या जगात अमर कुणीच नाही,मात्र कुणालाही खूप वर्षे जगावं असं वाटत असतं,आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वाढदिवशी आपण त्यांना अशाच शुभेच्छा देतो,तुम जियो हजारो साल,परंतु माणसाचं सरासरी वयोमान शंभर मानलं गेलं आहे.अलीकडे तेही कमी झालेलं आहे.मात्र जगात काही आश्चर्य घडत असतात,काही व्यक्ती अकाली येणाऱ्या मृत्यूलाही चकवा देतात वयाची शंभरी पार करतात.तर काही आणखी काही वर्षे जगतात.अशा व्यक्तींविषयी सर्वांना कुतूहल असते.अशा व्यक्तींची नोंद घेतली जाते,गिनीज बुक मध्ये सुद्धा अशी नोंद ठेवली जाते. जगातील सर्वात वृद्ध लोकांची यादी बनवली जाते,परंतु या यादीत भारतातील एकही व्यक्ती नाही असे आम्हाला आढळून आले आहे. मात्र दुसऱ्या एका यादीत भारतातील एक व्यक्ती आहेत.जिचं वय १११ होतं.मात्र आता ते हयात नाहीत.
जगातील सर्वात वृद्ध लोकांची यादी
पहिल्या 114 पेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वात वयोवृद्ध लोकांच्या यादीत भारतातील एकही व्यक्ती नाही.मात्र दुसऱ्या यादीत एक व्यक्ती आहे.जिचं वय 111 होतं.2015 पूर्वी मरण पावलेल्या ज्ञात आणि प्रमाणित सुपरसेन्टेनेरियन्सचा समावेश असलेली यादी जेरोन्टोलॉजी रिसर्च ग्रुप (GRG) द्वारे संकलित केली गेली होती. नंतरच्या प्रकरणांचा समावेश अलीकडील GRG डेटामध्ये केला जातो, प्रशासकीय अहवालांसह किंवा पुरवणी स्रोत म्हणून प्रेस कव्हरेज, टेबलमध्ये दर्शविल्याप्रमाणे.
या सर्व यादीत हिरव्या रंगात असणारी नावं ही अजूनही जीवंत आहेत असं दर्शवितात.
पहिल्या 114 पेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वात वयोवृद्ध लोकांची यादी आपण पाहिली.
त्यानंतर सरासरी 113 पर्यंत वय असणाऱ्या लोकांची एक यादी आहे.या यादीमध्ये भारतातील एक व्यक्ती आहेत.जिचं वय 111 होतं.
2015 पूर्वी मरण पावलेल्या सर्व ज्ञात आणि प्रमाणित सुपरसेन्टेनेरियन्सचा समावेश असलेली ही यादी
जेरोन्टोलॉजी रिसर्च ग्रुप (GRG) द्वारे संकलित करण्यात आली होती.
नंतरची प्रकरणे ही एकतर अलीकडील GRG डेटा, प्रशासकीय अहवाल किंवा प्रेस कव्हरेजमधून प्राप्त केली जातात.
GRG सारख्या वय पडताळणीत तज्ञ असलेल्या संस्थेद्वारे 2017 मधील सर्वात अलीकडील प्रकरणांची पडताळणी केली गेली नाही,
कारण तेव्हापासून ते केवळ 113+ वयाच्या व्यक्तींच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करत आहेत.
जगातील सर्वात वयोवृद्ध ११९ वर्षांच्या आज्जी अजूनही जिवंत
आमच्या माहितीनुसार जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती या फिलीपिन्स प्रांतातील कबनकलन सिटी पेजच्या दाव्यानुसार 124 वर्षाच्या लोला फ्रान्सिस्का सुसानो (Lola Francisca Susano) होत्या.ज्यांचे मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये निधन झालं.
124 वर्षांची जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून त्यांची अधिकृत नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे प्रमाणित असल्याचा दावा या पेजच्या बातमीत केला आहे.दुसरीकडे
दुसरीकडे,CNN वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती केन तनाका ((Kane Tananka) ) ज्या 119 वर्षांच्या आहेत, या आज्जीच्या नातवाने 1 जानेवारी रोजी तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ट्विटर पोस्टमध्ये कॅप्शन देत म्हंटल की “उत्कृष्ट यश. [केन तनाका] वयाची 119 वर्षे पूर्ण करत आहे, मला आशा आहे की तुम्ही आनंदाने आणि पूर्ण आयुष्य जगत राहाल,” त्या आजही जिवंत असल्याचे कळते.
वरील यादीत केन तनाका (Kane Tananka) याना तिसरे स्थान मिळाले आहे.
यादीनुसार शिवकुमार स्वामी हे भारतातील सर्वात वयोवृद्ध
शिवकुमार स्वामी (जन्म शिवन्ना; 1 एप्रिल 1907 – 21 जानेवारी 2019) हे एक भारतीय मानवतावादी, आध्यात्मिक गुरु आणि शिक्षक होते. ते वीरशैव लिंगायत धार्मिक व्यक्तिमत्त्व होते, 1930 मध्ये शिवकुमार कर्नाटकातील सिद्धगंगा मठात सामील झाले आणि 1941 पासून मुख्य मठपती झाले. त्यांनी श्री सिद्धगंगा एज्युकेशन सोसायटीचीही स्थापना केली. लिंगायतवादाचे (वीरशैववाद) सर्वात आदरणीय अनुयायी म्हणून त्यांचे वर्णन केले जाते.21 जानेवारी 2019 रोजी त्यांचं (वय 111 वर्षे, 295 दिवस) तुमकूर, कर्नाटक, भारत येथे निधन झालं.
विशेष बाब म्हणजे 2015 मध्ये, त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण, भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
जगातील सर्वात वयोवृद्ध भारतात
अलिकडेच 125 वय असणाऱ्या स्वामी शिवानंद यांच्याबद्दल एक बातमी आल्याने सोशल मीडियात चर्चा सुरु झाली आहे.स्वामी शिवानंद यांनी पद्म पुरस्कार स्वीकारतेवेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पाया पडतानाचे फोटो/व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
योगा क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.त्यांचं वय पाहता त्यांनाही वरील यादीत स्थान मिळायला हवं. जेरोन्टोलॉजी रिसर्च ग्रुप (GRG) ने भारताशी संपर्क साधून स्वामी शिवानंद यांच्याबद्दलच्या प्रशासकीय अहवालांसह योग्य ती कागदपत्रे आणि वयाचे वैज्ञानिक पुरावे पडताळून त्यांना यादीत स्थान देऊन त्यांचा सन्मान करणे उचित ठरेल.
यामुळे भारतातील नव्हे तर जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ही भारतात असून ती अजूनही निरोगी सुधृढ असल्याचे आढळून आल्याने ही आपल्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे.त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स ने सुद्धा घेतली पाहिजे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
काश्मीर फाईल्स:तेव्हा कुणीही अश्रू देखील ढाळले नाहीत-उद्धव ठाकरे
व्यवस्थेचे बळी : उद्या कदाचित तुम्ही सुद्धा…..
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दर्जाचे दिग्गज खेळाडू
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 22, 2022 22 : 20 PM
WebTitle – the list of the oldest people in the world There is not a single person in India