श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी – आपल्यापैकी जे लोक शाळेत राष्ट्रीय प्रतिज्ञा वाचत मोठे झाले आहेत,त्यांच्यासाठी हे थोडेसे विचित्र आहे की कोणीही कॅरिबियन देशाचा नागरिक इतक्या सहजपणे कसा होऊ शकतो.
इंडियन एक्स्प्रेस ने आरटीआयद्वारे माहिती गोळा केली त्यात उघड झालंय की 2011 ते 2022 दरम्यान सुमारे 70,000 भारतीयांनी त्यांचे पासपोर्ट आत्मसमर्पण केले. तथापि, परराष्ट्र व्यवहार मंत्री व्ही मुरलीधरन यांनी संसदेत सांगितले की, परदेशी भूमीवरील भारतीय दूतावासात सोडलेल्या नागरिकांची संख्या जास्त आहे.
नागरिकत्व हा भावनिक मुद्दा आहे ही जुनी संकल्पना
उदारीकरणापूर्वी अशा लोकांना परदेशात स्थायिक होणे ही भारताची उपलब्धी मानली जात होती.
परंतु, आज परदेशात स्थायिक होण्यास इच्छुक असलेल्या भारतीयांची त्यांच्या पूर्वसुरींशी तुलना होऊ शकत नाही.
आजची कारणं वेगळी आहेत.स्थलांतर आता दुर्मिळ एक टक्के लोक करत आहेत, जे सुशिक्षित आणि हुशार आहेत.
मॉन्टे कार्लो (युरोप) मध्ये स्वत:चं घर घेऊन राहणाऱ्या दिल्लीच्या व्यक्तीला आता दिल्ली आवडत नाही असं चर्चेत आढळून येतं.
कदाचित नागरिकत्व हा भावनिक मुद्दा आहे ही जुनी संकल्पना आहे.आणि सीमा आणि राष्ट्रे सीमारहित असावीत.
या संकल्पनेअंतर्गत राष्ट्र ही काल्पनिक संस्था मानली जाते.
हे पृथ्वीला अवकाशातील अनेक ग्रहांपैकी एक ग्रह म्हणून पाहण्यासारखं आहे.
साधनसंपन्न व्यक्तीला कदाचित असंच वाटू शकतं,जेव्हा तुमच्याकडे पृथ्वीवर फिरण्यासाठी पुरेसे पैसे असतात
तेव्हा मानवनिर्मित सीमा अनावश्यकपणे प्रतिबंधित वाटू शकतात.
आपल्यापैकी जे लोक शाळेत राष्ट्रीय प्रतिज्ञा वाचत मोठे झाले आहेत, त्यांच्यासाठी हे थोडं विचित्र आहे की एखाद्या कॅरिबियन देशासारखा ज्याच्या आपल्या भूतकाळाशी किंवा भविष्याशी काहीही संबंध नसलेल्या अशा एका कॅरिबियन देशाचा नागरिक आपण कसं काय होऊ शकतो? पण त्यातच हे सौंदर्य देखील आहे की, अनेक भारतीय आत्मविश्वासाने हे सिद्ध करून दाखवत आहेत की, जग त्यांच्या कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्यता संधी देते.
आज सायप्रस आणि माल्टा सारखे देश उघडपणे त्यांच्या देशाचं नागरिकत्व विकत आहेत. काही निवडक लोकांसाठी, जग अक्षरशः त्यांच्या मुठीत सामावल्या सारखं आहे. अशा श्रीमंतांच्या डिनर पार्टीची चर्चा अँटिग्वा विरुद्ध पोर्तुगालच्या अवतीभवती फिरत असते. तर दुसरीकडे देशभक्तीचं ओझं मागे राहिलं जे की आता इथल्या गरीब वंचित आणि मध्यमवर्गीय लोक आपल्या मानेवर वाहून नेत आहेत.
या बदलाची झलक चित्रपटांतूनही पाहायला मिळते.
भारतीयांच्या सामूहिक कल्पनेत, राष्ट्रीय अस्मिता नेहमीच इतिहासाच्या कालखंडाशी जोडलेली असते, ज्याचे हिंदी चित्रपटात अचूकपणे चित्रण केले जाते. 1970 च्या दशकातील हिट चित्रपट पूरब और पश्चिममध्ये, पश्चिमेतील जीवन समृद्धी असूनही निराशाजनकपणे वरवरचे चित्रित केले आहे, तर 90 च्या दशकातील नॉस्टॅल्जिक अनिवासी भारतीयांनी पडद्यावर “आय लव्ह माय इंडिया” सारखी गाणी गायली होती.तसं हे देशप्रेम तेवढ्यापुरतंच उचंबळून येत असतं. भरती ओहोटी प्रमाणे,जेव्हा देशाची गोष्ट असते तेव्हा हे प्रेम आटून जातं अन विदेशाची निवड केली जाते.
कारण जन्म एकदाच मिळतो,अन त्यात आपण आपल्या मनाप्रमाणे स्वतंत्र अन बंधनमुक्त जगावं स्वच्छ निरोगी तणावमुक्त वातावरण असावं,अशा अपेक्षा बाळगण्याचा खरतर प्रत्येकाला अधिकार आहेच,तोच अधिकार बजावत अनेक नागरिक विदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतात.अशा नागरिकांची संख्या देखील अलिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढायला लागली आहे.
12 वर्षांत 16 लाख नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडून दिले
12 वर्षांत 16 लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं असल्याची ही आकडेवारी भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनीच दिलीय.अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केंद्र सरकारने राज्यसभेत ही मोठी माहिती दिली. गेल्या 12 वर्षांत 16 लाखांहून अधिक भारतीयांनी आपले भारतीय नागरिकत्व सोडून अन्य देशाचे नागरिकत्व घेतले असल्याचे सांगण्यात आले. प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ही माहिती दिली. जयशंकर म्हणाले की 2011 पासून आतापर्यंत 16 लाखांहून अधिक भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले आहे. यापैकी दोन लाखांहून अधिक (2,25,620) लोकांनी गेल्या वर्षी नागरिकत्व सोडलं आहे.
2022 मध्ये अशा 2,25,620 लोकांनी नागरिकत्व सोडलं
परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितल्या प्रमाणे, 2015 मध्ये 1,31,489 लोकांनी, 2016 मध्ये 1,41,603 आणि 2017 मध्ये 1,33,049 लोकांनी भारताचं नागरिकत्वं सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्वं स्वीकारलं. पुढे 2018 मध्ये ही संख्या 1,34,561 इतकी होती, 2019 मध्ये ती 1,44,017 एवढी झाली. तर, 2020 मध्ये, नागरिकत्व सोडणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाल्याचे अन ही संख्या 85,256 झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर 2021 मध्ये पुन्हा संख्या वाढली आणि 1,63,370 इतकी झाली.मागीलवर्षी 2022 मध्ये अशा 2,25,620 लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडल्याचं सांगण्यात आलं.
सामान्यतः असं मानलं जातं की लोक इतर देशांमध्ये स्थलांतर करतात
किंवा उत्तम रोजगार आणि राहणीमानासाठी तेथील नागरिकत्व घेतात.
ग्लोबल वेल्थ मायग्रेशन रिव्ह्यू, 2020 नुसार, लोक चांगल्या जीवनशैलीसाठी नवीन नागरिकत्व घेतात.
यासोबतच गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने किंवा देशात व्यवसायाच्या संधी नसल्यामुळेही लोक असे करतात.
हेही वाचा…हार्वर्ड युनिव्हर्सिटी जातीय अत्याचार विरोधी संरक्षण कायदा संमत
भारतातील एकल नागरिकत्वाची पद्धत
भारतीय राज्यघटनेनुसार आपल्याकडे एकल नागरिकत्वाची व्यवस्था आहे.
याचा अर्थ भारतीय नागरिक एका वेळी एकाच देशाचा नागरिक असू शकतो.
याचा अर्थ जर व्यक्तीने इतर कोणत्याही देशाचं नागरिकत्व घेतलं असेल तर त्याचं भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येतं.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 13,2023 | 19:06 PM
WebTitle – the story of those who gave up Indian citizenship