलं.
नामांतर : आमची जी जुनी ओळख होती त्याच्यावरून आमच्यावर अत्याचार करण्याची संधी मिळत होती. आमच्या शोषणाला कारणीभूत असलेले नाव – आडनाव आम्ही बदलून टाकले. म्हणजे आम्ही नामांतर केले.
धर्मांतर : वैदिक धर्मामध्ये आमचे स्थान पशू पेक्षा खालील होते. म्हणून ज्या धर्मात आमचे शोषण होत होते तो धर्म आम्ही बदलून टाकला. म्हणजे आम्ही धर्मांतर केले.
आमच्या बापाने जे सांगितले तेच आम्ही केलं. आमचा बाप पुढे म्हणाला होता की, फक्त एवढच केल्याने तुमचं शोषण थांबणार नाही. ज्या ज्या आधारावर तुमचं कायम शोषण होत राहिलेलं आहे तो प्रत्येक किल्ला तुम्ही सुरुंग लावून उध्वस्त केला पाहिजे. शासक वर्गाची इच्छा आहे की त्यांनी आमचे मालक व्हावे, पण आम्ही तुमचे गुलाम व्हावे अशी आमची इच्छा नाही.
जात ही तुमच्यासाठी भांडवल (Asset) आहे. जातीच्या आधारावर तुम्ही संपत्ती निर्माण करू शकता.
म्हणून तुम्हाला जात सोडायची नाही. जातीमुळे मिळणारे फायदे सोडायचे नाहीत.
जात ही आमच्यासाठी उत्तरदायित्व (Liability) आहे. जातीमुळे आमचे प्रचंड नुकसान झाले आहे. आम्हाला जात एक ही क्षण नको आहे. जातीमुळे आमचे कायम नुकसानच होणार आहे.
जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे ती टिकवण्यासाठी तुम्ही जोर लावणार. जी गोष्ट आम्हाला नको आहे ती तोडण्यासाठी आम्ही जोर लावणार. यातून संघर्ष उभा राहणार.
हे थांबवावे लागेल. आजचा ‘दलित’ हा शब्द या एतेहासिक संघर्षाला परत सुरुवात करून देणारे निमित्त आहे.
आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत. आम्ही कोणाचे गुलाम नाही,आम्ही दलित नाही.
तुमची जात ही तुमची ओळख आहे. पण ‘भारतीय’ हीच आमची ओळख आहे.लक्षात असू द्या.
लेखन – विश्वदिप करंजीकर
आम्हाला आजही इथे आम्ही भारतीय आहोत म्हणूनच झगडावं, लिहावं लागतेय !
ते आम्हाला आजही मनुस्मृतीच्या वर्णनानुसार वर्णन करायला, हिणवायला किंवा संबोधयाला मागे सरत नाहीय.
त्यांना त्यांच्या ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य असल्याचा किंवा ती मिरवण्याचा तो कोणी संबोधण्याचा काहीच त्रास नाहीय कारण ते तेव्हा हि आणि आजही मनुस्मृतीचे वाहक आणि पुरस्कर्ते आहेत.
त्यांना त्यांचं स्थान आजही उच्चच वाटतेय !
ते आजही जातीवादाला पोसणारे हार्ड आणि सॉफ्ट कॉर्नर सपोर्टर आहेत.
उद्या ह्यांना 50 ब्राम्हण किंवा 50 क्षत्रिय किंवा 50 इतर काही यादी काढली ना तर त्यांना आनंदच होणार आहे…
त्याचा त्यांना अभिमानच वाटणार आहे !
त्याहून त्यांना समाजात आजही ‘दलित’ आहेत.आम्ही दिलेल्या शिवी ला मानणारे आणि ते आजही ‘दलितच’ आहेत हे जेव्हा जेव्हा मांडल जाईल, लिहिलं जाईल, बोललं जाईल आणि छापलं हि जाईल तेव्हा तेव्हा हि त्यांना मनुस्मृतीचे वर्गवार विभागणी जीवंत आहे म्हणून त्यांना जास्त आनंद होईल एवढं खरंय..
लेखन – प्रसाद देठे
Ambedkarite Squad
Dr. Babasaheb Ambedkar struggled for freedom from the inner enemies and to free underprivileged people from the shackles of caste-based discrimination and succeeded too.
A great scholar and a person of great stature like Dr. Babasaheb Ambedkar should have foresight of his own actions/ decisions. Also, he must have visualized that for most Indian people, habitual of worshipping, won’t matter!!
What could have mattered most is independence from all religions and vision & path/ foundation for it.
Babasaheb.. the first law and justice minister of independent India and had a great grip on policymaking and so in that capacity, he have pitched/ laid the foundation for a casteless and religionless society, by way of on paper rules through a constitution which is now have always been extremely vocal for a country of herd mentality.
but what is the larger picture now? Whether the mentality of caste-based discrimination itself ended totally/ to a larger extent?
No!!
We can see it almost everywhere around us whether it could be on personal, social or professional platforms as well!!
Babasaheb probably realized that without a complete deconstruction of prevalent social norms, freedom from the British would mean only a shift of power from White Supremacists to in-house Manusmriti Supremacists.
This is what we get to see at today’s date also!
Recently, Outlook Magazine has announced the 50 most influential people in all over the country of India. The list of 50 people is highly appreciated and respected!
There is no anger or hatred towards 50 of them. On the contrary, I appreciate them and congratulate them and their work. People on this list are great scholars. There is no objection to the list of 50 people released by Outlook. Yes..but there is an objection with the Title “Dalit” used by them for categorizing this people.
While the term Ambedkarite or Indian could be used to mean that..but they of course wanted us to remain in our own list. Right!?? I find this to be ridiculous.
We are Universal, it has the names of many great people with whom the established here and the “So-Called Savarnas” do not deserve to sit next to these people.
I strongly condemned Outlook Magazine by giving the Title as Dalit for these people. Hope Outlook Magazine knows that the Indian Supreme Court has banned the word Dalit but still you have honored these people by categorizing them with the same.
Expect Outlook would change the given title “Dalit” by “50 most Influential Ambedkarites in India”!
Recently, now it highly reflects the social discrimination in many ways a fresh example like Twitter has released emojis and hashtags as Dalit History Month for remembering the legacy of Dr. Babasaheb Ambedkar on the occasion of his Birth Anniversary i.e. Dr.Babasaheb Ambedkar’s Jayanti on 14th April. This is again a casteist action. They would have used the term “Social Revolution Month” rather than “Dalit History Month”.
We need to understand this!
written by – Asmita A Jadhav
आम्ही दलित नाही, आम्ही आंबेडकरवादी आहोत, एवढं एका वाक्याने कम्युनिस्ट, सवर्ण लिबरल होरपळून निघाले. आता नको ते आरोप करतील. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा व जीवीत हानीची जबाबदारी कोणी आंबेडकरवाद्यावर ढकलत असेल तर फार काही नवल वाटणार नाही. तुमचा आजारच आहे तो, जो आंबेडकर, आंबेडकरवादी ओळख सांगितल्यावर उफळुन येतो.लैय फरक असतो एक दलित आणि एक आंबेडकरवादी म्हणुन ओळख सांगण्याऱ्यात.
लेखन – राहुल पगारे
आऊट लूक मॅगझीन ने ambedkar anniversary special म्हणून पन्नास लोकांची यादी काढून त्याला 50 DALITS Remaking india असे शीर्षक दिले आहे..आता त्यातल्या “दलित” शब्दावर चर्चा चालू आहे. काही विरोधात काही समर्थनात तर काही म्हणे पर्यायी शब्द काय ?
मुळात ह्यात एक गोष्ट लक्षात घ्या आऊटलूक काय आहे ?
प्रोफिटेबल व्यवसाय करणारा मीडिया हाऊस किंवा त्याचा एक भाग.ह्यात कशी आर्थिक गणिते असतात तुम्ही नीट लक्षात घ्या.ह्या सगळ्या मागे मुख्य आर्थिक बाजूने बघा आणि नीट समजून घ्या.
जगाच्या पाठीवर सगळ्यात भावनिक समाज कोणता असेल तर तो आपला इंडियन बुद्धिस्ट किंवा (महाराष्ट्रीयन बुद्धिस्ट)
15-20 वर्षांपूर्वी 14 एप्रिल, 6 डिसें ला दूरदर्शन सोडले तर कोणत्या चॅनेल वर बाबासाहेब किंवा संबंधित बातम्या किंवा माहिती पट दखवले जात होते का ?
उत्तर नाही असे आहे.
आता अनेक लिडिंग चॅनेल बाबासाहेबांची गाणी गातात. शिंदे फॅमिली रुबाबात जय भीम चा नारा देऊन स्पेशल प्रोग्रॅम करते,
तर काही चॅनेल बाबासाहेबांवर मालिका काढतात.त्याला चांगला रिस्पॉन्स पण भेटतो.
मग आधी बाबासाहेब नव्हते का ? त्यांचे कार्य ह्या लोकांना माहीत नव्हते ?
आधी का मेंन स्ट्रीम मीडियात बाबासाहेबांना जागा नव्हती ???
तर याचे उत्तर आहे आधी तुमच्या खिशात पैसे नव्हते. तुमच्या घरात टीव्ही नव्हता, तुमच्या हातात मोबाईल नव्हता.
ते जे दाखवणार ते तुम्ही बघावे याचे साधन तुमच्याकडे नव्हते.ते साधन आता तुमच्याकडे आहे.
व्यावसायिकाला पक्का माहीत आहे हा समाज बाबासाहेबांवर काही बनवले/दाखवले तर हमखास बघणार.
तसंच तुम्ही आता हे मॅगझीन विकत घेणार किंवा त्यावर चर्चा करणार.आता हा आऊटलूक मागासवर्गीय लोकांचा हितैषी आहे का ?
खैरलांजी पासून काल परवाच्या लातूर प्रकरणामध्ये कधी आऊटलूक ने एक लाईन लिहली आहे का ?
देशभरातील मागासवर्गीय अन्याय अत्याचाराची बातमी देऊन व्यवस्थेला प्रश्न विचारला आहे का ?
ह्यात फक्त व्यावसायिक गणितं असतात.ह्याच लिस्ट मधे सिनियर IPS अधिकारी RS प्रवीण कुमार आहेत.
मध्यंतरी त्यांनी ऑफ ड्युटी एका कार्यक्रमात बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे वाचन केले होते
तेव्हा देशभरातील हिंदुत्व संघटनांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली तेव्हा कुठे होता OUTLOOK ?
बरं आता दलितच्या जागी काय म्हणावे ?
बाबासाहेब त्यांच्या हयातीत ह्या सगळ्या मागासवर्गीय वर्गा बद्दल “शेड्यूल्ड कास्ट” असा शब्द वापरत.
दलित शब्द संविधानात कुठे आहे का ?
मग Outlook ला दलित शब्द कशाला पाहिजे ?
ही सगळी 50 मंडळी आहेत ती बाबासाहेब मृत्यू/महापरिनिर्वाण नंतरची आहेत.
बाबासाहेब नसते तर ह्यांना outlook सोडा कोणी बाजूला तरी उभे केले असते का ?
मग ह्यांचा पाथच मुळात आंबेडकरी विचारावर आहे.
ह्यांचे आजचे नाव बाबासाहेबांनी जो संघर्ष केला त्यामुळे आहे मग #ambedkarite शब्दाची काय ऍलर्जी आहे का ?
त्यात कोणीही कोणत्याही जाती धर्माचा असू शकतो.त्याचा विचार आंबेडकरी/समानतेचा आहे मग तो आंबेडकरीच..
तुम्ही गोष्टी नाकारायला शिका हेच तर बाबासाहेब सांगायचे. पोस्ट आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांच्या मृत्यू नंतरचा काळ हा ambedkarite विचारसरणीचा काळ का म्हणू नये.हा आता अंतरराष्ट्रीय पातळीवर काही NGO/संस्था यांच्या फंडिंग साठी (आर्थिक व्यवहारासाठी) ग्लोबल लेव्हल वर “दलित” शब्द ठेवतात त्याला वेगळे अँगल आहेत..मात्र इथे अनेकांना आजही आंबेडकरी किंवा ambedkarite ह्या शब्दचा त्रास आहेच. Outlook ने तेच दाखवले आहे.
लेखन – सुशांत कांबळे
“सकारात्मक आणि महत्वाकांक्षी चळवळीची बांधणी करायची असेल तर तुम्हाला या अख्ख्या जगाला तुमचं दारिद्रय, शोषण, दुःख हे विकत बसण्यापेक्षा स्वतःच्या समाजाला उमेदीची शक्यता रेखाटून दाखवण गरजेचं आहे.”
~ रेमंड विलीयम्स हा एक ब्रिटनमधील लेखक होऊन गेला.
त्याच्या दोन वाक्यांवरून काही महत्त्वाचे दृष्टीकोन समोर मांडतो.
1. ‘to be truly radical is to make hope possible rather than despair convincing’
सकारात्मक आणि महत्वाकांक्षी चळवळीची बांधणी करायची असेल तर तुम्हाला या अख्ख्या जगाला तुमचं दारिद्रय, शोषण, दुःख हे विकत बसण्यापेक्षा स्वतःच्या समाजाला उमेदीची शक्यता रेखाटून दाखवण गरजेचं आहे. जग आंधळं आहे आणि त्याला एकदा सगळं कळालं की आपल्या उद्धाराचे मार्ग मोकळे होणार हा विचार कुठेतरी मनात घर करून असतो.त्यामुळे कुठे काही भयानक आणि क्रूर घडलं की त्याचा उपयोग म्हणून ते डिबेटमध्ये उदाहरण म्हणून सर्वत्र चिकटवण, आणि कोणी त्यावर पुस्तक सिनेमा काढला की त्याला डोक्यावर घेणं हे समजून की आता नेमकं सगळ्या जगाला कळेल की खरं चित्र किती विदारक आहे, हा विचार सोडून द्यावा लागेल.
2. ‘There are in fact no masses, but only ways of seeing people as masses’
एक समूहाला अगोदरपासून सामाजिक आणि आर्थिक शोषणामुळे मिळालेली ओळख यामध्ये सगळ्या नकारात्मक गोष्टी असतात.सामाजिक विद्रोहाची सुरुवात या ओळखीचा उपयोग करून, त्याला घेऊन आणि उलटं करून एक बंड करून होतो, पण तो त्या विद्रोहाचा अंतिम आग्रह आणि ध्येय कधीच नसतो. अंतिम आग्रह काय असतो हे बाबासाहेबांनी सांगितलंय, की , ‘स्वत्वा’ची आणि स्वतःच्या माणुसकीची सगळ्या कचाटीतून सुटका करून आपल्या मनाला पूर्णपणे घडवणे जेणेकरून आपले पूर्ण पंख पसरवून झेप घेता येईल.
बंड करायची प्रक्रिया जिथे ऐतिहासिक ओळखीला उलटं करून सुरू होते, तिथेच संपत नाही.उलट, एक अशी वेळ येते की या बंडाला पूर्णपणे गिळून घेण्यात येतं आणि काही टोकन लोकांना त्या ओळखीची पदवी बहाल करून पुढील बंडाची शक्यता तिथेच थांबवली जाते. अश्यावेळी तो माणुसकी मिळवण्याचा लढा अजून बळकट करायची गरज असते, आणि “वेगळ्या लेबल”च ओझं त्याच्यावर लादण्यात यावं जो चुकतोय. कारण एक स्वतंत्र माणूस म्हणून स्वतःला घडवताना कोणतेच लेबल आड नको यायला ही दक्षता आपली आपणच पाळायची असते~
काकांशी फोन वर बोलतांना आज पँथर राजा ढालेंचा विषय निघाला आणि ते थोडे गहिवरुन आले.ते जेव्हा भाषण द्यायचे तेव्हा प्रत्येक श्रोत्यामागे २ पोलिस असणार असे समीकरण होते’ है त्यांनी गर्वाने नमूद केलं. चळवळीत पूर्णपणे बुडाले असतांना त्यांनी ज्ञान-निर्मितीचे नियंत्रण आपल्या हाती घेऊन स्वतंत्र आवाज स्थापन केला, दलीतत्व हे अंतिम ध्येय नसून माणुस म्हणून पूर्णपणे आपली ओळख ठळकपणे मांडणे हे त्या मुख्य विचारांपैकी एक. या विचाराला धरून या पिढीने तो अजून पुढे न्यायला हवा होता, आणि काही तसं जिद्दीने करताय सुद्धा. पण त्याच वेळी कोणी जवळपास सगळं उभं आयुष्य बाहेर जगून ‘मी आता दलित म्हणून बाहेर पडते’ असं तीस-चाळीस वर्षांनी जुनं झालेलं दलित आत्मचरित्रावरील एक नरेटिव्ह पुढे आणतं आणि जगभर पुस्तके वाटले जातात, कोणी पाश्चात्य देशांतील सर्वोच्च संस्थांमधून शिक्षण घेऊन परत भारतात येऊन हे सांगत फिरतं की अमेरिकेतसुद्धा मी दलीतच आहे आणि संविधान कसं अपुरे आहे वगैरे, तेव्हा असं वाटतं की इतकी वर्षे माझ्या अगोदरच्या पिढीने पुढे आणलेला लढा आपण मागे तर घेऊन नाही जात आहोत ना?
बाबासाहेबच म्हणाले होते ना की पुढे नेता नाही आलं तरी चालेल, पण हा लढा मागे येऊ देऊ नका.
अश्यावेळी पँथर राजा ढाले आज आपल्यातून गेले यामुळे ती वैचारिक आणि ज्वलंत नजरेने भविष्याकडे पाहणारी डोळी आज मिटली आहेत हे जाणवतं. पुन्हा नव्याने या पिढीला सुरुवात करणे गरजेचे झाले आहे. डिग्री किंवा शीर्षके किंवा कोणती नोकरी किंवा कोणतं कॉलेज यापेक्षा परत एकदा विचारांनेच एकमेकाला पराखण्याची गरज आज आहे, मेरिटचे मिथक बाजूला सारून परत नव्याने ज्ञान-निर्मिती करणे गरजेचे आहे, ज्याची सगळी जबाबदारी ही “प्रत्येकाची” असेल. प्रत्येकाची. स्वतःचे माणूसपण जगाला ठासून सांगत जो शोषक असेल तर त्याने आपली स्वतःची ओळख माणूस सोडून काही वेगळी ओळख करावी, हे अधोरेखित करायची वेळ आली आहे.
सगळी अस्वस्थता आहे मनात आज, म्हणून नंतर कधी यावर वेगळं लिहिल.
आज फक्त पँथरला शेवटचा पण कायमचा मनात प्रतिध्वनी बनून जिवंत राहील,असा एक जय भीम..
लेखन – गौरव सोमवंशी
२०१९ च्या डिसेंबरात नागपूरला जाणं झालं. यशवंत मनोहर सरांची भेट घेता आली. त्यादरम्यान, सरांचं लिखाण नव्यानंच वाचायला सुरुवात केली होती. त्यांच्या उजेडाच्या शब्दांनी खूप अंतर्मुख झाले होते मी. सर खूप गहिरं बोलत गेले. त्यांच्या जन्मापासून आजपर्यंतचा प्रवास सांगत गेले. आईबद्दल भरभरून बोलले. ऐकताना जिवाचे कान करुन शब्दन् शब्द कानात साठवत होते मी.
आपल्या सगळ्या आंबेडकरी बांधवांच्या आयुष्यात माणूस म्हणून सन्मानाने जगण्याच्या उर्मींचा उजेड निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी जे रक्ताचं पाणी केलं, त्या प्रक्रियेचं, संघर्षाचं सौंदर्यशास्त्र एका दार्शनिकाच्या नजरेतून उलगडत जाताना प्रत्यक्ष पाहाणं, ऐकणं हा एक आतून हलवणारा अनुभव होता. इतकं स्वच्छ आणि स्पष्ट आकलन.
इथल्या ब्राह्मणी मेंदूनं ”दलितत्व’ नावाच्या माथी मारलेल्या, जाणूनबुजून गळ्यात अडकवलेल्या ओळखवजा लोढण्याला फेकून देऊन ‘मी कुणाच्या बापाला भीत नाही. मी निरुपाधिक् आहे. मला कुठलंही लेबल नको. मी एकटा दिसत असेन, ते मला लोकांनी एकटं केलंय म्हणून नव्हे.तर मी स्वतःहून हे एकटेपण स्वीकारलंय.
मला माझा सन्मान, आत्मप्रतिष्ठा उसनवारीवर नकोय. भीक म्हणून नकोय. वर उपचारी म्हणून नकोय. मी ती माझ्या कर्तृत्वाच्या, जीवनमूल्यांच्या जोरावर मिळवीन. जगभरात समतेसाठी लढणारा, प्रयत्न करणारा प्रत्येक माणूस सुंदर आहे, तो लढा सुंदर आहे. शोषण करणारी माणसंच नव्हे,तर मी शोषकांचं तत्वज्ञान नाकारतो, त्यांची प्रतीकं नाकारतो. मला त्यांच्या पावतीची गरज नाही.
मी दलित नाही, दलित ही माझी ओळख नाही. मी आंबेडकरी.
माझ्या जगण्याचं तत्त्वज्ञान आंबेडकर. आंबेडकर माझा उजेड. माझा बाप, माझी आई..
असं पापणी न लवता एकसलग बोलणारे यशवंत मनोहर सर!
त्यांच्या चेहऱ्यावर विलसणारं स्मितहास्य, डोळ्यातली निर्भय चमक.
“तुम्हा मुलांवर आता जबाबदारी. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला.
जे नको, ज्याची चर्चा अनावश्यक ते ते पाखडून बाजूला केलं.
दैवी, आध्यात्मिक फोलपाटं फेकून देऊन निव्वळ माणसासारखा माणसांचा विचार करणारा एक माणूस आपल्यात होऊन गेला,हे बाबासाहेबांनी दाखवून दिलं.
तुम्ही मुलांनी बाबासाहेबांना समजून घेणं, पुढच्या पिढीला तो समजून सांगणं,अनावश्यक चर्चांमध्ये वेळ न दवडता पुनर्निर्माण करीत राहाणं गरजेचं आहे.
पण एक गोष्ट आवर्जून करावी. बुद्ध आणि बाबासाहेब कुणावरही लादू नये.तो पटवून द्यावा.
आता वेळच अशी आहे की माणसं स्वतःहून बुद्ध आणि बाबासाहेब शोधत येतील.
नव्हे, येतायंत. माणसाला माणसाशी जोडणाऱ्या विचाराकडे येतायत.
या पृथ्वीवर अंतिम सत्य नावाच्या गोष्टीचा सातत्याने शोध घेणारं घटित म्हणजे माणूस!
तो शोधतोय अनादी काळापासून काहीतरी. म्हणूनच तर स्वातंत्र्य,समता, बंधुत्व आपल्याला हवंय. ते नांदावं, आकाराला यावंसं वाटतं. प्रत्येक प्रमाणिक माणसाची ही इच्छा आहे.माणसालाच कल्पना सुचतात.कल्पना पुढे धावतात शब्द मागे रेंगाळतात.नवनवे शब्द शोधा. असे शब्द जे तुमच्या विचारांतला, शब्दांतला उजेड शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवतील.” असं काय काय नि किती बोलत राहिले सर!
त्या भेटीनं खूप काही दिलं. आतला आवाज आणखी बुलंद झाला.
तर आज हे सगळं आठवण्याचं विशेष कारण असं आहे की..
मधूनच आमचा मित्र Vruttant ने एक प्रश्न विचारला. की सर, तुम्ही सूरज येंगडेला ओळखता का? सर उत्तरले, तोच ना तो ‘दलितहूड’ वाला? आम्ही खळखळून हसलो.
सर म्हणाले, की हा पठ्ठ्या त्यांना मेसेज करुन विचारता झाला,की दलितहूड बद्दल सरांना काय वाटतं?
सर म्हणाले, मी दलितत्व नाकारतो. मी ‘दलित’ हा शब्दच नाकारतो. ही सेलिब्रेट करण्याची गोष्ट नाही!!!!
विषय संपला.
तर या असल्या ‘आयजीच्या जिवावर बाईजी उदार’ या म्हणीला सार्थ ठरवत याचं ऐक, त्याचं वाच, इकडून चोर, तिकडून चोर असले चाळे करणाऱ्या स्वयंघोषित आणि पुरोगामित्वाचं कातडं पांघरलेल्यांच्या स्क्रिप्टेड रिअॅलिटी शो मध्ये ‘दलित’ म्हणून लुटुपुटुची मानाची कट्यार घेऊन या मॅगझिनच्या मुखपृष्ठावर, त्या लिस्टीत झळकबाजी करणाऱ्या या उरबडव्या मोअर स्मार्ट, मोअर इंटेलिजंट ब्यूटिफुल दलित म्हणवून घेणाऱ्या, आयडेंटिटीचं कमॉडिफिकेशन करणाऱ्या भाटांना आता थेट प्रश्न विचारायलाच हवेत.
नेमकं काय सेलिब्रेट करताय तुम्ही????
काय दलित? कोण दलित? कसलं दलितहूड?
हे आंबेडकरी नव्हेत.ब्राह्मणी मीडीयाकडून आपलं कौतुक व्हावं, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ‘दलित’ म्हणून आपल्या दुःखांचा(?) बाजार मांडावा.
त्या बाजारात यांच्यासारख्याच कुणी तरी ह्युमन राईट्सचं “दुकान” चालवणाऱ्यांनी ती विकत घेऊन,
विकून सौदेबाजी करावी, हा नतद्रष्ट खेळ खेळणारे आंबेडकरी नसतात.हे असले कुणाचेही सगे नसतात.
असल्यांची तळी उचलणाऱ्यांची खेळी काय आहे, कशासाठी आहे हे तर स्पष्ट दिसतंय समोर.
आजकालचं नाही हे. विकले जाणारे, विकत घेणारे एकमेकांचे साडभाऊ असतात.
यात कुठलंही रॉकेट सायन्स नाही.Outlook ने प्रसिद्ध केलेल्या ५० प्रभावशाली दलितांची नावं, चेहरे..
यातल्या अनेकांनी हे मारुन मुटकून गळ्यात बांधायचा प्रयत्न केलेलं दलितत्व स्पष्टपणे नकारलंय. तरीही विनापरवाना हे असले उद्योग जाणीवपूर्वक केले जातात.
म्हणूनच आता केवळ शोषीतांबद्दल बोलून उपयोग नाही, तर शोषकांची नावं त्यांच्या जातींसकट पटावर आणली पाहिजेत.
दलित अत्याचार, दलित हत्या असा मथळा जर माध्यमं वापरतात,तर मग शोषण करणाऱ्या,
शोषणाचं समर्थन करणाऱ्या वर्णवर्चस्ववादी,त्रैवर्णिक युतीला कुठलाही आडपडदा न ठेवता समोर आणलं पाहिजे.
Outlook ने जातीय अत्याचारात आघाडीवर असणाऱ्या जातसमूहांची आणि जातीयवादी स्त्री-पुरुषांची,
जातीय अत्याचाराच्या घटनांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करुन,
न्याय आपल्याला हवा तसा विकत घेणार्या नेत्यांची, राजकीय पक्षांची नावं उघडपणे छापावीत.
लेखन – मानसी निर्मळे
अभी कुछ दिनों पहले आदरनिय यशवंत मनोहर सहाब ने सरस्वती की मुर्ती रखे जाने के संदर्भ मे स्पष्ट शब्दों मे अपनी भुमिका रखते हुवे पुरस्कार लेने से मना कर दिया. उतने ही स्पष्ट शब्दों मे आदरनिय कडुबाई खरात ने भी अपनी भुमिका जाहिर की उन्होंने कहा की बाबासाहाब ने हमे १४ अक्तुबर १९५६ मे बुध्द धम्म की दिक्षा दी और हमे बुध्दिष्ट बनाया. आज हम जो भी है बाबासाहाब के वजहों से है. हमारी पहचान बुध्दिष्ट है हमे दलित न बोले. आदरनिय कडुबाई को सन्मान के साथ जयभीम…..
ये आऊटलुक नाम के थर्ड क्लास पञिका वाले होते कोण है हमारे भाईयों बहनों को दलित आयडेंटिटी का तमगा लगाने वाले …. उन्होंने उनके लोगोंने देश को लुटकर भाग गये, बलात्कार किये, अत्याचार किये, मंदिरों के नाम से पैसा बटोरा, समाजकारण किया, राजकारण किया और फिर उसको फलाने फलाने तमगे लगाकर पचास पचास लोगोंकी लिस्ट जारी करे हमे कोई दिक्कत नही है.
बाबासाहाब ने हमे हमारा सन्मान बहाल किया है. हमारे लोग हमारे लिए उतने ही सन्माननिय है आपके तमगो की ऊन्हें जरुरत नही… जिनको तमगो की जरुरत है वो हरिजन या दलित बनकर जाये हमे दिक्कत नही …
जयभीम
लेखन – डाॅ. संजय खोब्रागडे
ईथल्या व्यवस्थेला आम्ही दलित असणं धोकेदायक नाही तर आम्ही आंबेडकरवादी असणं जास्त धोकेदायक आहे.पण “आऊटलुक” लाही
लेखन – सत्यभामा सौंदरमल
दलित हा घटनाबाह्य शब्द वापरून आऊटलुकने दाखवून दिलेय की जातीवर्चस्वाचा किडा यांच्या मध्ये अजून आहेच. दलीत ही आमची ओळख नाही, आम्ही कधीही स्वतःला दलीत समजत नाही तर आम्हाला दलीत ओळख देण्याचा अट्टाहास का?
तुम्ही लोक कितीही शिकलात, मेट्रो सिटीत राहिलात. लॅव्हिश आॅफिसमध्ये काम केलेत आणि सुटाबुटात जरी राहिलात तरीही असे दलित बोलून, आम्हाला हिणवून तुमच्या सुटाबुटातुन जातीयतेचे जाणवे स्पष्ट दिसते. दलित ओळख असणे ही तुम्ही लोकांनी दिलेली तुमच्या मनातील घाण आहे. मो.क.गांधीने जशी हरिजन म्हणून आमचा अपमान केला होता तसेच दलित म्हणून तुम्ही लोक करत आहात. तुम्ही जातीने नाही तर कर्माने आणि मनाने दलित आहात हे सिद्ध केले आहे.आयडेंटिटी देण्याचे, मान्यता देण्याचे हक्क आणि अधिकार जोवर आपल्याकडे आपण खेचून घेत नाही तोवर ब्राम्हणी व्यवस्था आणी त्या व्यवस्थेचे गुलाम आपल्याला दलित ठरवतील. तुमची ओळख काय हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला स्वतःला हवा. तुम्हाला तुमची ओळख देण्याचा प्रश्न आजचा नाही. दलित राजकारणी, दलित नेते, दलित लेखक, दलित सामाजिक कार्यकर्ते, दलित साहित्यिक, दलित कवी अशी लेबले चिकटवली जात होती तेव्हाच या तथाकथित दलित लोकांनी ही आयडेंटिटी नाकारायला हवी होती पण दुर्दैवाने तसे झाले नाही. आयडेंटिटी देणारे लोक आपल्या स्वजातीय बांधवांची आयडेंटिटी आपल्या जात धर्माचा उध्दारक, प्रचारक अशी कधीच करुन देत नाहीत. त्यांच्यासाठी सर्वसमावेशक लेबले लावली जातात. आद्य क्रांतिवीर, क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर, God of cricket, महानायक अशी लेबले चिकटवली जातात.ब्राम्हण समाजातील आद्य क्रांतिवीर, ब्राम्हण समाजातील क्रांतिकारक, ब्राम्हण समाजातील स्वातंत्र्यवीर, ब्राम्हण समाजातील God of cricket किंवा ब्राम्हण समाजातील महानायक असे संबोधण्यात येत नाही. याचे कारण म्हणजे त्यांना त्यांची ओळख एका जातीपुरती मर्यादित करायची नसते. सर्वजातीय लोकांनी त्यांना त्याच लेबलांसहीत स्वीकारावे अशी सोय करण्यात आलेली असते.
बाकी इतर समाजातील लोकांना त्यांच्या जातीतच बंदिस्त केले जाते. त्याचे ठळक उदाहरण म्हणजे आऊटलुकची टॉप ५० दलित लिस्ट. यातून जे टॉप ५० आहेत त्यांचा काहीच फायदा होणार तर नाही पण नुकसानच जास्त आहे. या टॉप ५० लोकांचा गौरव करुन जात बंदिस्त केले आहे. हा भटी डाव आहे. एखाद्या व्यक्तीचे मूल्यांकन शून्य करायचे असेल तर त्याला दुर्लक्षित करा, तो दुर्लक्षित होत नसेल तर आरोप करुन बदनाम करा, आरोप करुनही बदनाम होत नसेल तर त्याला जात बंदिस्त करा हा फंडा वेळोवेळी वापरला जातो. हाच फंडा आऊटलुकने टॉप ५० दलित यात वापरला आहे.
मेनस्ट्रीम मिडीया आपली कधीच नव्हती आणि यापुढेही असणार नाही. मेनस्ट्रीम मिडीयाद्वारे मिळालेली बिरुदावली काटेरी मुकुट आहे. ज्याला समजले तो असला मुकुट कधी घालणार नाही, त्याला लाथ मारेल. ज्यांना हे समजणार नाही त्यांच्या डोक्यावर हा मुकुट म्हणजे केवळ आणि केवळ रक्तबंबाळ करण्यासाठी योजलेला फार्स आहे. यातून थोडेसे जरी शिकले तरी पुरेसे आहे. काल ज्या लोकांनी अशी आयडेंटिटी नाकारली त्या दिशाताई, राहुलदा चे अभिनंदन.
लेखन – सतीश भारतवासी
सिद्धार्थ गौतम यशोधरेला सोडून गेला होता का ?
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published By Team Jaaglya Bharat on APRIL 18, 2021 11: 53 AM
WebTitle – The Young Ambedkarites put a strong opinion on the term Dalit In 2021 2021-04-18