नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) स्पष्टपणे सांगते की आर्यन खान सोबतच्या या फोटोतील व्यक्ती एनसीबीचा अधिकारी किंवा कर्मचारी नाही, असं ट्वीट एएनआयने केलं आहे.आर्यन खान याला पकडून घेऊन जाणाऱ्या एनसीबी अधिकाऱ्याचा आर्यनसोबतचा एक सेल्फी प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर एनसीबीनं अधिकृतरित्या प्रतिक्रिया देत संबंधित व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याचं म्हटलं होतं. याच मुद्द्यावरुन नवाब मलिक यांनी आर्यन खान ला पकडून एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जातानाच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची कुंडलीच सादर केली आहे. नवाब मलिकांनी आज मुंबईत याप्रकरणी एक पत्रकार परिषद घेतली. मलिक यांनी काही व्हिडिओ आणि फोटो सादर करत आर्यन खानला पकडून घेऊन जाणारा व्यक्ती नेमका कोण आहे याची माहिती दिली.
आर्यन खान ला घेऊन जाणारा खासगी गुप्तहेर आणि भाजपाच कार्यकर्ता?
आर्यन खान याला अटक केल्यानंतर एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जातानाचा एक व्हिडिओ एएनआयनं जारी केला होता. यात जो व्यक्ती आर्यन खान याला पकडून घेऊन जाताना दिसतोय या व्यक्तीचं नाव किरण गोसावी असल्याचा खुलासा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
किरण गोसावी कोण आहे?
आर्यन खान सोबतची सेल्फी व्हायरल झालेले कथित एनसीबी अधिकारी किरण गोसावी हे देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के.पी.जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी यांची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद झाला असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला आहे. के. पी. गोसावी यांच्याविरोधात 2018 मध्ये पुण्यातील तरुणाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मलेशियात नोकरीचं आमिष दाखवून 3 लाख उकळल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला होता, अशीही माहिती आता समोर येताना दिसत आहे.
भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप
किरण गोसावी याचे काही फोटो नवाब मलिक यांनी यावेळी पत्रकार परिषदेत जारी केले.यात किरण गोसावीच्या हातात पिस्तुल घेतलेले आणि मोबाइलवर बोलतानाचे फोटो दाखवण्यात आले आहेत. तसंच त्याचं फेसबुक अकाऊंटही मलिकांनी दाखवलं. यात केपी गोसावी असं नाव फेसबुक अकाऊंटवर आहे. खासगी गुप्तहेर असल्याचं गोसावीनं फेसबुकवर म्हटलं आहे. तर तो भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
दुसरी व्यक्ति मनीष भानुशाली भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष
दुसऱ्या घटनेत ड्रग्ज प्रकरणी अरबाज सेठ मर्चंट ला मनिष भानुशाली हा व्यक्ती घेऊन जाताना दिसत आहे. त्याच्या प्रोफाईलवर भाजपचा उपाध्यक्ष असा उल्लेख आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देवेंद्र फडणवीस आशीष शेलार भाजपा अध्यक्ष नड्डा या भाजप नेत्यांबरोबर फोटो आहेत. एनसीबीने सांगावं त्यांचा आणि मनिष भानुशालीचा संबंध काय?” असंही नवाब मलिक म्हणाले.
भाजपकडून बॉलिवूड-राज्य सरकारची बदनामी
भाजप बॉलिवूड, राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.
21 तारखेला मनिष भानुशाली दिल्लीत काही मंत्र्यांच्या घरी होता. त्यानंतर 22 तारखेला गांधीनगर भागात होता,
21,22 तारीख महत्त्वाची आहे.21-22 तारखेलाच गुजरातमध्ये ड्रग्ज मोठ्या प्रमाणात सापडलं.
त्यामुळे 28 तारखेपर्यंत तो गुजरातमध्ये काय करत होता, कुठल्या मंत्र्यांना भेटला, याचं उत्तर एनसीबीनं द्यावे,
अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.नंतर तो मुंबईत येतो,
परत गुजरातला जातो आणि मग मुंबईत छापा पडतो.असेही नवाब मलिक यांनी म्हटलंय.
पत्रकार परिषदेतील या आरोपांमुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले असून उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
शाळा हे मुलांसाठी ‘आनंदस्थळ’ व्हावे
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 06, 2021 17 :00 PM
WebTitle – The spy who took Aryan Khan is a BJP worker?