शाक्य आणि कोलिय (जवळपासचे दोन राज्ये) यांच्यात रोहिणी नदीच्या पाण्यावरून तंटा उत्पन्न झाला. (नगर-नाशिक आणि औरंगाबादच्या लोकांना या प्रश्नाच्या तीव्रतेबाबत काही सांगायची सध्या गरज नाही. गोदावरीचे पाणी त्याचे साक्षी आहे) शाक्यांच्या सेनापतीने सभेत युद्धाचा ठराव मांडला.
सिद्धार्थ गौतमाने याला विरोध दर्शविला. ‘युद्ध करून हेतू सफल होत नाही. प्रथम दोष कोणाचा हे समजून घ्यावे. आपल्या लोकांनीही आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो.’ असे सिद्धार्थाने मांडले.
वादविवादात ठराव मतास टाकला गेला. (तेंव्हा राजदंड पळविणे, प्रत्यक्ष मतदान न होऊ देता गोंधळ घालणे, टिव्ही चॅनलवरून बाईट देऊन वातावरण भडकविणे असल्या गोष्टी त्या काळच्या लोकांना येत नव्हत्या असे दिसते…..) फार मोठ्या बहुमताने ठराव सिद्धार्थ गौतम च्या विरोधात संमत झाला.
युद्धाची निश्चिती झाल्यावर सैन्यभरती सुरू झाली. त्याला सिद्धार्थाने विरोध केला व युद्ध करण्याचे नाकारले. हा संघाच्या नियमाचा भंग होता. त्याला ज्या शिक्षेला सामोरे जावे लागणार होते त्यात 1. देहांत शासन 2. देशत्याग 3. कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन मालमत्तेची जप्ती.यांचा समावेश होता.
सिद्धार्थाने देहांत अथवा देशत्यागाची शिक्षा स्विकारण्याची तयारी दाखविली. स्वत:च्या निर्णयाची शिक्षा कुटूंबाला नको अशी त्याची भूमिका होती. पण ही शिक्षा देण्यास संघ तयार झाला नाही. तेंव्हा बुद्धाने परिव्रजेचा मार्ग सुचविला. मी आपणहून सन्यास घेतो व देश सोडून जातो. पण त्यातली अडचण म्हणजे घरच्यांची परवानगी घेतल्याशिवाय असे करता येत नाही. तेंव्हा ही परवानगी घेवून अथवा न मिळाल्यास तसेही परिव्रज्या स्विकारून देश सोडण्याचे वचन सिद्धार्थाने दिले आणि हा तिढा सोडवला.
घरच्यांची परवानगी घेताना शेवटी पत्नी यशोधरा हीने ज्या धैर्याने सिद्धार्थाला उत्तर दिले त्याचा उल्लेख फारसा कुठे येत नाही. बाबासाहेबांनी नेमकी हीच जागा हेरून त्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
“ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात
त्या अर्थी आपण असा एक नविन मार्ग शोधून काढ़ा की, तो सकल मानवजातिला कल्याणकारी ठरेल….हीच एक केवळ माझी इच्छा आहे.”
सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला.तिला पाहुन तो स्तब्ध उभा राहिला.
काय बोलाव कस बोलाव् सुचेना..
त्यांन विचारल,” यशोधरा , मला सांग , परिव्रज्या घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते?”
त्याला वाटल की ती मूर्छित होऊन पडेल.पण तस झाल नाही.
आपल्या भावनांवर संपूर्ण नियंत्रण ठेऊन ती म्हणाली ,
“मी आपल्या जागी असते तरी आणखी दूसरे काय करू शकले असते ?
कोलियां विरूद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चित भगिदारिंण झांले नसते.
“आपला निर्णय योग्य आहे. माझी आपणास अनुमति आहे आणि पाठिंबाही आहे.
मी सुद्धा आपल्या बरोबर परिव्रज्या घेतली असती.
मी परिव्रज्या घेत नाही याचे एकच कारण मला राहुलचे संगोपन करायचे आहे.
“असे झाले नसते तर फार बरे झाले असते.
पण आपण धीट आणि शुर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे.
आपल्या मातापित्यांविषयी व् आपल्या पुत्रा विषयी आपण मुळीच काळजी करू नका.
माझ्या शरीरात प्राण असे पर्यन्त मी त्यांची देखभाल करीन.
“ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात
त्या अर्थी आपण असा एक नविन मार्ग शोधून काढ़ा की, तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल….
हीच एक केवळ माझी इच्छा आहे.”
मग त्याने तिला राहुलला आणणयास सांगितले .
पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्याने त्याच्याकड़े पाहिले आणि तो निघुन गेला…
पुढे ज्या भांडणाचे कारण होवून सिद्धार्थ गौतम ने संन्यास घेतला ते कारणच नष्ट झाले.तो तंटा मिटविण्याचा निर्णय झाला व लोकांनी सिद्धार्थास परत येण्याचे विनविले. पण ‘युद्धामुळे मी घर सोडले हे खरे. परंतु शाक्य व कोलीय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की, माझ्यापुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे.
या सामाजिक संघर्षाचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे.’ असा निर्धार करून सिद्धार्थ गौतम ची ‘बुद्ध’ बनण्याची वाटचाल सुरू झाली. काही वर्षांनी बुद्ध परत घरी आला आणि यशोधरेसह राहुल ला सुद्धा आपल्या धम्माची दीक्षा दिली आणि बुद्ध धम्माचा प्रचारक बनवले.
बाबासाहेबांनी सोप्या पद्धतीने बुद्ध चरित्राची मांडणी केली आहे. यात कुठेही चमत्काराला जागा नाही. कुठेही कर्मकांडाचा विषय नाही. कुठेही भाकड कथा नाहीत. हे सगळं टाळून बाबासाहेब ही मांडणी करत जातात.
लेखन – मिलिंद धुमाळे
(लेखक जागल्या भारतचे संपादक आणि आंबेडकरी चळवळ अभ्यासक आहेत)
हेही वाचा… बुद्ध पौर्णिमा हिंदू तिथी पंचांगाप्रमाणे येते का?
हेही वाचा… धम्मचक्र प्रवर्तन आणि अशोका विजया दशमी,दसरा प्रवाद समजून घ्या
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on AUG 23, 2020 14 : 03 PM
WebTitle – Did Siddhartha Gautama left his wife Yashodhara?