ब्राझील च्या अॅमेझॉन च्या जंगलात राहणाऱ्या आदिवासी समुदायातील शेवटचा व्यक्ती (man of hole) काल मरण पावल्याची बातमी आली. त्याच्या समुदायातील तो एकमेव जिवंत होता,त्याच्या निधनानंतर आणखी एक आदिवासी समाज, भाषा आणि त्यांची संस्कृतीही जगातून कायमची संपुष्टात आली.त्याच्याशी संपर्क झाला असता तर त्यांच्या समाजाविषयी माहिती समजली असती,ते आपल्या जगाकडे कसं बघतात? खरंच त्यांना आपलं एक जग आहे हे माहित आहे का? हे समजलं असतं पण आपण त्यांचे अस्तित्व पुसून टाकण्याकडेच जास्त झुकलो आहोत.या वृत्तामुळे जगभरातील मानववंशशास्त्रज्ञ आणि मुलनिवासी समुदायांवर (Indigenous people) काम करणाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
आपल्या सभ्य नागरी समाजाकडून त्याच्या अस्तित्वाला धोका होता
अॅमेझॉनच्या जंगलात राहणाऱ्या या माणसाचं नाव इंडीओ डो बुराको (indio do Buraco) किंवा खड्ड्यात राहणारा मुलनिवासी माणूस (the indigineous man of hole) म्हणून ओळखलं जात होतं.अर्थात हे आपण नागरी माणसांनी आपल्या सोयीसाठी त्याला दिलेलं नाव होतं,त्याला याची कल्पनाही नसेल.
हे नाव देण्याचं कारण असं की त्याचा बराचसा वेळ स्वतःला लपवून ठेवण्यासाठी खड्डे खणण्यातच गेला.
आपल्या सभ्य नागरी समाजाकडून त्याच्या अस्तित्वाला धोका होता. जो तो गेल्यावर आता संपुष्टात आला.
शेवटी तो एकटाच उरला होता
बाहेरच्या जगातून आलेल्या लोकांनी त्याच्या समुदायावर अनेक दशके हल्ले केले.
या हल्ल्यांमध्ये हळुहळु त्यांचा संपूर्ण समाजच नष्ट होत गेला.
मात्र तो स्वत:ला वाचवण्यात यशस्वी झाला होता,शेवटी तो (the man of hole) एकटाच उरला होता.
त्याने कोणालाही त्याच्या संपर्कात येऊ दिले नाही.त्याच्याजवळ जाण्याचा कुणी प्रयत्न केल्यास तो त्याच्यावर बाणांनी हल्ला करायचा. या पार्श्वभूमीवर मूळ निवासींसाठी काम करणाऱ्या संस्थेने म्हटलंय ,”ज्या निर्दयीपणाने त्याचे कुटुंब, मित्र आणि संपूर्ण समुदायच उद्ध्वस्त करत नष्ट करण्यात आले.त्याच्या जमिनीवर सतत हल्ले होत असल्याने त्याच्यासाठी स्वतःचे संरक्षण करण्याचा एकमेव मार्ग उरला होता,तो म्हणजे बाहेरील जगाच्या संपर्कापासून स्वत:ला दूर ठेवणे.”
या संघटनेच्या निवेदनात पुढे म्हटलं आहे की, “अशा प्रकारे आणखी एका आदिवासी समाजाचं अस्तित्व संपुष्टात आलं आहे.
काही जण म्हणतील की हा समाज काळाच्या ओघात नामशेष झाला.
पण हे सत्य नाही. वस्तुस्थिती अशी आहे की बाहेरच्या लोकांचे हल्ले आणि अत्याचार यामुळे या समाजाचे अस्तित्वच पुसले गेले आहे.
“त्याच्या आयुष्यात त्याने काय भयावह क्रूरता पाहिली असेल आणि त्याच्या टोळीतील इतर लोक मारले गेल्यानंतर त्याच्या अस्तित्वात आलेल्या एकाकीपणाची आपण फक्त कल्पना करू शकतो, परंतु त्याने दृढनिश्चयपूर्वक स्वत:ला दूर ठेवत संपर्काच्या सर्व प्रयत्नांचा प्रतिकार केला आणि स्पष्ट केले की त्याला फक्त एकटं राहायचं आहे,” असं संघटनेच्या फियोना वॉटसन म्हणाल्या
अॅमेझॉनच्या घनदाट जंगलांबद्दल, असे मानले जाते की तेथे किमान 30 आदिवासी समुदाय आहेत ज्यांच्याबद्दल जगाला अद्याप काहीही माहिती नाही.
भारतातही असे समाज आहेत
भारताचा भाग असलेल्या अंदमान निकोबार बेटांपैकी आणखी एक (Sentinel Island) सेंटीनेल बेट नावाचं बेट आहे. अंदमान निकोबार पासून ते फक्त 50 किलोमीटर दूर आहे.तिथल्या सेंटिनेल आदिवासींनी जॉन ऍलन चाऊ या अमेरिकन मिशनरीची हत्या केल्याची बातमी पसरताच जगभरात विविधप्रकरच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या,त्यावेळी हा आदिवासी समुदाय चर्चेत आला होता.हा मिशनरी अवैध मार्गाने या बेटावर पोहोचला होता. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या बेटावरील आदिवासींनी या मिशनरीला भेटण्यात रस दाखवला नव्हता,मग कशाला त्यांच्या आयुष्यात दखल द्यायची? आणि त्यांचे अस्तित्व धोक्यात आणायचे?
अशा पद्धतीने आपण जगातील आपल्याच सारखे इतर समुदाय नष्ट करत त्यांचे अस्तित्व मिटवत चाललो आहोत,ही मानवी सभ्य समाजासाठी चिंतेची बाब असली पाहिजे.जेव्हा आपण इतर जात धर्माच्या लोकांचा द्वेष करतो,त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो.त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उपाय योजनांना नाके मुरडतो तेव्हा आपण सभ्य नागरी समाज म्हणून उरतो का ? हा प्रश्न आपण स्वत:ला विचारला पाहिजे.
Sentinel Island उत्तर सेंटिनेल बेट आजही जगासाठी एक रहस्य
धुळे येथे बौद्ध समाजावर मनुवाद्यांनी टाकला बहिष्कार,पाणी,दूध,किराणा,बंद
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 30,2022, 08:28 AM
WebTitle – The Man of the Hole Another tribal society was completely erased from the world