टोकियो: जपानच्या (Japan) राजकारणातील काल मोठी धक्कादायक घटना घडली.माजी प्रधानमंत्री शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्या हत्येनंतर जागतिक स्तरावर खळबळ माजलेली असताना आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. शिंजो यांच्या मारेकऱ्याने त्यांच्या हत्येचे कारण उघड केलंय. मात्र, या खुनाच्या घटनेनंतर (Former PM Shinzo Abe shot dead) देशातच नव्हे तर जगभरातून निषेध केला जात आहे. शिंजो आबे यांचा मारेकरी हा जपानी सागरी सेल्फ-डिफेन्स फोर्सचा माजी सदस्य आहे.
जाणून घ्या हत्येमागचे कारण…
माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांची शुक्रवारी एका राजकीय कार्यक्रमादरम्यान हत्या झाल्यानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. शिंजो आबे यांचा पकडलेला मारेकरी म्हणाला की तो त्यांच्या धोरणांवर नाराज होता. हल्लेखोर आबे यांच्यावर असमाधानी असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. तो बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या हत्येचा कट रचत होता.अशी धक्कादायक बाब समोर आलीय.पकडलेला 41 वर्षीय मारेकरी हा जपानी सागरी सेल्फ-डिफेन्स फोर्सचा माजी सदस्य आहे. त्याने आपल्या बंदुकीने आबे यांच्यावर गोळ्या झाडल्या. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकऱ्याच्या घरात मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली आहेत.
शिंजो आबे यांची हत्या कुठे झाली?
शिंजो आबे हे पश्चिमेकडील नारा शहरातील रेल्वे स्थानकाबाहेर प्रचार करत होते. लोकांना संबोधित करत असताना त्यांच्यावर थेट दोन गोळ्या झाडण्यात आल्या. गोळी झाडताच सुरक्षा अधिकाऱ्यांनी मारेकऱ्यावर जोरदार मुसंडी मारली. राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि बेज ट्राउझर्समध्ये असलेला संशयित कसा तरी अधिका-यांच्या हाती लागला होता. मात्र, तोपर्यंत शिंजो यांना गोळी लागली होती आणि त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती.
हत्येनंतर सोशल मिडियात व्हायरल झालेल्या फोटो मध्ये आबे रेलिंगचा आधार घेऊन रस्त्यावर पडलेले दिसून आले.त्यांचा पांढरा शर्ट रक्ताने माखलेला आहे. त्यांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात लोक जमलेले दिसतात. त्याना वाचवण्यासाठी काही लोक त्यांच्या हृदयाची मालिश करताना दिसत आहेत.
प्रधानमंत्री फुमियो किशिदा यांनी तीव्र निषेध व्यक्त केला
जपानचे विद्यमान प्रधानमंत्री फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांनी या हत्याकांडाचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले की, जपानी लोक आणि जागतिक नेत्यांनी राजकीय हिंसाचार दुर्मिळ असलेल्या आणि बंदुकांवर कडक नियंत्रण असलेल्या देशात राजकीय हत्येच्या घटनेबद्दल आश्चर्य वाटतेय. त्यांचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आल्याचे किशिदा यांनी सांगितले. त्याचा जीव वाचवण्यासाठी मी मनापासून प्रार्थना केली.मात्र ते वाचू शकले नाहीत”
आबे नेहमी जनतेत मिसळायचे
माजी प्रधानमंत्री शिंजो आबे नेहमी जनतेत जाऊन मिसळायचे.सशस्त्र सुरक्षा दलांच्या गराड्यात राहूनही ते सामान्य लोकांमध्ये जात असत.
त्यांच्याशी संवाद साधत.शुक्रवारी देखील शिंजो आबे एका रेल्वे स्थानकाजवळ लोकांना संबोधित करत असतानाच त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली.
शनिवारी भारतात 1 दिवसाचा राष्ट्रीय शोक
भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिंजो आबे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
यासोबतच त्यांनी एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. शनिवारी भारतात राष्ट्रीय शोक दिवस असेल.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
अमरनाथ यात्रा,गुहेजवळ ढग फुटी,10 यात्रेकरूंचा मृत्यू,बचावकार्य सुरू
23 लाख वेतन परत करणाऱ्या प्रोफेसर चा यु टर्न,खात्यात फक्त 970 रुपये
कन्हैयालाल च्या पत्नीच्या खात्यात भाजप नेत्याकडून कोटी रुपये ट्रान्सफर
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 09, 2022, 09:56 AM
WebTitle – That’s why I killed Shinzo Abe … The Japanese were shocked when the killer explained the reason