लंडनच्या एडवर्ड यांचा विवाह औरंगाबादच्या सांची यांच्यासोबत बौद्ध पद्धतीने संपन्न झाला.त्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे.भारतात प्रेमविवाह करणं म्हणजे आजकाल जास्तच अवघड होत चाललं आहे,समाजातील काही अतीवादी लोक आंतरजातीय आंतरधर्मीय लग्नाला विरोध करत असतात,हे कमी म्हणून आता सत्ताधारी भाजपकडूनही अशाप्रकारच्या लग्नाला विरोध होताना दिसत असून लव जिहाद अन वेगवेगळ्या नावाखाली अशी लग्ने होऊ नयेत म्हणून आटापिटा करताना राजकीय धर्मांध लोक दिसत आहेत.मात्र तरीही असे विवाह होतच असतात आणि म्हणतात ना प्यार किया तो डरना क्या,अन खरंतर लग्न ही अतिशय खाजगी बाब असते,शिवाय आपल्याकडे कायदे कानून नावाचा प्रकारही आहेच,दोघांची पसंती झाली तर लग्न होतं.यात इतरांनी खरतर तडमडू नयेच,पण आपल्याकडे चार लोक नावाचा एक सामाजिक प्रकार आहे,खरतर अंधश्रद्धा,त्यामुळे हे चारलोक आपल्या आयुष्यात कारण नसताना डोकावत असतात,अन आपणही विनाकारण त्यांना महत्व देत असतो,असो उगाच एवढी लांबड अशा आनंदाच्या क्षणी बरी नाही,पण याबद्दल प्रस्थापित माध्यमे बोलत नाहीत म्हणून आम्हाला बोलावे लागत आहे.
समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी (रोटी बेटी व्यवहार) आंतरजातीय विवाह होणे आवश्यक आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तर लंडनच्या एडवर्ड यांचा विवाह औरंगाबादच्या सांची यांच्यासोबत बौद्ध पद्धतीने संपन्न झाला.सांची आणि एडवर्ड यांची पहिली भेट ही इंग्लंडमध्ये झाली. तेव्हापासून म्हणजे 2019 पासून ते दोघं इंग्लंडमध्येच (Sanchi and Edward Story) एकत्र होते. आपल्या प्रेमाबद्दल त्यांनी आपल्या घरच्यांना सांगितलं आणि दोघांच्या घरच्यांनी सुद्धा या लग्नासाठी होकार दिला.मात्र लग्न औरंगाबाद येथेच अन तेही बौद्ध पद्धतीनं व्हावं अशी मुलीच्या म्हणजे सांची यांच्या कुटुंबियांची अट होती.ही अट तशी फार कठीण वाटत होती कारण एडवर्डच्या घरची संस्कृती अन सांची यांच्या घरची संस्कृती ही पुर्णपणे वेगळी.परंतु एडवर्ड यांच्या कुटुंबियांचा मोठेपणाच इतका की एडवर्ड आणि सांची यांच्या विवाहासाठी हे लग्न त्यांनी बौद्ध पद्धतीनं करण्यास होकार दिला अन दोघांचा मंगल परिणय मोठ्या थाटामाटात बौद्ध पद्धतीने औरंगाबाद येथे संपन्न झाला.
विषमतावादी जाती पातीच्या भिंती तोडून हे लग्न होत असल्याचा खास आनंद झाला असं सांची यांचे वडील यावेळी म्हणाले.
मुलगी सांची आता कायमची सातासमुद्रपार राहायला जाणार याचं दुःख आहेच मात्र, मुलगी एका चांगल्या कुटुंबात गेल्याचा आनंदही असल्याची प्रतिक्रिया यावेळी रगडे (Ragde Family) कुटुंबियांनी दिली.टीम जागल्याभारत कडून या नवपरिणीत दाम्पत्यास हार्दिक शुभेच्छा मंगल हो!
बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 03,2023 19:40 PM
WebTitle – The Buddhist wedding story of Edward of London and Sanchi of Aurangabad