सांगली : (प्रतिनिधी) बौद्ध विकास मंडळ दहागाव व अकरागाव गटा च्या वतीने,प्रकल्पग्रस्त बौध्द संघर्ष समितीचा,चिंतन मेळावा तथा धम्म दिक्षा स्मृती सोहळा शनिवार दि.२५ डिसेंबर,२०२१ रोजी मनुस्मृती दहन दिनी मौजे उदगिरी,ता.शाहूवाडी,जि.कोल्हापूर या ठिकाणी अत्यंत उत्साहात पार पडला. सदर मेळाव्यात सांगली कोल्हापूर जिल्हयातील विविध गावात विस्थापीत झालेले बौद्ध बांधव मोठया संख्येंने उपस्थित होते.यावेळी मेळाव्याला उपस्थित असलेल्या बौद्ध बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्माचे काटेकोरपणे आचरण करण्याचा व प्रकल्पग्रस्त म्हणून निर्माण झालेले प्रश्न संघटीत राहून सोडवणुकीचा निर्धार केला.
या मेळाव्यास कोल्हापूर सांगली जिल्हयातील विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याची सुरुवात पंचशिल ध्वजारोहन,मानवंदना व बुध्द वंदनेने करण्यात आली. सकाळचे उदघाटन सत्रपुर्व मनुस्मृती प्रतिकृतीचे दहन आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्या चे व काही जेष्ठ महिलांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी काही महिला कार्यकर्त्यांची व विदयार्थ्यांची भाषणे झाली. चिंतन मेळाव्याचे उद्घाटन मुंबई स्थित बालविकास प्रकल्प अधिकारी, गौरी सोनवणे-गायकवाड यांचे हस्ते् झाले,तर उपस्थितांना पुज्य भंतेजी संबोधी यांनी २२ प्रतिज्ञा वदवून धम्म दिक्षा दिली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे कोल्हापूर जिल्हात अध्यक्ष एस.पी.दिक्षित,शाहूवाडी तालुका अध्यक्ष दिपक कांबळे,प्रकाश कांबळे, राहूल कांबळे,शितल कांबळे यांची भाषणे झालीत. कार्यक्रमांस ऍड.सिध्दार्थ काकडे,तानाजी घोलप,उत्तम घोलप,सुरेश कांबळे,एम.एच.परुले,भिमराव तांबे आदी बरेच मान्यनवर उपस्थित होते.
तिसऱ्या सत्रात सांस्कृतीक प्रबोधन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राचे सुप्रसिध्द, गायक कबीर नाईकनवरे यांच्या सुरेल आवाजात बुद्ध व भीम गितांचे सादरीकरण करण्यात आले.शाहीर रफीक पटेल,प्रविण बनसोडे,प्रा.आनंद भोजणे व प्रविण राघवन आदींनी त्यांना उत्कृष्ट साथ दिली.तदनंतर अनिसचे राज्य संघटक भास्कर सदाकळे यांचा अंधश्रद्धा निर्मुलनावर एकपात्री प्रयोग सादर झाला.यावेळी प्रकल्पंग्रस्त बौद्ध बांधवांतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या गुणी जनांचा सत्कार भंतेंजींच्या हस्ते व मान्यवरांचे उपस्थितीत पार पडला.
सन १९५८ साली डोंगरभागात उदगिरी गाव शेजारी असलेल्यां ढाकाळे या गावी तत्कालीन महार समाजाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर व तत्कालीन दिगगज नेत्यांच्या उपस्थित हजारोंच्या संख्येने बौद्ध धम्माची दिक्षा घेतली होती.त्या डोंगर भागात झालेल्या धम्म क्रांतीचे कुशल नेतृत्व स्मृतिशेष एस जी कांबळे तथा सावळा मास्तर गोठणेकर यांनी केले होते.
ऐतिहासिक घटनेला यावर्षी ६३ वर्षे पुर्ण
सदर ऐतिहासिक घटनेला यावर्षी ६३ वर्षे पुर्ण होत असून त्याचीच पुनरावृत्ती उदगिरी(केंद्र ढाकाळे,जवळ असलेल्या) या ठिकाणी
चिंतन मेळावा तथा धम्म दिक्षा स्मृती सोहळा आयोजित करुन उपस्थित बांधवांना धम्मादिक्षा देवून करण्यात आली.
विशेष म्हणजे दोनशे ते तीनशे किलोमीटर दूर विस्थापित बौद्ध बांधव आपले वसाहतीतून स्वखर्चाने वाहने करून
शेकडोंच्या संख्येने आपले मूळ गाव ठिकाणी महामानवाना व आपले पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी आले होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी,प्रकल्पग्रस्त बौद्ध संघर्ष समितीचे अध्यक्ष शाहीर दिपक गोठणेकर होते.
तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष संदीप घोलप यांनी केले.
स्वागत स्थानिक संयोजन समितीचे प्रमुख शरद घोलप व साथीदारांनी केले,
तर उपस्थितांचे आभार ऍड.दिनेश घोलप यांनी मानले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल कांबळे तर चिंतन मेळाव्याची भुमीका संघटनेचे जेष्ट सल्लागार आनंद घोलप यांनी मांडली.
मनसर विश्व विद्यापीठ येथे MBCPR टीम तर्फे कार्यशाळा संपन्न
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 29, 2021 12:18 PM
WebTitle – The decision of the displaced Buddhist brothers to stay united and solve the problem