दिग्दर्शित आणि ‘विषय खोल’ प्रस्तुत ‘तळ’ (Bottomland) हा केवळ एक लघुपट नसून, ते आधुनिक भारताच्या तथाकथित प्रगत चेहऱ्याखाली दडलेल्या हिंस्त्र मानसिकतेचे एक दाहक वास्तव आहे. या माहितीपटात केवळ एका गुन्ह्याची कथा नाही, तर आपल्या समाजाच्या मानसिकतेचा ‘तळ’ शोधण्याचा एक प्रयत्न आहे.
जात हे समाजाचे वास्तव आहे. जातीव्यवस्थेच्या आपण जेवढे तळाशी जाऊ तेवढे ती अधिकाधिक दाहक आणि हिंस्त्र होत जाते. जातीच्या वरच्या टोकावर असलेल्या लोकांना या दाहकतेची, हिंसेची पुसटशी सुद्धा कल्पना नसते आणि त्यात त्यांच्या घरातून, सामाजिक परिघातून ते जे काही शिकतात त्यामुळे अनेकदा आरक्षण, ॲट्रॉसिटी प्रतिबंधक कायदा याविषयी त्यांच्या मनात बरचसे समज – गैरसमज निर्माण होतात.
नेमका याच मानसिकतेला हात घालण्याचा प्रयत्न दिग्दर्शक स्वप्निल शेट्ये यांनी तळ बॉटमलँड या लघुपटात केलेला आहे. पटकथा या लघुपटाची मोठी जमेची बाजू आहे. लेखक-दिग्दर्शकाने अतिशय संवेदनशीलपणे दोन समांतर जगांची मांडणी केली आहे. एक जग जे ‘ड्रॉइंग रूम’ मध्ये बसून न्यूज चॅनेलवरच्या चर्चा बघत “आता जातीवाद उरलाच कुठेय?” असा प्रश्न विचारते आणि दुसरे जग जिथे आजही एखादी आई आणि तिच्या कोवळ्या मुलीला केवळ त्यांच्या जातीमुळे आणि त्यांनी जमीन कसली म्हणून जीव गमवावा लागतो. या दोन ध्रुवांवरील वास्तव अतिशय संवेदनशीलपणे आणि संयतपणे मांडण्याचे आव्हान दिग्दर्शकाने यशस्वीपणे पेलले आहे.
या लघुपटात आरक्षण आणि ॲट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्याबाबतचे समाजातील पूर्वग्रह (Stereotypes) अतिशय प्रभावीपणे मांडले गेले आहेत.
“आरक्षणामुळे टॅलेंटला वाव मिळत नाही” किंवा “आरक्षणाचे फायदे घेणाऱ्यांना त्याचे गांभीर्य समजत नाही”
अशा प्रकारची विधाने आजही आपल्या घराघरांत ऐकू येतात,
पण त्या आरक्षणामागची शेकडो वर्षांची प्रताडणा आणि सामाजिक अन्याय आपण सोयीस्करपणे विसरतो.
दिग्दर्शकाने हीच मानसिकता नेमकेपणाने, अतिशय छोट्या छोट्या प्रसंगातून मांडली आहे.
पोलीस स्टेशनमधील दृश्ये या लघुपटाचा आत्मा आहेत. ॲट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्याचा (SC/ST Act) गैरवापर होतो, हा एक मोठा गैरसमज समाजात पसरवला जातो. मात्र, या चित्रपटात वाघमारे या सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून दिग्दर्शकाने हे स्पष्ट केले आहे की, हा कायदा केवळ अधिकार नसून ते शोषितांसाठी एक संरक्षणात्मक कवच आहे. हा लघुपट ॲट्रॉसिटी केसेस हाताळणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर नेमकं बोट ठेवतो. वादाची पार्श्वभूमी माहित असूनही जेव्हा पोलीस अधिकारी म्हणतो की “गुन्हा अज्ञात लोकांनी केला आहे असं गृहीत धरून चौकशी करू”, तेव्हा व्यवस्थेची उदासीनता नवे तर पक्षपातीपणा स्पष्ट होतो. पिडीत कैलासच्या आई-बहिणीचा खून झालेला असतानाही, त्यालाच संशयाच्या भोवऱ्यात उभे करणे हे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि जातीय मानसिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. असेच प्रश्नचिन्ह दिग्दर्शक इतर अनेक वेगवेगळ्या प्रसंगात उभे करतो, मग ते पोलिस स्टेशन असो, घर असो, कॉर्पोरेट ऑफिस असो किंवा हॉस्पिटल. जातवास्तव आणि जातीयवादी मानसिकतेचा दांभिकपणा दिग्दर्शकाने चपखलपणे पकडला आहे.
दिग्दर्शक स्वप्नील शेट्ये यांचे यांनी पटकथेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील रंगसंगती आणि वातावरणनिर्मिती यातला फरक नेमका साधला आहे.
‘तळ’ हा केवळ विहिरीचा तळ नाही, तर तो माणुसकीचा घसरलेला तळ दर्शवतो, हे बिंबवण्यात ते यशस्वी झाले आहेत.
सिनेमाची सिनेमॅटोग्राफी सुद्धा उत्कृष्ट आहे.
विहिरीचे दृश्य, गावातील धुळीचे रस्ते आणि शहरांमधील चकाकणारे ऑफिसेस यातील विरोधाभास कॅमेऱ्याने उत्तम टिपला आहे.
कॅमेरा उगाच भिरभिर फिरत नाही. पोलिस स्टेशनमधील क्लोज अप आणि पीडित तरुण पडद्यावर असतानाचे लाँग शॉट दृश्यांची परिणामकारकता वाढवतात.
या लघुपटाला किशोर कदम आणि मिलिंद शिंदे हे दोन कसलेले नट लाभले आहेत. अशा गुन्ह्यांना सरावलेल्या एक सराईत आणि बेरकीपणाची किनार असलेला एक उदासीन पोलिस अधिकारी किशोर कदम यांनी नेमकेपणाने साकारला आहे. दुसरीकडे घटनेने अस्वस्थ, उद्विग्न झालेला आणि काहीसा हतबल पण तरीही न्यायासाठी प्रयत्न करणारा सामाजिक कार्यकर्ता मिलिंद शिंदे यांनी देहबोलीतून, संवाद फेरीतून, नजरेतून नेमका उभा केला आहे. मिलिंद धुमाळे यांनी कोणताही बटबटीतपणा टाळून विषयाला न्याय देणारे उत्कृष्ट संवाद लिहिले आहेत. पोलिस स्टेशनमधील किशोर कदम आणि मिलिंद शिंदे यांच्या अभिनयाची जुगलबंदी म्हणजे जणू वाचिक, कायिक अभिनयाचा वस्तुपाठ. त्या दृश्यांमध्ये या दोन दिग्गज अभिनेत्यांनी जे काही केले आहे निदान ते अनुभवण्यासाठी तरी हा लघुपट प्रत्येकाने जरूर पाहायला हवा.
”जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड” (उशिरा मिळालेला न्याय हा न्याय नाकारण्यासारखाच आहे) हा या लघुपटातील एक महत्त्वाचा संदेश आहे.
लघुपटाच्या शेवटी होणारी कैलासची अस्वस्थता आपल्याला अंतर्मुख करते.
हा लघुपट पाहील्यावर आपण स्वतःला विचारले पाहिजे की, आपण खरोखरच माणूस झालो आहोत का?
’तळ’ ही कलाकृती केवळ पाहण्यासाठी नाही, तर ती अस्वस्थ होऊन विचार करण्यासाठी आहे.
हा लघुपट आपल्या समाजातील त्या ‘तळाच्या’ लोकांसाठीचा आवाज आहे, ज्यांचा आवाज व्यवस्थेच्या गोंधळात, मुजोरीत दाबला जातो.
हा लघुपट प्रत्येकाने, विशेषतः स्वतःला जातीवादापलीकडचे समजणाऱ्या, आता जातीवाद राहिलाच कुठे? असे प्रश्न विचारणाऱ्या सुशिक्षित वर्गाने पाहायलाच हवा.
रेटिंग: ४.५/५ (विषयाची प्रगल्भता आणि वास्तववादी मांडणीसाठी आणि सर्वच प्रमुख पात्रांचा उत्कृष्ट अभिनय)
तळ … युट्यूबवर रिलीज झालाय… नक्की बघा, लिंक

नितीन दिवेकर
चित्रपट अभ्यासक
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 02,2025 | 14:48 PM
WebTitle – Tal bottomland A disturbing vision of the deep wounds of social inequality























































