देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.त्यातच काही लोक लोकांच्या भीती आणि अज्ञानाचा फायदा घेऊन लूटमार करत आहेत. फसवणूक करत आहेत.कुणी आपलं जडीबुटी प्रॉडक्ट विकत आहे.कुणी वेगवेगळ्या औषधांच्या नावाखाली लोकांना फसवत आहेत.कोरोनावर मात करण्यासाठी दोन पऱ्या प्रकट?
अशातच मध्यप्रदेशातील जुनगड येथे राजगड जिल्ह्यामध्ये कोरोनावर मात करण्यासंदर्भातील
एका अफवेमुळे शेकडो लोकांनी मंदिरात गर्दी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी मंदिरात दोन पऱ्या आल्या असून
त्यांनी दिलेलं पाणी प्यायल्याने कोरोनाचा आजार होत नाही अशी अफवा पसरवली गेली.
त्यानंतर मुख्य जिल्हा कार्यालयापासून १५ किमी अंतरावर असणाऱ्या चाटूखेडामधील मंदिराबाहेर
शेकडोच्या संख्येने आजूबाजूच्या गावातील लोक जमा झाले.
पवित्र पाणी पिण्यासाठी लोकांनी एवढी गर्दी
हे सर्वजण आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून या पऱ्यांकडून मिळणारं पवित्र पाणी पिण्यासाठी गर्दी करायला लागले.या पऱ्यांनी दिलेलं पाणी प्यायल्यास कोरोना होणार नाही तसेच झाला तर ठीक होतो असं या लोकांचा समज करून देण्यात आला.
हे पवित्र पाणी पिण्यासाठी लोकांनी एवढी गर्दी केली की कोरोनावर मात करण्यासाठी आलेल्या दोन पऱ्या वाटत असलेले पाणी मिळविण्यासाठी
त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली,त्यानंतर स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
मंदिर परिसरामध्ये बुधवारी सकाळी ११ ते १२ दरम्यान शेकडो लोकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेमुळे देशात कोरोनासंदर्भात असणारा अंधविश्वास किती टोकाचा आहे याची झलक पहायला मिळाली.गावातील दोन महिलांच्या अंगात देवी आल्याचं सांगून त्याच पऱ्या असल्याचं सांगत अफवा उठवण्यात आली होती.
या घटनेचा व्हिडिओ एका स्थानिक नागरिकाने बनवून सोशल मिडियात आपलोड केल्यावर तो वायरल झाला.
या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये तपासाचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी पोलिसानी आयोजक चार व्यक्तींवर गुन्हा दाखल केल्याचे समजते.पोलिसांनी गावामध्ये स्पीकरवरुन घोषणा करत अफवांवर विश्वास ठेऊन अंधश्रद्धेला बळी पडू नका असं आवाहन केलं आहे.तसेच टीम जागल्या भारत सुद्धा वाचकांना आवाहन करत आहे. कोणत्याही प्रकारच्या दाव्यांना बळी पडू नये.आपली काळजी आपणच घ्या आणि कोरोनाच्या संदर्भात शक्यतो सरकारी इस्पितळात जाऊनच शंका समाधान करून घ्या.
रेल्वे प्रवास ; ब्रेक द चेनसाठी बंधनांच्या विविध स्तरासंदर्भात शासनाचे स्पष्टीकरण
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)