मागील भागात आपण वाचलं की,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न सिद्धार्थ महाविद्यालय बनूच नये यासाठी काही पोटशूळ उठले होते, पंडित गोविंद मालवीय याचं नाव कालच घेतलं.
दुसरं व्यक्तीमत्व होते भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल.
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल यांच्यात सख्य क्वचितच पाहायला मिळाले असेल, शक्यतो नाहींच. गांधीजी आणि जवाहरलाल नेहरू यांना बाबासाहेबांचे मंत्रीमंडळातील महत्व आणि योग्यता ही चांगलीच माहित होती. पण सरदार पटेलांनी कधीही मनापासून बाबासाहेबांना स्विकारले नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश इंडियाच्या राजवटीत मजूरमंत्री असताना भरपूर पैसा कमावला आहे. असं पटेलाचं वाक्य एका अति महत्त्वाच्या सनदी अधिकाऱ्यांच्या मार्फत बाबासाहेबांच्या कानावर पडले. त्यावर उत्तर देताना बाबासाहेब म्हणाले की, “जर सरदार पटेल यांनी सिद्ध करुन दाखवले की, मी गैरमार्गाने एक छदाम देखील कमाविला आहे तर मी आजच मंत्रीपदाचा राजीनामा देऊन सार्वजनिक आयुष्याचा त्याग करेल.
एवढा पैसा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आणला कुठून??
या कुजबूजीला कारण म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयासाठी खरेदी केलेल्या दोन जपानच्या इमारती.(आज ज्याला आपण ‘आनंद भवन’ आणि ‘बुद्ध भवन’ या नावाने ओळखतो) आणि वस्तीगृहासाठी खरेदी केलेली जमिन ( आत्ताची वडाळा येथील डॉ आंबेडकर महाविद्यालय आणि परीसर ज्यामध्ये अनधिकृत झोपडपट्ट्या तसेच वडाळा बेस्ट डेपो सामिल आहे) एवढा पैसा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आणला कुठून??
त्यावेळी वित्त सचिव म्हणून एक गोखले नावाचे सद्गृहस्थ होते त्याचा मदतीने वित्त मंत्रालयाकडून शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी बिनव्याजी कर्ज काढले आणि त्या दोन्ही इमारती खरेदी केल्या. या इमारती अगदी नाममात्र दरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मिळाल्या. कोणताही सावकार किंवा व्यापारी ह्या इमारती घेत नव्हता कारण या इमारतीमध्ये राहणारे भाडेकरू जागा खाली करायला तयार नव्हते. पण बाबासाहेब याचा उपयोग शैक्षणिक संस्था म्हणून करणार आहेत आणि ते ही जागा खाली करु शकत होते.
वित्त सचिव यांच्या मदतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कर्ज मिळाले हे जेव्हा सरदार वल्लभभाई पटेलांच्या लक्षात आले
तेव्हा त्यांनी तडक गोखले यांनाच विचारले, डॉ आंबेडकरांना तुम्ही एवढी मोठी रक्कम का दिली?
गोखले यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिलं.
शिक्षणाच्या प्रसारासाठी निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्याची कायद्यात तरतूद आहे त्याच्या अधीन राहून मी कर्ज दिले.
नियमांचे काटेकोरपणे पालन करुन हे कर्ज दिले जाते. एका सनदी अधिकाऱ्यांपुढे सरदार पटेल केवळ बघत राहतात.
क्षणभर काहीच सुचेना. नंतर पटेलांनी सचिवाला बजावले की, यापुढे अशी रक्कम देण्यापूर्वी माझी आणि मंत्रीमंडळाची परवानगी घेण्यात यावी.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचा.. सिद्धार्थ महाविद्यालय – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न
सिद्धार्थ महाविद्यालय – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न 2
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीविषयक धोरण
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on APRIL 09 , 2021 22 : 30 PM
WebTitle – siddharth-college-dr-babasaheb-ambedkars-dream-3 -2021-04-09