दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित चित्रपट झुंड (Jhund) याने चित्रपट गृहात प्रेक्षकांची मने जिंकली,अनेक मोठ्या चित्रपट कलाकारांनी सुद्धा झुंडचं कौतुक केलं होतं. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची यात प्रमुख भूमिका आहे. अनेकांना चित्रपटगृहात काही कारणाने हा चित्रपट पाहायला जाणे शक्य झाले नाही,असे अनेक प्रेक्षक झुंड चित्रपट (OTT) ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्याची प्रतिक्षा करत होते. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हा चित्रपट आता OTT वर उद्या म्हणजेच ६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
झुंड OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर होणार प्रदर्शित
झुंड चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.त्याच्या निर्मात्यांवर कॉपीराइटचा आरोप करण्यात आला होता,संबंधित खटला तेलंगणा उच्च न्यायालयात सुरू होता.तेलंगणा उच्च न्यायालयाने चित्रपट OTT वर प्रदर्शित करण्यास बंदी घातली होती.या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या निर्मात्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. त्यावर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत चित्रपटाच्या ओटीटी रिलीजचे आदेश जारी केले,यामुळे आता हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झाला आहे.अमिताभ बच्चन यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
झुंड चित्रपट कलाकार
झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan as Vijay Barse) , आकाश ठोसर (Akash Thosar as Sambhya), रिंकू राजगुरू (Rinku Rajguru), विकी कदीयन (Vicky Kadian as Abhijeet Barse, Vijay’s son) आणि गणेश देशमुख (Ganesh Deshmukh) Kishor Kadam यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सत्य घटनेवर आधारित आहे हा चित्रपट
या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे.झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून जातं.असे या चित्रपटाचे कथानक आहे.हा चित्रपट सत्यकथेवर आधारित असून नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी सुमारे दोन वर्ष वेळ घेतला. अमिताभ बच्चन यांना नजरेसमोर ठेवूनच नागराज यांनी ही स्क्रीप्ट लिहिली असल्याचे समजते.ज्या विजय बारसेंवर झुंड हा सिनेमा आधारित आहे, त्यांनी अनेक मुलांचं आयुष्य बदलून टाकलं आहे. विजय बारसे एका कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक होते. निवृत्तीनंतर त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण दिलं.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
जय भीम चित्रपट : अभिनेता आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करा
संभाजी भिडे यांचे नाव भीमा कोरेगाव खटल्यातून वगळण्यात आले
पायरेटस् ऑफ कॅरेबीयन कॅप्टन जॅक स्पॅरो पत्नीचा मार खाऊनही…
संभाजी भिडे सायकल वरून पडल्याने गंभीर जखमी; उपचार सुरू
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 05, 2022 18:00 PM
WebTitle – The wait is over The Jhund movie will be Released on OTT Platform