मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मंजूर करण्यात याव्यात ह्या संबंधी वंचित बहुजन आघाडी तर्फे मुंबई सेंट्रल एस टी कर्मचारी आणि आगार प्रमुख ह्यांना प्रदेशाध्यक्ष रेखा ताई ठाकूर ह्यांच्या नेतृत्वात पत्र देऊन एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. ह्यावेळी मुंबई भरातील सर्व जिल्हा अध्यक्ष, महिला जिल्हा अध्यक्षा, तालुका अध्यक्ष, महिला तालुका अध्यक्षा, वॉर्ड पदाधिकारी उपस्थित होते.
एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसहीत अनेक वर्षांपासून कामगारांच्या मागण्या रखडलेल्या आहेत. त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सणासुदीच्या काळात या संपामुळं प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत.मात्र प्रशासनाकडून यावर अजूनही तोडगा काढला गेलेला नाही.उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर एसटी कामगार संघटनांनी नकार दर्शवल्याने संपाची कोंडी अद्यापही कायम आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शनिवारी एसटीचे तब्बल ६५ डेपाे बंद असल्याची माहिती मिळाली आहे.तर रविवारी दुपारपर्यंत राज्यातील एकूण ११७ डेपो या संपामुळे बंद पडून असल्याने यावेळी सणासुदीला प्रवास करणाऱ्या नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.अनेक ठिकाणी गाड्या आगरातच उभ्या असल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती.तर दुसरीकडे एसटीच्या संपाने खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी यात भरमसाठ भाडेवाढ करून प्रवाशांच्या गैरसोयीचा फायदा उठवला.
वंचित बहुजन आघाडीची राज्यात ठिकठिकाणी निदर्शने
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मंजूर करण्यात याव्यात
ह्या संबंधी वंचित बहुजन आघाडी तर्फे मुंबई सेंट्रल एस टी कर्मचारी आणि आगार प्रमुख
ह्यांना प्रदेशाध्यक्ष रेखा ताई ठाकूर ह्यांच्या नेतृत्वात पत्र देऊन एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.
वंचित बहुजन आघाडी चे वतीने एसटी कामगारांच्या प्रश्नांवर उपविभागीय कार्यालय भूम ,मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल यांच्या नेतृत्वाखाली आज एस टी कर्मचार्यांच्या न्याय हक्कासाठी विराट मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.
एसटी महामंडळ कामगारांनी पुकारलेल्या संपाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. अनेक वर्षांपासून कामगारांच्या मागण्या रखडलेल्या आहेत. प्रत्येक वेळी एसटी तोट्यात असल्याचे सांगितले जाते, परंतु महामंडळाच्या बसेस पूर्ण भरून चालतात.त्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आहे हे मान्य होण्यासारखं नाही. ते नफ्यातच असले पाहिजे असे आम्ही गृहीत धरतो. महाराष्ट्र शासनाने कामगारांशी बोलून त्यांचा प्रश्न तात्काळ सोडवावा व मागण्या मान्य कराव्या.अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे.
न्यायालयाचा इशारा
संप करू नये, असा स्पष्ट आदेश दिलेला असतानाही महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने तो आदेश अव्हेरला
आणि राज्यभरातील २५० एसटी आगारांपैकी ५९ आगारांमधील कामगार,
कर्मचारी संपावर गेल्याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी घेतली.
‘जाणीवपूर्वक न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल तुमच्याविरुद्ध कारवाई का करू नये,
याचे स्पष्टीकरण या संघटनेचे नेते अजयकुमार गुज्जर यांनी प्रतिज्ञापत्रावर द्यावे आणि स्वत: जातीने सुनावणीला हजर रहावे.
अन्यथा हजेरीसाठी अटक वॉरंटसह कठोर आदेश काढणे आम्हाला भाग पडेल’,
असा गर्भित इशाराच न्या. शाहरुख काथावाला व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने दिला होता.
जय भीम चित्रपटाच्या आणखी एका दृश्याने वाद ,निर्मात्यांनी काढला सीन
जय भीम मुवी मधील प्रकाश राजच्या ‘झापड मारण्याच्या’ सीनने नवा वाद
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
धार्मिक स्वातंत्र्य:भारताला रेड लिस्ट मध्ये टाका,अमेरिकन संस्थेची शिफारश
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 08, 2021 19:56 PM
WebTitle – Support by the Vanchit Bahujan Aghadi in the strike called by ST Corporation workers