तुम्हालाही Instagram चं व्यसन लागलं आहे का? साधारणपणे इंस्टाग्राम Reels तुमचा खूप वेळ कन्ज्युम करत असतात. Reels आणि Instagram Feeds हे एंडलेस आहेत, त्यामुळे तुम्ही स्क्रोल करतच राहता पण फीड मधील व्हिडीओ काही संपत नाहीत.गेल्या वर्षी फ्रान्सिस ह्युजेन्स (Frances Hugens) नावाच्या व्हिसलब्लोअरने काही मोठे खुलासे केले होते. त्यांनी (Meta) मेटाच्या अंतर्गत शोधनिबंधांचाही हवाला दिला होता. इंस्टाग्रामच्या अंतर्गत संशोधनातून हे समोर आले आहे की, Instagram हे तरुण वापरकर्त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत आहे.या समस्येवर Instagram ने स्वतः एक नवं फिचर आणलं आहे.Take a Break जे तुम्हाला यातून सोडवू शकणार आहे.
सुरुवातीला, जेव्हा Instagram नवे होते तेव्हा इन्स्टा मधील फीड चे कंटेंट एकदा संपलं की ते पुढे स्क्रोल करणे शक्य नसायचे. त्याऐवजी, एक डायलॉग बॉक्स दिसायचा की आता तुम्ही तुमचे इन्स्टा फीड पूर्णपणे पाहिले आहे.नंतर हे फीचर इन्स्टाग्रामवरून काढून टाकण्यात आले. हे फीचर काढून टाकल्यानंतर इंस्टाग्रामचे व्यसन लोकांमध्ये आणखी वाढले. आता कदाचित कंपनीला याची जाणीव झाली असेल आणि म्हणूनच इंस्टाग्रामवर एक नवीन फीचर आले आहे. या फीचरमुळे इंस्टाग्रामचे व्यसन कमी होऊ शकते.
शुक्रवारी, Instagram ने घोषणा केली की कंपनी टेक अ ब्रेक (Take a Break) फिचर पुन्हा लॉन्च करत आहे. भारतासह सर्व देशांतील युजर्ससाठी हे फिचर लागू करण्यात आले आहे. या फीचर अंतर्गत यूजर्स रिमाइंडर सेट करू शकतात.अर्थात,हे फीचर ऐच्छिक असले तरी ते वापरायचे की नाही हे सर्वस्वी तुमच्या मर्जीवर अवलंबून आहे. युजर्स 10, 20 आणि 30, 45 minutes, 1 hour, 2 hours, or 3 hours.अशा प्रकारे तास मिनिटांच्या अंतरासाठी रिमाईंडर सेट करू शकतात.
इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी (Adam Moesseri) यांनी नोव्हेंबरमध्ये सांगितले की, इंस्टाग्राममधून ब्रेक घेण्यासाठी एक फीचर विकसित केले जात आहे. हे फीचर यासाठी बनवण्यात आले आहे की, इंस्टा दीर्घकाळ वापरल्यानंतर यूजर्स अॅप वापरणे बंद करू शकतात.
हे फीचर सक्रिय केल्यानंतर, इन्स्टाग्रामवर सतत स्क्रोल करण्या वापरकर्त्यास रिमाइंडर पाठवले जाईल.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, तरुण वापरकर्त्यांना टेक अ ब्रेक (Take a Break) फीचर एनॅबल करण्यासाठी नोटिफिकेशनद्वारे सांगितले जाईल.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या वर्षी फ्रान्सिस हॉगेन (Frances Haugen) नावाच्या व्हिसलब्लोअरने काही खुलासे केले होते. ते म्हणाले होते की, इंस्टाग्रामच्या अंतर्गत संशोधनात असे आढळून आले आहे की, इंस्टाग्रामचा तरुण वापरकर्त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यानंतरच इंस्टाग्रामने (Instagram) टेक अ ब्रेक (Take a break) फीचरवर काम सुरू केल्याची बातमी आली.
इंस्टाग्रामचे (Instagram) टेक अ ब्रेक (Take a break) फीचर अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही वापरकर्त्यांसाठी असणार आहे.
हे फिचर येत्या काही दिवसांत सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. कारण ते रोल आउट व्हायला सुरुवात झाली आहे.
बजेट 2022 सोप्या भाषेत:15 सर्वात मोठ्या गोष्टी माहित हव्या
पुष्पा बॉक्स ऑफिस कलेक्शन: चित्रपटाची हिंदी आवृत्ती 75 कोटीजवळ
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 0४, 2022 21: 10 PM
WebTitle – The Instagram company says to itself, Take a Break! Know the reason