केज : येडेश्वरी साखर कारखान्याची साखरेच्या गोदामा मध्ये शनिवारी ता 12 जून रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे साखर भिजली असून पाणी शिरून तब्बल 51 हजार क्विंटल साखरेचे नुकसान झाल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक बजरंग सोनवणे यांनी दिली.
येडेश्वरी साखर कारखान्याची साखरेच्या गोदाममध्ये शनिवारी ता 12 जून रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी शिरून तब्बल 51 हजार क्विंटल साखरेचे नुकसान झाल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक बजरंग सोनवणे यांनी दिली. आनंदगाव सा.येथील येडेश्वरी साखर कारखान्याने कारखान्याच्या इतिहासात उच्चांकी ऊस गाळपाचा टप्पा पार केला होता.
कारखान्याचा 7 वा गळीत हंगाम प्रतिदिनी 3900 मे टनानी हंगामाच्या पहिल्या दिवसापासुन यशस्वी पणे ऊस गाळप सुरू झाला. हंगामाच्या 172 व्या दिवशी उच्चांकी ऊस गाळपाचा टप्पा पार करून 6 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले होते. शनिवारी रात्री जोरधार पावसामुळे येडेश्वरीची साखर भिजली असून यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
येडेश्वरी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बजरंग सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
30 हजार साखरेचे पोते पाण्याने भिजले असून हा आकडा 51 हजारांवर जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
तसेच यंदा केजमधील येडेश्वरी साखर कारखान्याने 06 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून साखर पॅक करून गोदामात ठेवली होती.
दरम्यान,मागच्या दोन दिवसात केज तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने
30 हजार पोती पावसाच्या पाण्याने भिजल्याने कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.
स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUN 15,2021 at 14:34 PM
WebTitle – sugar-soaked-by-heavy-rains-at-yedeshwari-factory-2021-06-15