मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी मंदिरावरील भोंग्यावर ही कारवाई करावी अशी मागणी केली आहे.ज्या ज्या गोष्टींचा लोकांना त्रास होतो ती गोष्ट बंद झाली पाहिजे.असं राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.आपला धर्म आपल्या घरात ठेवा असेही त्यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रात आज 90-92% ठिकाणी सकाळची अजान झाली नाही.सर्व ठिकाणी आमची लोकं तयारच होते,मी त्या मौलवींचे आभार मानेन त्यांना आमचा विषय नीट समजला आहे.मला आता मुंबईचा रिपोर्ट आलाय त्या रिपोर्ट प्रमाणे मुंबईमध्ये 1140 मशिदी आहेत.यापैकी 135 मशिदींवर सकाळची अजान सकाळी 5 वाजायच्या आत लावली गेली,
काल मला विश्वास नांगरे पाटील यांचा फोन आला,ते म्हणाले आम्ही सर्व मशिदींच्या मौलवींशी बोललो आहोत. ते सकाळची अजान लावणार नाहीत,मग आता ज्या 135 मशिदींवर सकाळी पाच च्या अगोदर अजान वाजली त्यांच्यावर राज्यसरकार काय कारवाई करणार आहे? की फक्त आमच्याच मुलांना उचलणार आहे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत विचारला.
मात्र राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे आता सर्व धर्मियांना भोंगे आणि आवाजावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे.मंदिरावरील भोंग्यावर ही कारवाई करण्याची मागणी राज ठाकरेंनी केली आहे.त्याप्रमाणे आज शिर्डीत काकड आरतीच झाली नसल्याची माहिती समोर आलीय.
शिर्डी मध्ये आज काकड आरती झाली नाही
इतिहासात पहिल्यांदाच शिर्डी येथील साईबाबा देवस्थान आणि त्र्यंबकेश्वर येथे आज काकड आरती झाली नाही.
यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
“आजचा दिवस हिंदूंसाठी ‘काळा दिवस’ आहे आणि मनसेचा भोंगा मनसेवरच उलटणार आहे”,अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
“भोंग्याचा वाद हा धार्मिकच असून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत.
त्यांनी याआधी मराठीच्या मुद्द्यावरुन मराठी माणसांमध्ये फूट पाडली.आता ते हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत.
आज पुन्हा एकदा भाजपाने त्यांच्या राजकारणासाठी राज ठाकरेंचा बळी दिला आहे. हे भोंग्यांचं आंदोलन मनसेवरच उलटणार आहे”, असं राऊत म्हणाले.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
पायरेटस् ऑफ कॅरेबीयन कॅप्टन जॅक स्पॅरो पत्नीचा मार खाऊनही…
संभाजी भिडे सायकल वरून पडल्याने गंभीर जखमी; उपचार सुरू
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 04, 2022 18:06 PM
WebTitle – the action should be taken on loudspeakers on the temple – Raj Thackeray