Hindu Aachar Sanhita: प्रयागराज : महाकुंभ पुढील वर्षी म्हणजेच 2025 हे देशभरातील आणि जगभरातील हिंदूंसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. यामध्ये हिंदू आचार संहिता वर मंजुरीचे अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. 351 वर्षांनंतर आता ही आचारसंहिता तयार झाली आहे.हिंदू आचार संहिता महाकुंभ मध्ये जारी करण्यात येणार जाणकारांच्या मते प्रथम मनुस्मृती, नंतर पराशर आणि नंतर देवलस्मृतीची रचना झाली.गेल्या 351 वर्षांपासून कोणत्याही नव्या स्मृतींचे निर्माण झाले नव्हते. काशीच्या विद्वत परिषदेने तयार केलेल्या या आचारसंहितेमध्ये मंदिरात बसण्यापासून पूजा करण्यापर्यंत, लग्नापर्यंतच्या सर्व विधींसाठी सामान्य नियम करण्यात आले आहेत. यामध्ये महिलांना अशुद्ध (?) अवस्थेशिवाय वेदांचा अभ्यास आणि यज्ञ करण्याची मुभा असेल. यासोबतच प्री-वेडिंग सारख्या कुप्रथा (?) हटवत रात्रीच्या विवाह सोहळ्यांऐवजी दिवसा होणाऱ्या विवाहांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
महाकुंभ मध्ये जारी केली जाईल हिंदू आचार संहिता
महाकुंभात शंकराचार्य आणि महामंडलेश्वर यांच्या अंतिम मंजुरीनंतर धर्माचार्य देशातील जनतेला हिंदू आचारसंहिता स्वीकारण्याचे आवाहन करतील, असे सांगण्यात येत आहे. ‘माध्यमांशी बोलताना काशी विद्वत परिषदेचे सरचिटणीस डॉ. रामनारायण द्विवेदी आचार्य यांनी हिंदू आचारसंहिता तयार झाल्याचा बातमीला दुजोरा दिला आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार वर्षांत देशभरातील 70 विद्वानांच्या टीमने हिंदू आचारसंहिता तयार केली आहे. काशी विद्वत परिषदेने ही टीम तयार केल्याची माहिती मिळत असून टीमने या विषयावर चाळीस पेक्षा जास्त बैठका केल्याची माहिती समोर आलीय.मिळालेल्या माहितीनुसार, आचारसंहिता तयार करण्यासाठी कर्म आणि स्मृतींचा आधार घेण्यात आला आहे. त्यात श्रीमद्भागवत गीता, रामायण, महाभारत, पुराणातील उतारेही घेतले आहेत. यासोबतच मनुस्मृती, पराशर स्मृती आणि देवल स्मृती यांचाही आधार हिंदू आचार संहिता तयार करताना घेण्यात आला आहे.
हिंदू आचारसंहितेमध्ये व्यक्तीच्या जीवनातील सर्व विधी आणि महत्त्वाच्या घटनांसाठी सामान्य नियम असतात.
यामध्ये वाढदिवसासारख्या कार्यक्रमांमध्ये भारतीय परंपरांचे पालन करण्यावर भर देण्यात आला आहे.
यामध्ये विधवा पुनर्विवाह पद्धतीचाही समावेश करण्यात आला आहे. यासोबतच सोळा विधीही काळाप्रमाणे सोपे करण्यात आले आहेत.
उदाहरणार्थ, मृत्यूनंतर दिल्या जाणाऱ्या मेजवानीसाठी किमान 16 संख्या निश्चित केली आहे.
असे सांगितले जात आहे की प्रयागराजमध्ये 2025 च्या महाकुंभमध्ये मंजुरीची अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर,
नवीन हिंदू आचारसंहितेच्या प्रती देशभरात वितरित केल्या जातील.
पहिल्या टप्प्यात सुमारे एक लाख प्रती छापल्या जाणार आहेत.अशी माहिती समोर आली आहे.
EWS चा लाभ फक्त सामान्य वर्गाला देणे अन्यायकारक, न्यायालयाने सरकारला बजावली नोटीस
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 20,2024 | 16:35 PM
WebTitle – The Hindu Code of Conduct will be issued in Mahakumbh