नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर काही दिवसांनीच मथुरा येथील यमुना एक्स्प्रेस वे च्या किनाऱ्यावर एका तरुणीचा लाल सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. श्रध्दासारखंच या मुलीचाही एखाद्या माथेफिरू नराधम प्रियकराने मारले नाही ना असा लोकांनी संशय व्यक्त केला. 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह पॉलिथिनमध्ये गुंडाळून सुटकेसमध्ये ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या हाती काही लागत नव्हतं.टोल प्लाझा ते आजूबाजूच्या परिसरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज शोधण्यात आले मात्र कोणताही सुगावा लागला नाही. 2 दिवसांनी मृतदेहाची ओळख पटली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. आयुषी चौधरी चा खून करणारा दुसरा कोणी नसून मुलीचे वडील असल्याचे निष्पन्न झाले. आयुषी चौधरी असे या मुलीचे नाव आहे. आपल्या मुलीने दुसऱ्या जातीतील मुलासोबत प्रेमविवाह केल्याबद्दल बाप हैवान झाला आणि त्याच्याच काळजाच्या तुकड्याला त्याने गोळ्या घालून ठार मारले.
आयुषी चौधरी खासगी महाविद्यालयातून बीसीए करत होती
आयुषी दिल्लीतील एका खासगी महाविद्यालयातून बीसीए करत होती.पोलिसांनी आयुषीचे वडील नितेशकुमार यादव (४९) आणि आई ब्रजबाला (४५) यांना अटक केली आहे. एसएसपी (मथुरा) मार्तंड पी. सिंह म्हणाले, ’21 वर्षीय तरुणी दिल्लीतील एका खासगी महाविद्यालयातून बीसीए करत होती. ती दक्षिण-पूर्व दिल्लीत आपल्या कुटुंबासह राहत होती. 17 नोव्हेंबर रोजी तिचे आई-वडिलांशी भांडण झाले कारण तिने त्यांच्या इच्छेविरुद्ध एका पुरुषाशी लग्न केले होते. त्यामुळे संतापून तिच्या वडिलांनी तिच्या छातीत दोन गोळ्या झाडल्या.
आई-वडिलांनी मृतदेह दिवसभर घरातच लपवून ठेवला
मुलीची हत्या केल्यानंतर आई-वडिलांनी मृतदेह दिवसभर घरातच लपवून ठेवला होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आई-वडिलांनी मुलीचा मृतदेह एक दिवस घरात लपवून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी नितेशने पत्नीसह मृतदेह लाल रंगाच्या सुटकेसमध्ये टाकून त्यांच्या कार मधून यमुना द्रुतगती मार्गावरील कृषी संशोधन संस्थेजवळ फेकून दिला. 18 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी 14 पोलिस पथके तैनात करण्यात आली होती.
20 नोव्हेंबर रोजी अज्ञात क्रमांकावरून क्लू मिळाला
दोन दिवस पोलिसांचे हात रिकामेच होते. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी
एका अनोळखी नंबरवरून आलेल्या फोनवरून पोलिसांना मृत तरुणीचा सुगावा लागला.
त्यानंतर मुलीची आई आणि भावाने छायाचित्र पाहून तिची ओळख पटवली.
17 नोव्हेंबरच्या रात्रीपासून आयुषी बेपत्ता होती, मात्र कुटुंबीयांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली नव्हती.
त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
मुलीने दुसऱ्या जातीतील तरुणाशी लग्न केल्याने पालक संतप्त झाले
राया पोलिस स्टेशनचे एसएचओ ओमहरी वाजपेयी म्हणाले, “आई-वडील परस्परविरोधी विधाने करत असल्याने आम्हाला कुटुंबीयांवर संशय आला. त्यानंतर आम्ही त्याना अटक केली. नंतर चौकशीदरम्यान नितेशने कबुली दिली आणि त्याने आयुषीला दुसऱ्या जातीतील छत्रपाल गुर्जर या मुलाशी लग्न केल्यामुळे आपण तिची हत्या केल्याची कबुली दिली.
गोळी झाडण्यापूर्वी आयुषीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला
नितेशने मुलीवर गोळ्या झाडण्यापूर्वी तिला मारहाणही केली होती.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आयुषीच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्या.
त्याच्या छातीत दोन गोळ्या लागल्या आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
एकाही टीव्ही चॅनलवर यावर चर्चा होत नाही
एकाही टीव्ही चॅनलवर यावर चर्चा होत नाही.असं alt न्यूज चे मोहम्मद जुबेर यांनी म्हटलं आहे.त्यांनी ट्विट केलंय, एकाही टीव्ही चॅनलवर यावर चर्चा होत नाही.पीडित आयुषीच्या वडिलांनी तिच्यावर गोळी झाडली, तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला होता आणि नंतर पालकांनी ते टाकून देण्यासाठी यमुना एक्स्प्रेस वेवर नेले. पोलिसांनी स्पष्ट केले की, पीडितेने तिच्या पालकांच्या नकारानंतरही एका पुरुषाशी लग्न केले होते.
Shraddha Murder Case दोन दिवस मृतदेहाचे तुकडे करत होता आफताब, श्रद्धा मर्डर केस
बजरंग दल चा नेता,टोल भरण्यास नकार, पत्नीची केस ओढत भर रस्त्यात मारहाण
VIDEO : गुजरात मध्ये केबल पूल कोसळला 400 लोक पाण्यात,काही लटकले
समान नागरी संहिता म्हणजे काय? गुजरात मध्ये समिती स्थापन करण्यास मान्यता
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 22,2022, 11:44 AM
WebTitle – Suitcase scandal again: Ayushi Chaudhary was killed and the body was thrown in a suitcase