जम्मू : मुझफ्फरनगरमधील एका खासगी शाळेत मुलाला मारहाणीचे प्रकरण अद्याप सुटले नव्हते तोच जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील एका सरकारी उच्च माध्यमिक शाळेतून एक नवीन प्रकरण समोर आले आहे. विद्यार्थ्याने फळ्यावर ‘जय श्री राम’ लिहिल्याबद्दल दहावीच्या विद्यार्थ्याला शारीरिक शिक्षेसाठी कठुआ जिल्ह्यातील बानी भागात मुख्याध्यापक आणि शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी घडली असून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्याला अशा प्रकारे मारहाण करण्यात आली की, त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, पोलिसांनी आरोपी शाळेतील शिक्षकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापकावर अल्पवयीन विद्यार्थ्यावर हल्ला केल्याचा आरोप असून तो फरार आहे. पीडित विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
घटनेचे वृत्त पसरताच आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शहरात निदर्शने करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद हाफिज आणि लेक्चरर फारुख अहमद अशी आरोपींची नावे आहेत.
दोघांवर आयपीसी कलम 323 (जाणीवपूर्वक दुखापत करणे), 342 (चुकीच्या पद्धतीने कैद करणे), 504 (हेतूपूर्वक अपमान करणे) आणि 506 (गुन्हेगारी धमकावणे) आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्याचे कलम 75 (मुलांच्या प्रती क्रूरता) चे आरोप ठेवण्यात आले आहेत.
घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती
कठुआचे उपायुक्त राकेश मिन्हास यांनी या घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, 25 ऑगस्ट रोजी कुलदीप सिंह यांनी तक्रार दाखल केली की,
त्यांच्या मुलाला शाळेचे शिक्षक फारुख अहमद आणि शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद हाफीज यांनी मारहाण केली.
बाल न्याय कायद्याच्या संबंधित कलमांखाली बानी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आणि स्थानिक एसएचओच्या नेतृत्वाखालील पथकाने शाळेच्या आवारात भेट दिली आणि शिक्षकाला अटक केली.
एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, विद्यार्थ्याने बोर्डवर जय श्री राम लिहिले होते. फारुखने वर्गात येऊन हा प्रकार पाहिल्यानंतर इतर विद्यार्थ्यांसमोर मुलाला वर्गाबाहेर नेले आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर या विद्यार्थ्याला मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये नेण्यात आले तिथं दोघांनी कुलूप लावून आतमध्ये या विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप असून जर त्याने पुन्हा असं केलं तर ते त्याला ठार मारतील,असाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीमुळे मुलाला गंभीर दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.
कबुतर चोरी चा आरोप हरेगाव दलित तरुणांना उलटे बांधून बेदाम मारहाण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 27,2023 | 17:38 PM
WebTitle – The student wrote ‘Jai Shri Ram’ on the board, the teacher beat him