हॉटस्टार वरती पाहिलेली एक डॉकमेण्टरी ( The Inventor: Out for Blood in Silicon Valley ) मनापासून आवडली. हि गोष्ट आहे एलिझाबेथ होम्सची जी एका ध्येयाने पछाडली आहे, तिला रक्तावरती होणाऱ्या २०० चाचण्या ह्या एका २ by २ च्या बॉक्समध्ये करणारी मशीन बनवायची आहे आणि हे सगळं घडत आहे सिलिकॉन व्हालीमध्ये.
The Inventor: Out for Blood in Silicon Valley कथानक
हे स्वप्न काही साधं सोप्प नव्हतं, तीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिची वेगळी इमेज बनवणं भाग होत त्यासाठी तिने त्या मार्केटिंग कम्पनीला काम दिल जिने अँपल चे काम केले होते. यातून उभारली एक नवीन एलिझाबेथ जी एकच कपडे रोज घालते ज्यातून तिचा वेळ वाचतो, जी बोलताना पापणी हि हलवत नाही आणि अश्या एक ना अनेक गोष्टीच्या मदतीने तिला नवीन पिढीची स्टिव्ह बनवण्यात आलं. यातून तिने सोबत काम करणाऱ्याच्या मनात एक वेगळं वलय बनवून आपलं स्वप्न कस महान आहे हे दाखवलं.
परंतु ह्या प्रोजेक्टसाठी एलिझाबेथला फक्त टीम नाही तर हवे होते मोक्कार पैसे त्यासाठी तिने वेगवेगळ्या इन्वेस्टरवला तिच्या त्या बॉक्स मध्ये २०० चाचण्या करून हि दाखवल्या आणि सुरु झाला एक खेळ. तिने ह्या चाचण्या इन्वेस्टरला करून दाखवत ९०० करोड रुपये उभे केले या पैसे देणाऱ्यांमध्ये अनेक बड्या मंडळींचे नाव आहे. परंतु पैसे उभारल्या नंतर प्रॉडक्ट मार्केट मध्ये आणण्याची जबाबदारी वाढत गेली, त्यासोबतच इन्व्हेस्टर सुद्धा प्रॉडक्ट लवकर मार्केट मध्ये आणण्यासाठी जोर देऊ लागले. त्यासाठी तिने तिचे प्रॉडक्ट मार्केट मध्ये आणलं.
लोकांच्या चाचण्या तिच्या त्या प्रॉडक्ट मध्ये होऊ लागल्या आणि एकच गोंधळ उडाला. मार्केट मध्ये ज्या चाचण्यांसाठी general electronics च्या मशिन्सला हजारो रुपये मोजावे लागायचे ते काम काही डॉलर्स मध्ये होऊ लागलं आणि मग त्यावरती इतर लोकांनी आक्षेप घेतला. तेव्हा एलिझाबेथ हे सांगत पुढे आली कि आम्ही “गरिबांच्या हिताचा विचार करत असताना लोक पैसाचा आणि त्यांच्या बुडणाऱ्या धंद्याचा विचार करत आहेत.” यातून तिने विरोधकाना एकप्रकारे आरोपी बनवलं.
The Inventor: Out for Blood in Silicon Valley
परंतु हे सगळं घडत असताना ती सगळ्यांना फसवत होती आणि हे फसवणं तिला कधीच खोटं वाटलं नाही.
शेवटी तीच खोटं जगासमोर आलं जेव्हा तिच्या प्रॉडक्टच्या चाचण्या खोट्या आहेत हे जगासमोर सत्य आलं.
एखादा माणूस ध्येयाने वेडा झाला कि काही हि करू शकतो याच ज्वलंत उदाहरण म्हणजे एलिझाबेथ.
स्वतःचा स्वप्नासाठी लोकांच्या जीवाशी खेळताना हि तिला कधी त्रास झाला नाही उलट तिला वाटत होत ती बरोबर करत आहे.
तीच स्वप्न पूर्ण करणं हेच तिच्या जीवनाचं अंतिम सत्य आहे त्यासाठी तिने रचलेला खेळ डॉक्युमेंटरीमध्ये पाहणं रोमांचकारक आहे.
खास भारतीय ट्विस्ट शोधणाऱ्या लोकांसाठीच यासगळ्यात तिची मदत करणारा
तिचा साथीदार आणि हिरो होता तो सनी बलवानी एक भारतीय.
तर ज्यांना हि बिजनेसविषयी डॉक्युमेन्टरी पाहायला आवडतात त्यांनी नक्की पाहावी अशी
The Inventor: Out for Blood in Silicon Valley नक्की पहा
अवतार सिंह पाश…. सबसे ख़तरनाक होता हैं अपने सपनो का मर जाना..
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)